Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आरोग्य सुधारणा तत्त्वांचा उपयोग

    अन्नामध्यें सुधारणा घडवून आणणे हें एक खर्‍य अक्कल हुशारीचे काम होय. या विषयाचा विस्तृत व खोल अभ्यास करण्यांत यावा. सर्व बाबींमध्ये आपल्या क्रियापद्धतीसारखी दसर्‍यची कार्यपद्धत नाहीं म्हणून कोणी कोणावर टीका करूं नये. प्रत्येकाच्या संवय-पद्धति सरसहा समान करण्याचे बंधन हातीं येणें अशक्य आहे व आपण कार्यपद्धतीचा एक नमुना आहों असें कोणालाच वाटू नये. एकच गोष्ट सर्वांनाच खाता येत नाहीं. जे अन्न एकाला रुचकर व पथ्यकर असतें, तें दुसर्‍यला नसते, इतकेच नव्हें तर तें दुसर्‍यला अपायकारकही होऊ शकेल. कोणाला आवडत नाहीं तर कित्येकांना त्यावाचून चालत नाहीं. कित्येकांना वाटाणे व घेवडा ह्या भाज्या पचत नाहींत तर कित्येकाना त्या फार पसंत असतात. कित्येकांना जाड्या-भरड्या धान्याचे जेवण गोड लागते, परंतु कित्येकांना तें चालत नाहीं. 23.CChMara 299.8

    अयोग्य संवयांनी ज्यांना अन्नाची चटक लागलेली आहे. त्याची सुधारणा करण्यांत विलब करता कामा नयें. CChMara 300.1

    जठराच्या दुरुपयोगामुळे जर अग्निमांद्य जडलेले असेल, तर त्यावरचे अतिरेकांचे ओझे काढून टाकण्यात यावे. शक्ति पुरविणाच्या अवांतर अवयवांची शक्ति कायम राखण्यासाठी काळजीपूर्वक यत्न करण्यांत यावेत. जठराचा पुष्कळ दिवसपर्यंत दुरुपयोग केल्यामुळे त्याची सुधारणा संपूर्णत: कदापि होण्यासारखी नाहीं, तरी योग्य प्रकारचे अन्न मिळाले तर पुढे येणारी अशक्तता टाळिता येईल व पुष्कळाची कमी जास्ती प्रमाणात पूर्ण सुधारणाही होऊन जाईल. CChMara 300.2

    सुदृढ प्रकृतीची माणसें शारीरिक पश्रिमांत गुंतलेली असली तर त्यांना अन्न किती व कोणत्या प्रकारचे देण्यांत यावे याची मोठीशी काळजी करण्याचे प्रयोजन नाही तशी गोष्ट वैठे काम करणार्‍यांना चालणार नाही. परंतु ह्यांनी सुद्धा खाण्यापिण्यांत आत्मसंयमन ठेविलें तर त्याची प्रकृति अधिक चांगली राहील.CChMara 300.3

    आपल्या जेवणाविषयीं नक्कच नियंत्रण करण्यांत यावे असें कित्येकांना वाटते. याप्रकरणी एकजण दुसन्यासाठी नक्कीच नियम घालू शकत नाहीं. सुविचाराने व आत्मसंयमानें प्रत्येकाला वागता येईल व तत्त्वाला धरून राहता येईल. 24.CChMara 300.4

    अन्नांतील सुधारणाकार्य प्रागतिक असावें. जनावरांत व्याधि वाढू लागले म्हणजे दुधाचा व अंड्यांचा पुरवठा कमी जास्त धोक्याचा होतो, त्याच्याजागी आरोग्यकारक व स्वस्त पदार्थ मिळविण्याचा प्रयत्न करण्यांत यावा. दुधा-अंड्याशिवाय शक्य तो जेवण कसे बनवावे हें लोकांना सर्वत्र शिकविण्यात यावे व तें अन्न हितकर व रुचकर असावें.CChMara 300.5

    शरीरप्रकृतीची हेळसांड व दुरुपयोग केल्याने देवाचा आदर राखण्यात येत नाही व तशाने तो प्रकृति त्याच्या सेवेसाठी नालायक अशी होत. गृहिणीच्या कर्तव्यांतील आद्यकर्तव्य असें आहे कीं, चवदार व शक्तिवर्धक अन्न देऊन शरीराची निगा राखावी. अन्नखर्चात छाटाछाट करण्यापेक्षा कपड्यालयांत व सामानासुमानांत मी खर्च करणे हें अधिक बरें. CChMara 300.6

    आदरातिथ्याची बढेजावी राखण्यासाठी पुष्कळशा गृहिणी कौटुबिक अन्नखर्चात छाट मारितात. हें अविचाराचे असतें. पाहुणचारांत तर साधेपणा असावा. कौटुंबिक गरजाकडे प्रथम लक्ष पुरविले पाहिजें.CChMara 300.7

    जेथें आदरातिथ्य अवश्य आहे व तें आशीर्वादमय होण्यासारखे आहे. तेथें अविचाराची काटकसर व कृत्रिम रीतीभाती ह्या आडव्या येतात. आमच्या खाण्यापिण्याचा नियमित कारभार असा असावी कीं एकादा अनपेक्षित पाहुणा जर उतरला तर गृहिणीवर कसलाही अधिक भार न पडता त्याचे जेवण उरकून निघावें.CChMara 300.8

    आपल्या अन्नाविषयीं बारकाईने विचार करा. कार्यकारणभाव ध्यानात आणा. आत्मसंयमनाची तालीम ठेवा. भूक आपल्या बुद्धीच्या ताब्यात ठेवा अति अन्नभक्षणाने पोटावर कदापि जुलूम करूं नका. तरी आरोग्यासाठी आवश्यक अशा हितकर व रुचकर अन्नापासून त्याची उपासमार होऊ देऊ नका.CChMara 301.1

    ज्यांना आरोग्याची बंधने अवगत आहेत व जे तत्त्वानुसार वागतात असें लोक कोणत्याही अवस्थेचा अतिरेक होऊ देणार नाहींत म्हणजे अति फाजीलपणा व अति काटेकोरपणा. तें अन्नाची निवड करितात ती केवळ भूकशमविण्यापुरतीच नसून ती आरोग्यसंवर्धनासाठी असतें. आपलें हरएक सामर्थ्य अशासाठीं आटोक्यात येते कीं त्याच्या भारदस्त स्थितीनें देवाची व मानवाची त्यांना उत्कृष्ट सेवा करितां यावी. भुकेची भावना बुद्धीच्या व तद्सद्विवेकाच्या कह्यांत ठेविलेली असतें म्हणून त्यांना शारीरिक व मानसिक आरोग्याची संपन्नता लाभते. आपल्याच मताची आगळीक तें दुसर्‍यवर करीत नसतात. परंतु आपल्या उदाहरणाने योग्य प्रकारच्या तत्त्वांना तें अनुसरणारे आहेत अशीच त्याची साक्ष असतें. असल्या लोकांच्या चागुलपणाचे वजन फैलावलेले असतें. 25.CChMara 301.2

    शब्बाथवारचें जेवण अवांतर दिनाच्या जेवणापेक्षा अधिक व भिन्नभिन्न प्रकारचे असू नये. ह्याऐवजी त्या दिवसाचे जेवण साधे असून तें कमी खाण्यात यावे, अशासाठीं कीं आमचे मन आत्मिक गोष्टीचे आकलन करण्यासाठी युक्त व आवेशी असावें.CChMara 301.3

    शब्बाथवारीं स्वयंपाक करणे टाळावे, पण त्या दिवशी थंडगार जेवण घ्यावे असें कांहीं नाहीं. आदल्या दिवशी पकविलेले अन्न हिवाळ्याच्या दिवसात गरम करून खावे, कसलेही साधे जेवण असो तें चवदार व आवडते असावे. मुलें असलेल्या कुटुंबांनी तर विशेषत: शब्बाथवारी असें जेवण करावें कीं कुटुंबांत रोज न मिळणारी तो एक मेजवानी व वाटावी. 26.CChMara 301.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents