Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    निसर्गाला देव बनविण्याची सैतानाची योजना

    जड सृष्टीच्यासिद्धांताविषयी आणि निसर्गाच्या नियमाविषयी विचार करताना निरतर व प्रत्यक्ष सूत्रवारित्व (प्रभुत्व) पुष्कळांच्या लक्षात येत नाही. तें (लोक) अशी कल्पना करितात कीं (सुचवितात कीं) निसर्ग ईश्वरविरहीत स्वतंत्रपणे आपले कार्य करीतो. त्याच्या त्याला मर्यादा असतात व कार्य करण्याच्या त्याच्या त्याला शक्ति असतात. नैसर्गिक व स्वर्गीय यामध्ये अगदीच निराळेपणा आहे असें त्यास वाटते सर्वसाधारण घडामोडीत निसर्गाचे कार्य चालून त्याचा देवाच्या सामर्थ्यांशी संबंध नसतो. जड सृष्टीत जीवनशक्ति असतें व निसर्गाला दैवत करण्यांत येते. जड वस्तुला एक क्षेत्र दिलेले असतें व तत्संबंधांतील नियमाप्रमाणे तिचे कार्य चालते असें गृहीत धरलेले असतें. त्या नियमांत किंवा बंधनात देव हात घालू शकत नाही. निसर्गाला कांही गोष्टींचे स्वामित्व दिलेले असतें व नैसर्गिक बंधनांच्या अनुरोधाने त्यांचे कार्य चालते आणूि मूळ अनुज्ञेप्रमाणे सर्व काही घडते. CChMara 352.7

    हे विज्ञानशास्त्र खोटे आहे; देवाच्या शास्त्रात याला कांही आधार नाही. देव आपले कायदे उल्लेघित नसतो. उलट तें त्याच्या हातांतील कार्यसाधना म्हणून तो त्यांचा निरंतर उपयोग करितो. तें (देवाच्या निसर्गाचे सिद्धांत) आपण होऊन स्व:क्रियाशील नाहीत. निसर्गाच्या कार्यक्रमात देव एकसारखा गुंतलेला असतो. निसर्ग तर देवाचा चाकर असून त्याला वाटेल त्याप्रमाणे तो त्याजकडून चाकरी करून घेतो. देव जो आपल्या सर्व कार्यात आपल्या इच्छानुरूप कारभार करितो त्या देवाच्या समक्षतेविषयी व त्याच्या कर्तबगारीविषयी निसर्ग आपल्या कार्यात साक्ष देत असतो. निसर्ग आपल्या मुलभूत सामर्थ्याच्याद्वारे वर्षानुवर्षे पृथ्वीतील उदार दाने आम्हांला देऊ शकत नाही आणि सूर्याभोवती ती फेर्‍य मारू शकत नाही. ईश्वराचा सर्व समर्थ हल्ला या ग्रहाला अखंडपणे मार्गदर्शन करीत आहे. देवाचेच सामर्थ्य पृथ्वीची प्रदक्षिणा प्रत्येक घडीला स्थिर ठेवीत असते.CChMara 353.1

    मानवी देहाची घटना संपूर्णत: आम्हांला समजून येत नाही. अति बुद्धिवंतालासुद्धा त्यांतील गुढ गोष्टी गोंधळून सोडतात. ती घटना अशी कांही नाही कीं ती चालूं केली कीं सतत चालूं राहते. नाडीही उडणे व श्वासोच्छावही चालतो देवामध्ये आपण जगतो, हालचाल करितो व आमचे अस्तित्व धरीतो. प्रत्येक श्वास व हृदयांचा ठोका, सदा सिद्ध असणार्‍य परमेश्वराच्या शक्तीची अखंड साक्ष देतो. CChMara 353.2

    निसर्गामध्ये ज्या गुढ गोष्टी आहेत त्या अत्यंत बुद्धिवान माणसांना कळून नाहीत ईश्वरी प्रेरणेकडून असें अनेक प्रश्न उद्भवतात कीं तें मोठमोठ्यानामंकित विद्वानांना त्यांचे उत्तर देता येत नाही. आम्ही त्यांची उत्तरे द्यावीत म्हणून तें प्रश्न विचारण्यात आलें नव्हते, परंतु देवाच्या ज्या गुढ गोष्टी आहेत त्या आमच्या लक्षात याव्यात व आमची बौद्धिक चलाखी किती मर्यादित आहे हें आम्ही शिकून घ्यावे; आमच्या रोजच्या वातावरणात अशा पुष्कळच गोष्टी आहेत कीं आमच्या मर्यादित समजशक्तीच्या पार पलीकडे आहेत. देवाचे न्यायसामर्थ्य व त्याचे उद्देश आमच्या हाताशी येऊ शकत नाहीत. त्याची चतुराई अथांग आहे. CChMara 353.3

    येथे सुरू केलेले शिक्षण ह्या आयुष्यांत पुरे होणार नाही. तें कालांतापर्यत चालूच राहील. निरंतर प्रगत राहील व कदापि पूर्ण व्हायचे नाही. रोज रोज देवाची दिसून येणारी अद्भुत कृत्य आणि विश्वाची उत्पत्ति करून तें स्थिर राखण्याचे त्याचे अलौकिक सामर्थ्य याचे पुरावे हें आमच्या मनापुढे नवीन सुंदरता करितील. सिंहासनापासून प्रज्वलित होणाच्या प्रकाशात सर्व गुढ गोष्टी नाहीशा होतील व ज्या गोष्टी पूर्वी कधीही उमजून आल्या नाहीत त्यांचा साधेपणा पाहून मन आश्चर्यचकित होईल. CChMara 353.4