Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण १८ वें - देवावरील व्यक्तिवाचक विश्वास

    शेवटच्या ठरावांत एक गोष्ट उघड होईल ती ही कीं, देवाला प्रत्येक नावाची माहिती आहे. एक अदृश्य साक्ष जीविताच्या प्रत्येक कृतीला आहे. “जो सोन्याच्या सात समयामध्ये चालतो तो असें म्हणतो कीं, मला तुझे काम माहीत आहे. प्रगटी, २:१. संधि कशी प्राप्त झालेली आहे हें माहीत आहे. सतत खटपट करून चागला मेंढपाळ जे वेगळ्या मार्गाने चालतात त्यांना शोधण्यास व शांतीच्या व संरक्षणाच्या मार्गावर त्यांना आणण्यास त्रास घेतो हें माहीत आहे. पुन: पुन: देवाने चैनीची आवड धरणाच्याना बोलाविले आहे. पुन: पुन: त्यानें त्यांच्या मार्गावर आपल्या बचनाचा प्रकाश पाडला आहे. अशासाठी कीं त्यांचा नाश दिसावा व त्यांनी त्यातून निसटून जावें. पण तें असें मजा करीत जात असतां शेवटीं कृपेचा काळ बंद होतो. देवाचे मार्ग न्यायाचे व समतेचे आहेत. जे उणे भरतील त्यांच्याविरुद्ध निकाल दिल्यावर तोंड बद होईल. 157 435.CChMara 135.1

    सर्व सृष्टीद्वारें जी महान् शक्ति कार्य करते व सर्व गोष्टीला आधारभूत आहे ती काहीं शास्त्रज्ञ म्हणतात त्याप्रमाणे सर्वव्यापी तत्त्व किंवा प्रेरणायुक्त शक्ति नव्हें. देव आत्मा आहे. तरी तो व्यक्तिवाचक देव आहे. कारण मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केले होतें. CChMara 135.2

    देवाचें सृष्टीतील हस्तकार्य म्हणजे सृष्टीतील प्रत्यक्ष देव नव्हें, सृष्टीतील सर्व कांहीं देवाच्या शीलाचे प्रदर्शन आहे. त्याद्वारे आम्हांला त्याचे प्रेम, त्याची शक्ति आणि त्याचे गौरव कळते. पण सृष्टि हाच देव आहे असें आम्ही मानू नये. मनुष्याच्या कारागिरीच्या कसबाकडून फार सुंदर कार्य घडते. त्याकडून डोळ्यांना आनंद वाटून त्याद्वारें बाधणार्‍यांच्या योजनेची कल्पना येते. पण ही बाधलेली वस्तु मनुष्य नव्हें. काम हें मुख्य नव्हें, पण काम करणार्‍यचा मान केला जातो. म्हणून सृष्टि ही देवाची कृति आहे. म्हणून सृष्टीला नव्हें पण सृष्टि निर्माण करणाच्या देवाला उंचावले पाहिजे.CChMara 135.3

    मनुष्याच्या उत्पत्तीं प्रत्यक्ष देवच हस्तक होता. जेव्हां देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडिला तेव्हां मानवी देह सर्व बाबतींत पूर्ण होता. पण तो निर्जीव होता. मग प्रत्यक्ष स्वयंभू देवाने या देहांत आपला प्राणवायू फुकला व मनुष्य जीवधारी बनला. तो श्वासोच्छ्वास करणारा वे बुद्धिवान् मानव बनला. मानवी देहाचे सर्व भाग हालचाल करूं लागले. हृदय, धमन्या, शिरा, जीभ, हात पाय, इंद्रिय, मनाची आकलन शक्ति, या सर्वांनी आपले कार्य सुरू केले. या सर्वांना नियम लावून देण्यांत आला, मनुष्य जीवधारी बनला. देवाने ख्रिस्ताद्वारें मनुष्याला निर्माण केले व त्याला बुद्धिमता व शक्ति दिली. आम्हांला अद्भुतरित्या निर्माण केले तेव्हां त्याच्यापासून कांहीं लपविले नव्हते. त्याच्या नेत्राला आम्ही दिसलों व अपूर्ण आढळून आलो; आणि सर्व भाग अस्तित्वात नसताना त्याच्या ग्रंथांत लिहून ठेवले होतें.CChMara 135.4

    बाकीच्या सर्व प्राण्यांप्रमाणे देवाने मनुष्याला वडिले व त्याला सर्व सृष्टींत श्रेष्ठ असें निर्माण केले म्हणून मनुष्याने देवाचे विचार दर्शवावे व त्याचे गौरव प्रगट करावे. पण मनुष्याने देवाप्रमाणे स्वत:ला श्रेष्ठ मानू नये. 28T 263-273.CChMara 136.1

    देव पिता ख़िस्ताद्वारें प्रगट झाला CChMara 136.2

    व्यक्तिवाचक देव या नात्यानें, देवाने आपला पुत्र: येशू म्हणजे जो त्याच्या गौरवाचे महान् तेज त्याद्वारे स्वत:ला प्रगट केलें, (इब्री १:३.) आणि त्याच्या प्रतिरूपाचे होऊन मानवी देह धारण केला. वैयक्तिक तारणारा असा स्वर्गाला गेला आहे. वैयक्तिक तारणार या नात्याने तो स्वर्गीय न्यायालयांत मध्यस्थी करीत आहे. देवाच्या सिंहासनासमोर आमच्यासाठी “मनुष्याचा पुत्रे या नात्याने सेवा करीत आहे.” (प्रगटी १:१३). CChMara 136.3

    जगाचा प्रकाश ख्रिस्त आपल्या दैवी तेजस्वी गौरवाचा पडदा बाजूला सारून त से मनुष्यात वस्ती करण्यास मनुष्य झाला, अशासाठीं कीं त्यांनी नाश न पावतां आपल्या उत्पन्नकत्र्याची ओळख करून घ्यावी. देवाला कोणी कधीं पाहिलें नाही पण ख्रिस्ताने त्याला प्रगट केले आहे.CChMara 136.4

    ख्रिस्त मनुष्यांना ज्या गोष्टींची माहिती पाहिजे होती ती शिकविण्यास आला. वर स्वर्गात, खालीं पृथ्वीवर व महासागरांत देवाची हस्तकृति दिसते. सर्व उत्पन्न केलेल्या वस्तूंवरून त्याचे सामर्थ्य, त्याचे ज्ञान व त्याची प्रीति प्रगट होतें. पण तारे, समुद्र किंवा धबधबा यावरून देवाचे व्यक्तित्व आम्ही शिकू शकत नाही, तर ख्रिस्ताद्वारेच तें प्रगट होतें. CChMara 136.5

    देवाला दिसलं कीं, सृष्टीपेक्षा स्पष्ट असें प्रगटीकरण त्याचे व्यक्तित्व व त्याचे शील दर्शविण्यास आवश्यक आहे. त्यानें आपल्या पुत्राला या जगांत देवाचे अदृश्य गुण व सृष्टि मानवी डोळ्याला दिसावी म्हणून पाठविले. CChMara 136.6

    सृष्टींतल्या सर्व वस्तूंत व्यक्तिवाचकरित्या स्वत:ला दर्शवावे असें इच्छिले असतें. म्हणजे फुले, झाडे, गवत, याद्वारें दर्शविण्याचे इच्छिले असतें तर ख्रिस्त या पृथ्वीवर होता तेव्हां त्यानें आपल्या शिष्यांना असें सांगितलें नसते का ? ख्रिस्ताने व प्रेषितांनी स्पष्टरीत्या आपल्याला वैयक्तिक देवाच्या अस्तित्वाचे सत्य शिकविले आहे. CChMara 136.7

    ख्रिस्तानें देवाला पूर्णपणे प्रगट केले अशासाठीं कीं, पापी मानव नाश न पावता त्याला दिसावा. तो दैवी शिक्षक व ज्ञान दाता आहे. ख्रिस्ताद्वारें जें प्रकट केले आहे, त्यापेक्षा देवाने आम्हांला प्रगटीकरणाची जास्त गरज आहे असें दाखविले असतें, तर त्यांना प्रगटीकरण दिले असतें.CChMara 136.8