Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    विवाह हा कायदेशीर व पवित्र असतो

    खाण्यापिण्यात अगर लग्न करण्यांत आणि लग्न करून देण्यांत कसलेंहि पाप नसते. नोहाच्या काळीं लग्नव्यवहार कायदेशीर असत आणि आतांहि तें तसेच आहेत. मात्र जे काहीं कायदेशीर आहे त्याचा पापांत अतिरेक न होऊ देता यथायोग्य अशा कायदेशीर बंधनांत उपयोग करण्यांत यावा. परंतु नोहाच्या काळी देवाची संमत अगर सल्ला - मसलत न घेतां मानव लग्ने करीत व करून देत.CChMara 196.3

    ज्याअर्थी आमच्या चरित्रातील सर्व संबंध तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. त्याअर्थी आपल्या बोलण्याचालण्यांत फेरबदल करणे इष्ट होईल. वास्तवित पाहाता योग्य रितीने उपयोग केल्यास प्रीति ही कायदेशीरच असतें. नोहाच्या दिवसांत तिचा फाजील व बेफामपणे उपयोग केला गेला व त्यामुळे लग्नसंबध देवाच्या दृष्टीने पापमय झाले. सांप्रत काळींसुद्धा जगांतील अनेक जण केवळ विवाह व विवाहसंबध यातच इतके गर्क झालेले दिसतात कीं, त्यामुळे तें आपल्या आत्म्यांचा नाश करून घेत आहेत.CChMara 196.4

    विवाहसंबध पवित्र असतात, परंतु आजच्या कुटील पिढिमध्ये त्या संबंधात हरएक नीचता दिसून येते. जलप्रलयापूर्वी होत असलेले विवाहसंबंध जसे पापिष्ट असें मानले जात तसेच आजही त्यांचा दुरूपयोग करून तें पापिष्ट असें होत आहेत. विवाहाचे पवित्र स्वरुप व त्याचा अधिकार ओळखून घेतला तर आजसुद्धा त्याला दैवी मान्यता प्राप्त होईल आणि यामुळे उभय पक्षांना सुखप्राप्ति होऊन देवाचे गौरव होईलCChMara 196.5