Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    (पेज नं. ३४, ३५ नाही)

    पण मी तशीच आणखी शोक करीत राहिले नाही. मी स्वत:लाच म्हणाले, “एलन जी. व्हाईट, याचा अर्थ काय? जेथे तू जावे म्हणून कान्फरन्सने ठरविले तेथें जाणे तुझे कर्तव्य आहे असें तुला वाटल्यावरून तू आस्ट्रेलियाला आलीस ना? असें करण्याची तुझी रीत आहे ना?” मी म्हणाले, “होय.”CChMara 20.4

    “मग तू निराश का झालीस? हें सैतानाचे कार्य नाही का?” मी म्हणाले, “होय तसा माझा विश्वास आहे.”CChMara 20.5

    मी माझे अश्रू त्वरित पुसून म्हणाले, “पुरे झाले, मी यापुढे अंधार्‍या बाजूकडे पहाणार नाही मी जगो अगर मरो मी माझा आत्मा जो माझ्यासाठी मेला त्याला सोपवून देते.CChMara 20.6

    “नंतर माझा असा विश्वास बसला कीं, परमेश्वर सर्व गोष्टी बर्‍यासाठी करतो. या आठ महिन्यांच्या निराधार स्थितीत मला कधीहि संशय आला नाही का, निराशा वाटली नाही. मी या बाबतीत ही प्रभूची आपल्या लोकांसंबंधीची त्यांच्या बर्‍यसाठी योजना आहे असें समजते. म्हणजे जे अमेरिकेत आहेत व या देशांत आहेत त्यांच्यासाठी व माझ्यासाठीहि चांगली आहे. हें कसे आहे व का आहे हें मी सांगू शकत नाही. पण असा माझा विश्वास आहे आणि मी माझ्या दु:खांत आनंदीत आहे. मी माझ्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेवू शकते, त्याच्या प्रेमाविषयी मी संशय बाळगणार नाही.”CChMara 20.7

    मिसेस व्हाईट आपल्या वयाच्या शेवटल्या १५ वर्षांत कॅलिफोर्नियामधील आपल्या घरांत राहात असतांना त्या म्हाताच्या होत चालल्या होत्या. तरी त्यांनी शेतांतील कामांत गोडी दाखविली व शेजारच्या कुटुंबातील लोकांनी त्यांच्या कामांत मदत केली, म्हणून त्यांचे कल्याण चिंतिले. त्या नेहमी लिहिण्यांत गुंतलेल्या असत. विशेषत: त्या लवकर झोपी जात असल्यामुळे मध्यरात्रीनंतर त्या लिहिण्यास सुरुवात करीत असत. जर चांगला दिवस असेल व कांही काम नसेल तर त्या रानात फिरायला मोटारीतून जात व शेतात काम करीत असलेल्या प्रत्येक बाईशी थांबून भाषण करीत. कधीं कधीं त्यांना अन्न व वस्त्र यांची गरज असलेले भेटले व त्यांनी परत जाऊन आपल्या घरच्या पुरवठ्यांतून आणून त्यांना दिले आहे. त्यांच्या मरणानंतर अनेक वर्षे त्यांच्या राहिलेल्या ठिकाणच्या आसपासच्या शेजार्‍यांना त्यांची आठवण राहिली. कारण त्या जरी म्हाताच्या झाल्या होत्या तरी आवडीने त्यांना येशूविषयी सांगत होत्या. CChMara 21.1

    जेव्हां त्या वारल्या तेव्हां जीविताला लागणार्‍या वस्तु वाजवीपेक्षा जरा अधिक होत्या. त्यांनी कधीहि माझ्याकडे बघून वागा म्हटले नाही. कारण त्या एक से. डे, अॅडव्हेंटिस्ट अशा आपल्यापैकी होत्या. त्यांचा पुनरुत्थिन प्रभूवर विश्वास असून त्यानें नेमून दिलेली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावयाचा असें त्यांनी ठरविले होतें. अशा प्रकारे अंत:करणांत पूर्ण भरवसा धरून ख्रिस्ती अनुभवाला जुळणाच्या अशी पूर्ण आयुष्याचा शेवट त्यांनी पाहिला.CChMara 21.2