Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मादक दारू

    मादक दारू उपयोगांत आणावी असें पवित्रशास्त्रामध्ये कोठेच सांगितलेले नाहीं. काना येथील लग्न-मेजवानींत ख्रिस्ताने पाण्यापासून शुद्ध द्राक्षारस केला. हा “द्राक्षाच्या घोसांत नवा द्राक्षारस दृष्टीस पडला,” त्याविषयीं पवित्रशास्त्र म्हणते: “त्यात लाभ आहे. म्हणून त्याचा नाश करूं नका.” यशाय ६५:८. CChMara 317.4

    द्राक्षारस चेष्टा करणारा आहे,
    मद्य गलबला करणारें आहे,
    त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे.”
    हाय हाय कोण म्हणतो? अरेरे कोण करितो ?
    तंट्या भांडणांत कोण पडतो ?
    गार्‍हाणी कोण सांगतो, विनाकारण घाय कोणास होतात ?
    धुद्दी कोणाच्या डोळ्यांत असते ?
    जे फार वेळपर्यंत द्राक्षारस पीत राहतात,
    जे मिश्रमद्याचा पूर्ण आस्वाद घेण्यास जातात त्यांचा,
    द्राक्षारस कसा तांबडा दिसतो, प्याल्यांत कसा चमकतो,
    घशांतून खालीं कसा सहज उतरतो,
    हें पाहत बसू नको,
    शेवटीं तो सर्पासारखा दंश करितो
    फुरशीप्रमाणे झोंबतों.”
    CChMara 317.5

    नीतिसूत्रे २०:१; २३:२९-३२.

    मद्यपानाने झिंगलेला लाचार किती नीचतेला व दासत्वाला जाऊन पोहचतो त्याचे जे हुबेहुब चित्र रेखाटण्यांत आलेले आहे तसे दुसरे एखादें, मानवी चित्रकाराने कधीही रेखाटलेले नाहीं. तो दास्यत्वात जाऊन बेअब्रु झालेली असतें. एवढेच नव्हें तर आपली किती लाचारी झाली हें समजत असूनही त्याच्याने तें जाळे तोडवत नाहीं. तो म्हणाला, “त्यांनी मला ताडण केले तरी माझे कांहीं दुखले नाही, त्यांनी मला मारिलें तरी मला कांहीं लागले नाहीं; मी शुद्धीवर केव्हा येईन ? मी पुन: त्याचे सेवन करीन.” CChMara 318.1

    दारूनें जसा अंमल चढतो, तसाच तो बहुधा वाईन, बिअर व सायडर यांनीही चढतो. (वाईन द्राक्षारसापासून, बिअर बार्लीपासून व सायडर सफरचंदाच्या रसापासून बनविलेलेल मादक पदार्थ होत.) प्रकृतीने जे बळकट असतात अशांना या पेयांची चव लागते व अशा रितीने त्यांना दारूची सवय जडते. नेमस्तपणाने मद्यपान घेणें ही एक शाळाच होय व येथेच दारूबाजांना शिक्षण मिळते. सौम्य त-हेने मद्यपानाचे कार्य इतकें बेमालूम असतें कीं कसल्याही धोक्याचा संशय येण्यापूर्वीच तो दारूबाजीच्या धोपट मार्गात शिरलेला असता.CChMara 318.2

    मद्यानें झिंगण्याचे दुष्परिणाम दारूड्याच्या चरित्रावर कसकसे घडतात याची वाटाघाट करण्याची कांही गरज नसते. ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला व ज्यांच्यासाठी दृतगण शोक करीत असतात, असें हें कोत्या दृष्टीचे, धुदींत लोळत पडलेले नाशवंत मानव वंशज सर्वत्र पसरलेले आहेत ज्या सुधारणावस्थेचा आम्हांला अभिमान वाटतो त्यावर हें लोक कलंक असें आहेत प्रत्येक देशांमध्ये हें लोक लांच्छनास्पद, शापमय व घातक असें असतात. 7MH 330-333;CChMara 318.3