Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आत्मिक जीवनाच्या संजीवनाची गरज

    आमच्या मडळीला सांगावे अशी मला सूचना झालेली आहे आपण ख्रिस्ताला अनुरूप या सर्व बाबींबध्ये तो नमुना आहे हें विसरू नका.त्याच्या शिक्षणात ज्या गोष्टी नाहीत त्या खात्रीपूर्वक आम्ही टाळाव्यात. अविनाशी सस्यावर आपण स्थिरावलेले आहो अशी खात्री आमच्या दीक्षितांना वाटावी अशी माझी विनती आहे. लहरींच्या नादी लागून त्या आत्म्याच्या प्रेरणा आहेत अशी समजूत करून घेण्याविषयी सावध रहा. या प्रकरणी कित्येक जण धोक्याच्या मार्गात आहेत. त्यांनी आपल्या निष्ठेत भक्कम असावे व त्यांची जी आशा आहे ती कोणत्या कारणावर आधारलेली आहे हें त्यांना कोणालाही सांगता यावे, असें मी त्यांना सांगत आहे. CChMara 354.3

    या शेवटच्या काळांत लोकांना सिद्ध करण्याच्या कार्यापासून आमच्या बंधुभगीनींची मने परावृत्त करावीत असा शत्रुचा प्रयत्न आहे. या घडीला जी संकटे व कर्तव्ये आहेत त्यापासून मने झुकवावीत असा त्याचा डाव आहे. ख्रिस्ताने स्वर्गातून येऊन आपल्या लोकांसाठी योहानाला जो प्रकाश प्रगट केला तो काहीच नाही असा तें अंदाज करीत आहेत. विशेष लक्ष द्यावे अशी महत्वाची परीस्थित आम्हासमोर आली नाही असें तें शिक्षण देतात. स्वर्गीय आदारयुक्त सत्याचा तें कांही परिणाम घडू देत नाहीत आणि देवाच्या लोकांचा गत अनुभव तें हीरावून घेतात व त्याऐवजी खोट शास्त्र प्रतिपादन करितात.CChMara 354.4

    “परमश्वर म्हणतो, चवाट्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला.” यिर्मया ६:१६.CChMara 354.5

    गतकाळी जी सरळ साक्ष देण्यांत आलेली होती ती नव्याने द्यावयास पाहिजे असें प्रभुचे सांगणे आहे. आत्मिक जीवनाचें नवीकरण व्हावे अशी त्याची मागणी आहे त्याच्या लोकांच्या आत्मिक हिमती फार दिवसापासून खचलेल्या आहेत तरी त्यांना दिखाऊ मृतावस्थेतून केले पाहिजे. CChMara 354.6

    प्रार्थना व पाप कबुली करून आम्ही राजाचा धोपट मार्ग स्वच्छ केला पाहिजे हें केल्याने पवित्र आत्म्याचे आम्हांवर येईल. पन्नासाव्या दिवसातील जोम आम्हात येण्याची आवश्यकता आहे. हा तर येणारच आहे कारण संपूर्ण विजय देणारे सामर्थ्य देण्यासाठी त्याचा आत्मा आम्हांवर येणार असें त्यांचे अभिवचन आहे. CChMara 355.1

    आम्हापुढे संकटाचा काळ आहे. ज्याला सत्याचे ज्ञान आहे अशा प्रत्येकाने जागृत होऊन काया-वाचा-मने करून स्वत:ला देवाच्या शिस्तीखाली ठेविले पाहिजे. शत्रु तर आमच्या मागें लागलेलाच आहे. भरपूर जागृत होऊन आम्ही त्याविषयी सावधगिरी बाळगली पाहिजे. भविष्यावादात दिलेल्या सूचना आम्ही मान्य केल्या पाहिजेत. आजच्या वेळी आवश्य असणारी सत्याची आवड धरून त्याप्रमाणे वागले पाहिजे. यावरून चुकीचे हेकड समज टाळता येतील. देव आपल्या वचनाच्याद्वारे आम्हांशी बोलला आहे. ख्रिस्ती मंडळीला दिलेल्या ईश्वरी तत्त्वांच्या द्वारे आणि वाङ्मयाच्याद्वारे देव आम्हाशी बोलला आहे. या साधनांवरून आमचे आजच कर्तव्य काय व आज आम्ही कसे काय वागावे याविषयी आम्हांला स्पष्ट साहाय्य केलेले आहे एकामागून एक व नियमानंतर नियम जे देण्यांत आलेले आहेत त्याविषयीच्या पूर्वसूचना आम्ही मान्य केल्या पाहीजेत. याकडे जर आम्ही काना डोळा केला तर आम्हांला काय जबाब देता येईल ?CChMara 355.2

    देवासाठी जे परिश्रम करीत आहेत त्यांनी जे अस्सल आहे त्या जागी जे नकली आहे त्याचा स्वीकार करूं नये अशी त्यास माझी विनंती आहे. ज्या ठिकाणी देवी व पवित्र सय असावे त्या ठिकाणी मानवी बुद्धिमत्तेला स्थान देऊ नये आपल्या लोकांच्या अंतर्यामामध्य, व प्रेमाला चेतना द्यावी याची ख्रिस्त वाट पाहात आहे. अविनाशी सत्याच्या खंबीर पायावर भक्कमपणे उभे राहणार्‍य लोकांनी चुकीच्या तत्त्वाना थारा देऊ नये. नि:संशय सत्तेवर आधारलेल्या मूलभुत तत्त्वांना आम्ही भक्कमपणे बिलगून राहावे असें आम्हांला देवाचे सांगणे आहे.CChMara 355.3