Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मालमत्तेची योग्य व्यवस्था लावणें

    आईबापांनी सालस मनाने व चातुर्याने प्रार्थनापूर्वक विचार करून व ज्यांना दैवी इच्छेच्या ज्ञानाचा व सत्याचा अनुभव आहे अशाच्या योग्य सल्ल्याने आपल्या मालमत्तेची व्यवस्था लावावी.CChMara 78.3

    जर त्यांना व्यंग मुलें असतील किंवा गरिबींत जीवित कंठणारी मुलें असतील व जे योग्य प्रकारे पैशाचा उपयोग करतील त्यांचा विचार करण्यांत यावा पण जर त्यांना भरपूर पैसा असलेली व विश्वासू मुलें असतील व ती जगाची सेवा करीत असतील व अशांच्या हातांत पैसा दिला तर ती आपल्या धन्याविरुद्ध पाप करतात कारण त्यानें त्यांना कारभारी नेमिले आहे ती त्याची लेकरे आहेत म्हणून देवाच्या मागण्या हलक्या अशा मानू नयेत.CChMara 78.4

    हें स्पष्ट समजून घ्यावे कीं आईबापानी मृत्युपत्र करून दिले म्हणून तें जीवत असताना देवाच्या कामासाठी पैसा देण्यास त्यांना हरकत करण्यांत येऊ नये. त्यांनी हें करावे. त्यांनी येथे तृप्त असावे. कारण आपला पैसा जीवंत असताना आपल्या प्राप्तीचा व्यय योग्य रीतीने केल्याने त्यांना या जगांतील समाधान प्राप्त व्हावे व पुढील जगांतील समाधान प्राप्त व्हावे व पुढील जगांतील प्रतिफळ लाभावें. त्यांनी देवाचे कार्य वाढविण्यास आपला भाग करावा. त्याच्या धन्याने त्यांना उसने दिलेले पैसे त्याच्या द्राक्षमळ्यांत काम करण्यासाठी उपयोगात आणावें. 193T 121;CChMara 78.5

    जे देवाच्या खजिन्यांतून मागें राखून ठेवतात व तें आपल्या मुलांसाठी उधळून टाकतात तें आपल्या मुलांच्या आत्मिक बाबी धोक्यात घालतात. आपल्याला अडखळण असलेली मालमत्ता ते त्यांच्या मार्गात अडखळण होण्यासाठी व त्याद्वारे नाश होण्यासाठी ठेवतात. या जीवितांतील गोष्टीसंबंधाने पुष्कळ जण मोठी चूक करतात. देवाने दिलेल्या पैशाचा चांगला उपयोग केल्याने त्यांचे जे सार्थक होणार तें स्वत:पासून व इतरापासून मागें राखून ठेवून जे काटकसरी बनण्याचा प्रयत्न करतात तें स्वार्थी व लोभी बनतात तें आत्मिक गोष्टींची हेळसांड करतात व धार्मिक वाढींत खुजे बनतात ज्याचा उपयोग करूं शकणार नाहींत. तें सर्व धन साठविण्यासाठी असें करतात. तें आपल्या मुलासाठी आपली मालमत्ता राखून ठेवतात. दहा पैकी नऊ वेळेस असें आढळते कीं, त्यांना जो शाप मिळतो त्यापेक्षा अधिक शाप त्यांच्या पिढीला मिळतो जीं लेंकरें आपल्या आईबापांच्या मालमत्तेवर अवलंबून राहातात तीं या जीवितांत अपयशी बनतात व सर्वसाधारणपणे येणाच्या जीवताची सुरक्षितता करण्यास पूर्णपणे चुकतात.CChMara 78.6

    आईबापांनी आपल्या मुलाना उत्तम मृत्युपत्र द्यावयाचे असेल तर त्यांनी त्यांना कामाची उपयुक्तता पटवून परोपकारी जीवितांचे उदाहरण घालून द्यावे, अशा जीविताने तें पैशाची खरी किंमती दाखवितात, आणि त्याचा उपयोग चांगल्या कामासाठीं करून त्यांच्या स्वत:च्या गरजा त्याकडून भागतील व इतरांच्याही गरजा भागून देवाच्या कार्याची वाढ होईल. 203T 399;CChMara 79.1