Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्वर्गीय संरक्षणापासून परावृत्त होण्याचे संकट

    कर्तव्य-मार्गात चालत असलेल्या आपल्या लोकांचे देव आपल्या दूतांकडून संरक्षर करील, परंतु जे जाणूनबुजून सैतानाच्या क्षेत्रात पाऊल घालतात त्यांना त्या संरक्षणाची कांही हमी नसते आपला उद्देश सागण्यासाठी त्या महान् फसव्याचा हस्तक काहीही म्हणेल व काहीही करील. तो स्वत:ला पिशाच्च-वादी म्हणो वा “चकित करणारा वैद्य’ म्हणो अगर “मोहक आजारनिवारक’ म्हणो, त्यात कांही अर्थ नसतो. मोठ्या आकर्षक ढोंगाने तो बेसावध लोकांचा विश्वास हस्तगत करितो चरित्रात झाल्या गेल्या गोष्टी आपल्याला समजतात व त्यांजकडे जातील त्याच्या सर्व अडचणी व दु:खे त्याला अवगत असें तो ढोंग करीतो. त्याच्या अंत:करणात अध:काराची काळीकुट्ट दरी असताना आपण प्रकाशाचे दूत आहो असें ढोंग करून त्याची सल्लामसलत घेण्यास येणाच्या स्त्रीवर्गात आपले भारी हितचिंतन आहे असें तो दर्शवितो. त्याच्या दु:खी विवाहसंबंधामुळे त्यावर त्यांची सर्व संकटे गुदरलेली आहेत असें तो त्यास सांगतो, हे कदाचित् सत्यही असेल पण त्यांच्या परिस्थितीत कशी काय सुधारणा करीता येईल याचा तो सल्ला देत नाही. प्रेमाची व सहानुभूतीची गरज आहे एवढे तो सागतो. त्याच्या हितचितनात आपले मोठे लक्ष आहे असें ढोंग करून ज्याप्रमाणे सर्प जसा थरथरणाच्या पक्ष्याला मोहन टाकितो तसा सैतान आपल्या ह्या बेसावध भक्ष्यावर आपली झडप घालतो. ताबडतोब ती त्याच्या तडाख्यात सापडतात, पाप अपमान व नाश हाच एक भयंकर परिणाम त्यांच्यावर घडतो.CChMara 348.1

    हे अन्यायाचे कार्यकर्ते कांही थोडेच नाहीत. ओसाड गृहे, बेअब्रू झालेली कीर्ति आणि भग्न हृदय हीच त्यांच्या पथावरची चिन्हें होत पण हें सर्व जगाच्या थोडेच लक्षात येते. तरी नवी नवी सावजे गाठण्याचा त्याचा उद्योग चालूच असतो. आणि आपण केलेला नाश पाहून सैतान अत्यानंदित होतो.CChMara 348.2

    “अहज्या हा शोमरोनांतील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून पडून दुखणाईत झाला; त्यानें जासुदास अशी आज्ञा केली कीं तुम्ही जाऊन एक्रोन येथील बालजबूब देवतास प्रश्न करा कीं मी या दुखण्यातून बरा कसा होईन काय ? इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिश्बीयास म्हणाला, ऊठ शोमरोनाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही ऐक्रोन येथील बालजबूब दैवतास प्रश्न करावयास चालला आहां, तें इस्त्राएलांत कोणी देव नाही म्हणून कीं काय ? यास्तव परमेश्वर अहज्यास म्हणतो, “ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील.” २ राजे १:२-४. CChMara 348.3

    अहज्या राजाचे पाप व शिक्षा यांविषयी इतिहासांत जो इषारा दिलेला आहे तो कोणालाही निर्भयतेने डावलता येणार नाही. जरी आम्ही मूर्तिपूजा मानीत नाही. तरी इस्राएलाच्या राजाप्रमाणे हजारो लोक खात्रीने सैतानाच्या मूर्तीला नमन करीत आहेत. आज मूर्तिपूजेची प्रत्यक्ष मनोवृत्ती दिसून येत आहे. विज्ञानशास्त्राने व शिक्षणशास्त्राने त्या पूजेला सुसंस्कृत व आकर्षक स्वरूप दिलेले आहे रोजरोज आम्हांस अशी खेदकारक साक्ष मिळत आहे कीं निश्चत भविष्यवादावरील विश्वास झपाट्यानें कमजोर होत आहे व त्याच्या जागी खोट्या धर्मसमजुती व सैतानी मोहकता मानवांची मने अकित करीत आहे. जे आस्तेने शास्त्राचा अभ्यास करीत नाहीत व आपल्या जीवन चरित्रांतील आशा व उद्देश त्या अचूक कसोटीसाठी सादर करीत नाहीत, देवाची इच्छा कळन घेण्यासाठी जे प्रार्थनापूर्वक प्रयत्न करीत नाहीत. तें सर्व खात्रीने सत्य मार्ग सोडून सैतानाच्या फसवेगिरीला बळी पडतील. CChMara 348.4

    सत्य देवाचे ज्ञान एकाच राष्ट्राला प्राप्त झाले होतें. व तें इब्री लोकांचे राष्ट्र होतें. इस्राएलाच्या राजाने जेव्हां मूर्तिपूजकांकडून शकुन मागितला तेव्हां त्यानें मूर्तिपूजकांना असें उघडपणे सांगून दिले कीं आकाशाचा व पृथ्वीचा उत्पन्नकर्ता जो त्यांच्या लोकांचा देव होता त्यापेक्षा त्यांच्या मूर्तीवर त्याचा अधिक भरवसा होता. तद्वतच आम्हांला देवाचे ज्ञान आहे असें म्हणणारे जेव्हां सामर्थ्याचा व सूज्ञतेचा उगम त्याजकडे साहाय्यासाठी अगर मसलतीसाठी न जाता अंध:काराच्या सत्तेकडे वळतात तेव्हां तें देवाचा अपमान करीतात. असला मार्ग स्वीकारल्याने जर देवाचा कोप त्या दुष्ट व मूर्तिपूजेकडे वळणाच्या राजावर भडकला, तर जे त्याचे सेवक म्हणून म्हणतात त्यांनीही जर तोच मार्ग अवलंबिला तर तें त्याचे सेवक कसे होऊ शकतील ?CChMara 349.1