Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पवित्र आत्मा मिळण्याअगोदर ऐक्य हवें

    शिष्यांची पूर्ण एकी झाल्यावर व वरच्या जागेची खटपट करण्याचे त्यांनीं थाबविले तेव्हां पवित्र आत्मा ओतला गेला ह्याकडे लक्ष पुरवा. तें एक चित्र होतें. सर्व गैरसमज दूर केला गेला होता. आत्म्याने त्याच्या विषयीं दिलेली साक्ष तीच होती. या शब्दांकडे लक्ष द्या : “ज्यांनी त्याजवर विश्वास ठेवला तें एका मनाचे व चित्ताचे होतें.” (प्रेषित ४:३२) पाप्यांनी जगावे म्हणून जो त्यांच्यासाठी मेला त्याच्या आत्म्याने सर्व जमावाला चेतना मिळाली.CChMara 159.4

    शिष्यांनी स्वत:करितां आशीर्वाद मागितला नाहीं. त्यांना आत्म्याचे ओझे झाले होतें. सुवार्ता पृथ्वीच्या शेवटापर्यंत गाजवायची होती व ख्रिस्ताने देऊं केलेल्या सामर्थ्याच्या देणगीची त्यानीं मागणी केली. मग पवित्र आत्मा त्यांच्यावर ओतण्यात आला व हजारों लोकांचा एका दिवसांत पालट झाला.CChMara 159.5

    हीच गोष्ट आज होऊ शकेल. ख्रिस्ती लोकांनी सर्व प्रकारचे कलह दूर करून हरवलेल्यांकरता स्वत:ला देवाला वाहन घ्यावे. देऊ केलेल्या आशीर्वादाची मागणी विश्वासाने त्यानी करावी, मग तो प्राप्त होईल. प्रेषितांच्या काळांतील पवित्र आत्म्यांचा वर्षाव हा आगोटीचा पाऊस होता. त्याचा परिणाम फार उत्तम होता पण वळवाचा पाऊस भरपूर पडेल. ह्या शेवटल्या काळांत जे शहरात राहत आहेत त्यांना काय वचन दिले आहे? “आशा धरून राहिलेले बंदिवान हो, दुर्गाकडे परत या; आज मी हें जाहीर करतों कीं मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन.” वीज उत्पन्न करणाच्या परमेश्वराजवळ वळवाच्या पावसाच्या वेळी पाऊस मागा म्हणजे तो त्यावर वृष्टि करील, तो प्रत्येकाच्या शेतांत गवत उपजवील.” (जखर्‍य ९:१२; १०:१) 28T 20, 21; CChMara 160.1