Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्त व सैतान यामधील महान् लढ्याचा दृष्टांत

    पूर्व अमेरिकेतील एका खेडेगावांतील एक लहान शाळागृह १८५८ च्या मार्च महिन्यांतील एका रविवार उपासनेकरिता जमलेल्या स्त्रीपुरुषांनी भरून गेले होतें. एल्डर जेम्स व्हाईट यांनी एका तरुणाच्या प्रेतक्रियेची उपासना चालविली होती. त्यांनी आपले भाषण संपवितांच जे शोक करीत होतें त्यांना दोन शब्द बोलण्याची श्रीमती ई.जी. व्हाईट यांना स्फूर्ती झाली. त्या उभ्या राहिल्या व एक दोन मिनिटे बोलून पुन: थांबल्या. लोक त्यांचे भाषण पुढे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे पाहूं लागले, तें थोडे आश्चर्यचकित झाले, कारण यांनी देवाला गौरव! असें तीनदा जोराने बोलतांना ऐकिले. श्रीमती व्हाईट त्यावेळी दृष्टांतात होत्या.CChMara 9.2

    श्रीमती व्हाईट यांना झालेल्या दृष्टांताची माहिती एल्डर व्हाईट यांनी लोकांना सांगितली त्यांनी म्हटले कीं, त्या सतरा वर्षे वयाच्या तरुणी असतांना त्यांना दृष्टांत झाले आहेत. आणखी त्यांनी त्यांना सांगितलें कीं, जरी त्यांचे डोळे उघड होतें व त्या कांही तरी दूरची वस्तु पाहात असल्यासारखे वाटत होतें, तरी त्यापूर्ण बेशुद्धावस्थेत होत्या व त्यांच्या आसपास काय चालले आहे त्याचे त्यांना भान नव्हते, त्यांनी गणना २४:४ व १६ ही वचने वाचली. त्यात म्हटले आहे कीं, “जो देवाची वचने श्रवण करितो, जो परात्पराचे ज्ञान जाणतो, जो डोळे उघडून सर्वसमयेचे दर्शन पावतो आणि दंडवत घालतो, त्याची ही वाणी आहे.”CChMara 9.3

    त्यांनी लोकांना सांगितलें कीं, त्या दृष्टांतात असतांना श्वासोच्छ्वास करीत नाहीत. दानीएल १०:१७ या वचनाकडे वळून दृष्टांतातील दानीएलाचा अनुभव सांगण्यास सुरुवात केली व म्हटले “मजमध्ये मुळी शक्ति राहिली नाही; माझ्यांत श्वास राहिला नाही.” मग ज्यांना पुढे येऊन श्रीमती व्हाईट दृष्टांतात असतांना तपासण्यास पाहिजे होतें त्यांना एल्डर व्हाईटने पुढे बोलाविले. अशी तपासणी करण्यास त्यांनी लोकांना मोकळीक दिली व त्या दृष्टांतात असतांना डॉक्टरने येऊन त्यांना तपासले तर बरे होईल अशी इच्छा दर्शविली.CChMara 9.4

    लोक पुढे आल्यावर त्यांना दिसले कीं, मिसेस व्हाईट श्वासोच्छ्वास करीत नाहीत, तरी त्यांचे हृदय बरोबर चालले होतें व त्यांच्या गालाचा रंग स्वाभाविकच होता. एक आरसा आणून त्यांच्या तोंडापुढे धरला, पण आरशावर कांही तोंडांतील वाफेची आर्द्रता आढळली नाही. नंतर त्यांनी एक मेणबत्ती आणून ती लाविली व ती त्यांच्या तोंडाजवळ व नाकाजवळ धरली. तरी तिची ज्योत न हालतां स्थिर राहिली. लोकांना समजले कीं, त्या श्वासोच्छ्वास करीत नाहीत. त्या खोलीतून फिरल्या व हलकेच आपले हात हालवून त्यांना प्रगट झालेले थोडक्यात सांगू लागल्या. दानीएलाप्रमाणे प्रथमत: त्यांच्यातून स्वाभाविक शक्ति निघून गेली होती व असामान्य शक्ति त्यांना देण्यांत आली होती. दानीएल १०:७,८,१८,१९.CChMara 9.5

    मिसेस व्हाईट दोन तास दृष्टांतात होत्या. या दोन तासांत त्यांनी एकदाही श्वासोच्छ्वास केला नाही, नंतर दृष्टांत संपत येताच त्यांनी दीर्घ श्वास घेतला, क्षणभर थांबून पुन: श्वासोच्छ्वास केला आणि मग त्या स्वाभाविकरीत्या श्वासोच्छ्वास करूं लागल्या. त्याचवेळी त्यांना शुद्धि येऊन आसपासचे कळू लागले. CChMara 10.1

    मिसेस व्हाईटला ज्यांनी सतत दृष्टांतात पाहिलें त्या मिसेस मार्था अ‍ॅमाडॉन पुढील माहिती सागतात.CChMara 10.2

    “दृष्टांतात त्यांचे डोळे उघडे असत. त्यांच्यांत श्वास नसे पण त्यांच्या हातांची, मनगटांची व बाहची हलकीच हालचाल होत असें. त्या जे पाहात तें दर्शवीत असें. त्यांचे हात किंवा बाह कोणालाहि हालविता येत नव्हते. त्या नेहमी एकेक शब्द उच्चारीत व कधीं आपल्या आसपास असणारांना वाक्ये बोलून स्वर्गाचा किंवा पृथ्वीचा जो देखावा पाहिला असेल त्याविषयी सांगत असत.CChMara 10.3

    “दृष्टांतातील त्यांचा पहिला शब्द “गौरव” असून तो प्रथम मोठ्यानें ऐकू येत असें व शेवटी कमी कमी होऊन नाहीसा होत असें आणि कधीं कधीं या गोष्टीची पुनरावृत्ती होत असें.CChMara 10.4

    “दृष्टांताच्या वेळी जे हजर असत. तें गोंधळून जात नसत. कशाची भीति नसे. तो एक गंभीर व शांत देखावा असें.CChMara 10.5

    “जेव्हां दृष्टांत संपत असें व स्वर्गीय उजेडाचा देखावा त्यांच्या दृष्टि आड होई आणि पुनः एकदा या पृथ्वीवर जणू काय परत येत आहे, तेव्हां त्या आपला पहिला स्वाभाविक श्वास घेत असतांना मोठा उसासा ठाकून ‘अं-धा-र’ म्हणत, आणि मग त्या शक्तिहीन होऊन लंगडत असत. CChMara 10.6

    पण शाळागृहांतील दोन तास चाललेल्या दृष्टांताच्या गोष्टीकडे आपण वळले पाहिजे. या दृष्टांताविषयी मिसेस व्हाईट यांनी नंतर लिहिले आहे.CChMara 10.7

    “ख्रिस्त व सैतान यांमधील युगानयुगांतून चालत आलेल्या महान् लढ्याविषयी दहा वर्षांपूर्वी मी पाहिलेली सर्वांशी बाब पुन: दाखविण्यांत आली व ती लिहून काढण्यास मला सांगण्यांत आलें.” CChMara 10.8

    दृष्टांतात त्यांना वाटले कीं, त्यांच्यासमोर दिसणारे देखावे पाहण्यासाठी त्या हजर होत्या. पहिल्यानें असें वाटले कीं त्या स्वार्गत होत्या लुसिफराचे पाप व पतन त्यांनी पाहिलें. नंतर या जगाची उत्पत्ति त्यांनी पाहिली व आपले मुळ आईबाप एदेनांतील गृहात त्यांना दिसले. तें सापाच्या मोहाला वश झालेले व बागेतील गृहांतून त्यांना हाकलून दिलेले त्यांनी पाहिलें, द्रुत गतीने पवित्रशास्त्राचा इतिहास त्यांच्यापुढून नेला. त्यांनी इस्राएलाचे भविष्य वादी व कुलपति यांचे अनुभव पाहिलें, नंतर त्यांनी आपला तारणारा येशू ख्रिस्त यांचे जीवन व मरण पाहिलें व जेथे आपला प्रमुख योजक या नात्याने सेवा करीत आहे त्या स्वर्गाकडे त्याचे आरोहण झालेले पाहिलें. त्या नंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत शिष्य सुवार्ता गाजवीत असलेले त्यांनी पाहिलें, यानंतर किती लवकर धर्मत्याग व अंधारे युग आलें! नंतर त्यांनी दृष्टांतात धर्मसुधारणा करणारे श्रेष्ठ पुरुष व स्त्रिया यांना आपले जीव सत्याकरता धोक्यात घालतांना पाहिलें. नंतर त्यांना १८४४ सालांत सुरु झालेल्या न्यायाच्या देखाव्याकडे आणण्यात आलें, नंतर त्यांना आपल्या दिवसांत व भविष्य काळांत नेण्यांत आलें आणि त्यांनी येशूला ढगावर बसून येतांना पाहिलें. त्यांनी सहस्त्र वर्षांचा काळ व नवीन पृथ्वी यांचा देखावा पाहिला. CChMara 10.9

    आपल्या समोरील या सर्व विविध देखाव्यासह मिसेस व्हाईट यांनी दृष्टांतात जे ऐकिले व पाहिलें तें घरी परतल्यावर लिहून काढण्याचे त्यांनी हाती घेतले. सुमारे सहा महिन्यानंतर २१९ पृष्टाचा एक लहान ग्रंथ छापखान्यांतून बाहेर पडला. त्याचे नांव, “येशू ख्रिस्त व त्याचे दिव्यदूत आणि सैतान व त्याचे दृत यांमधील महान् लढा.” CChMara 11.1

    हा लहान ग्रंथ मोठ्या आवडीने स्वीकारण्यांत आला. याचे कारण मंडळीसमोर असलेला अनुभव स्पष्टरित्या दर्शविण्यांत आला आहे आणि सैतानाच्या योजना उघडकीस आणून पृथ्वीवरील शेवटच्या झगड्यांत तो मंडळी आणि जग यांना फसविण्याचा कसा प्रयत्न करील हें दाखविण्यांत आलें आहे. या शेवटल्या काळांत संदेशाच्या आत्म्याद्वारे देव त्यांना वचन दिल्याप्रमाणे बोलत होता. याबद्दल अॅडव्हेंटिस्ट लोक कितीतरी उपकारीक होतें.CChMara 11.2

    या महान् लढ्याची माहिती “स्पिरीच्युएल गिफ्ट” नावाच्या लहान ग्रंथांत संक्षिप्तरुपाने सांगतली आहे व ती ‘अर्लीरायटिंग’ नावाच्या ग्रंथांत शेवटल्या अर्ध्या भागांत छापिली आहे व तो आजही आढळू शकेल. CChMara 11.3

    जस जशी मंडळी वाढू लागली व कांही काळ लोटला तसे प्रभूने येणाच्या दृष्टांतात विस्तृतरित्या मोठ्या लढ्याची गोष्ट सुरु केली आणि मिसेस व्हाईट यांनी ती १८७० तें १८८४ या अवधींत “स्पिरीट ऑफ प्राफेसी” नावाच्या ग्रंथांतील चार भागांत पुन: लिहिली. ‘दि स्टोरी ऑफ रिडमशन’ या पुस्तकांत महान् लढ्याच्या गोष्टीच्या फार महत्त्वाच्या भागाची माहिती दिली अहे. हा ग्रंथ अन्य भाषेंत छापला असून या महान लढ्याच्या दृष्टांतात दर्शविलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. याशिवाय मिसेस व्हाईट यांनी “कॉन-फ्लिक्ट ऑफ दि एजेस सिरीस” नावाच्या ग्रंथांतील पाच विभागांत म्हणजे, पॅट्रिअर्कस् अँड प्रॉफेटस्, प्रॉफेटस् अँडू किंग्ज, दि डिझायर ऑफ एजेस, अॅक्टस् ऑफ दि अपोस्टल्स आणि दि ग्रेट कॉन्टरवर्सी या पुस्तकांत विस्तृतरित्या सर्व महान् लढ्याची माहिती दिली आहे.CChMara 11.4

    पवित्रशास्त्रांतील उत्पत्ति व ख्रिस्ती काळा याविषयीची माहिती काळाच्या शेवटापर्यंतची जी गोष्ट आहे तीच माहिती या वरील पुस्तकांत आलेली असल्यामुळे त्याद्वारे प्रकाश व धैर्य प्राप्त होतें. ह्या पुस्तकाद्वारे से.डे. अॅडव्हेंटिस्ट लोकांना प्रकाशाची मुलें व उजेडाची मुलें बनण्यास मदत होतें. आम्ही या अनुभवांत पुढील आश्वासनाची पूर्णता झालेली पाहातो. CChMara 11.5

    “खरोखर प्रभु परमेश्वर आपले सेवक सदेष्टे यास आपले रहस्य प्रगट केल्याशिवाय कांही करीत नाही.” आमोस ३:७.CChMara 11.6

    “या पुस्तकांत हा प्रकाश त्यांच्याकडे कसा आला याविषयीच्या महान् लढ्याची माहिती लिहितांना मिसेस व्हाईट म्हणतात.CChMara 11.7

    “पवित्र आत्म्याच्या प्रकाशाद्वारे बर्‍य वाईटामधील मोठ्या लढ्याचा देखावा, या पुस्ताकची पाने लिहितांना लेखकाला दाखविण्यांत आला आहे. वेळोवेळी वेगवेगळ्या युगांत जीवनाचा राजा, ख्रिस्त तारणाचा कर्ता आणि दुष्टतेचा राजा, पापाचा कर्ता व देवाच्या पवित्र नियमांचा प्रथमच उल्लंघन करणारा सैतान यामधील महान् लढ्याचे कार्य पाहाण्याची संधि मला मिळाली आहे. CChMara 11.8

    “देवाच्या आत्म्याने आपल्या वचनांतील महान् सत्यें, भूतकाळ व भविष्यकाळ यांचा देखावा मला दाखविल्यानंतर मला तें इतरांस सांगण्यासाठी आज्ञा करण्यांत आली. भूतकाळांतील या लढ्याचा इतिहास शोध काढणे व तरी त्या भविष्यकाळांत येणार्‍य लढ्याविषयी प्रकाश पडण्यासाठी विशेषत: मांडणे हें करण्यास सांगितलें आहे.”CChMara 12.1