Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रीति येशूपासूनचे मौल्यवान् दान

    प्रीति में येशूकडून आम्हांस प्राप्त झालेले मौल्यवान् दान होय. पवित्र व शुद्ध प्रीति नुसतीच भावनात्मक नसून ती एक तत्त्वशाली देणगी होय. असल्या खर्‍य प्रीतीनें जें सुल असतात तें स्वभावाने अविचारी किंवा अध नसतात. CChMara 178.4

    खरीखुरी, निर्भेळ, भक्तिशील व शुद्ध प्रीति क्वचितच सापडते. हा मौल्यवान् गुण मोठा दुर्मिळ असतो. मनोरागाला (आसक्तीला) प्रीति म्हणतात. CChMara 178.5

    निर्भेळ प्रीति में एक अव्वल दर्जाचे व शुद्ध असें तत्त्व होय. लहरी-खातर उद्भवणारी प्रीति कडक कसोटीच्या तोंडी तत्काळ मरून जाते. CChMara 179.1

    प्रीतिरूप रोपटे स्वर्गीय प्रगतीने वाढत असतें. त्याचे संगोपन करावयास पाहिजे व त्याची निगा राखिली पाहिजे. प्रेमळ अंत:करणे, विश्वसनीय व गोड भाषा यांच्याद्वारे कुटुंबे सुखी बनली जातात व अशाच्या समागमात येणार्‍य सर्वांवर भारदस्तपणाचे वजन पडतें.CChMara 179.2

    शुद्ध प्रीति आपल्या सर्व विचार योजनेंत देवाला चिकटून असतें व त्याच्या आत्म्याशीं संपूर्णत सुसंगत असतें. आसक्ति अगर मनोविकार म्हणाल तर तो हेकड, उतावळा, गैरवाजवी व अति उर्मठ असून आपण निवडलेल्या व्यक्तीला एक दैवतच समजतो. ज्याच्या अंतर्यामी खरी प्रीति असतें त्याच्या सर्व चालणकीत ईश्वरी कपा दिसून येईल. विवाहसबंध जुळवन आणतांना विनयशीलता, साधेपणा, सदाचरण आणि धार्मिकता ही हरएक वाटाघाटींत दिसून येतील. जे असल्या विचारसरणीच्या कह्यांत नांदतात, तें प्रार्थनामय व धार्मिक सेवामय जीवनाकडे दुर्लक्ष करून परस्परांच्या नुसत्या समागमातच रमणार नाहींत. देवाच्या कृपेने त्यास लाभलेल्या सधि व सवलती याची निष्काळजी करून त्यांची सत्याविषयींची आस्था भरून जाणार नाही.CChMara 179.3

    इंद्रियजन्य उपभोगापेक्षां अधिक चागला पाया ज्या प्रीतीला नसतो ती इकड, अधळी आणि बेफाम अशी बनत राहील. प्रतिष्ठा, सत्यता व मानसिक सामर्थ्याची हरएक उदारता हीं विकारमय प्रीतीच्या गुलामगिरीत राहातात. जो मनुष्य असल्या बुद्धिभ्रमांत गुरफटलेला असतो त्याला त्याच्या बुद्धिवादाची व सद्सद्विवेकाची वाणी ऐकूच येत नाही; अगर कसल्याहि विचारसरणींने अथवा विनवणीनें तो आपल्या मूर्खतेच्या मार्गातून हटत नाहीं.CChMara 179.4

    प्रीति हा काहीं अतिरेकी, तापट व उतावळा मनोविकार नसतो. उलट स्वभावत: ती शांत व खोल असतें. केवळ वरसंगीपणापासून ती दूर असतें व सद्गुणांनीच ती आकर्षिली जाते. ती सूज्ञ व विचारवंत असतें आणि तिची निष्ठा सत्य व टिकाऊ असते.CChMara 179.5

    मनोविकाराच्या व लहरीच्या ताब्यातून प्रीतीला बाहेर काढले तर तिच्यांतील आत्मिकता दिसून येते आणि ती आपल्या बोलण्याचालण्यात व्यक्त होतें. ख्रिस्ती मनुष्याच्या अंगीं शुद्ध दयार्दै मन असावे आणि उतावळी व चिडखोर नसेल अशी प्रीति असावयास पाहिजे;ख्रिस्ताच्या कृपेद्वारे त्याचा उर्मठपणा व त्याच्या कठोर चालीरिती नरम झाल्या पाहिजेत.CChMara 179.6