Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ४४ वें - तरुणांना आव्हान

    प्रिय तरुण मित्रहो, जे काहीं तुम्ही पेरता त्याचीच तुम्ही कापणीही करणार आहा तुम्हांसाठी हा पेरणीचा प्रसंग आहे. तेव्हां हंगाम कसा काय व्हावयाचा ? तुम्ही कशाची पेरणी करितां ? तुमच्या तोडांतला प्रत्येक शब्द, तुमचे प्रत्येक कार्य, हेच पेरावयाचे ब होय. त्याला येणारे फळ चांगले तरी निपजेल किंवा वाईट तरी निघेल त्यावरुन पेरणार्‍यला आनंद तरी होईल किंवा दु:ख तरी वाटेल. जसे पेरावे, तसेच कापावे. देवाने तुम्हांला मोठा प्रकाश व भरपूर सवलती दिलेल्या आहेत. हा प्रकाश देऊन टाकल्यावर व तुम्हांपुढे काय काय संकटे आहेत तीं स्पष्टपणे दाखवून दिल्यावर पुढची जबाबदारी तुम्हांवर येऊन पडते. तुम्हांला दिलेल्या प्रकाशाचा म्हणजे ज्ञानाचा जसा तुम्ही उपयोग कराल, तसे सौख्य अगर शाप तुमच्या पदरात पडेल. तुमच्या प्रारंभाचे मालक तुम्हीच आहां. CChMara 254.1

    इतरांचे मनावर व शिलावर तुम्ही सर्वांचे वजन पडेल, तें बरे तरी असेल किंवा वाईट तरी होईल. व या परिणामाची नोंद स्वर्गीय ग्रंथात केली जाईल. कोणी तरी देवदूत तुम्हांसह असून तो तुमच्या शब्दांचे व कृतींचे टिपण घेत असतो. प्रात:काळी तुम्ही उठता तेव्हां आपण किती निराधार आहों व देवाच्या सामर्थ्याची आपणास केवढी गरज आहे, हें तुमच्या मनात येते का? विनम्र बुद्धीनें व अंत:करणपूर्वक आपल्या उणीवा स्वर्गीय पित्यासमोर ठेवितां का? असें असेल तर देवदूत तुमच्या प्रार्थनांची दखल घेतील. न कळत अन्यायांत राहाण्याच्या व इतरांना अन्यायात पाडण्याच्या जर तुम्ही कचाट्यात असाल तर तुमच्या ढोंगी ओठाच्या प्रार्थना पुढे सरकणार नाहींत. तेव्हां तुमचा सरक्षक दृत तुमच्या साहाय्याला येईल, सद्भाषणाच्या व सत्कृतींच्या अधिक सोईस्कर मार्गाने जाण्यच तो तुम्हांला उत्तेजन देईल. CChMara 254.2

    आपण कसल्याही कचाट्यात नाहीं असें जर तुम्हांला वाटत असेल व मोहाचा प्रतिकार करण्यासाठी व साहाय्यासाठी तुम्ही जर प्रार्थना करीत नसाल, तर खात्रीने तुम्ही चुकीच्या मार्गात आहा, हें समजून घ्या. आपल्या कर्तव्याची तुम्हीं केलेली हेळसाड देवाच्या स्वर्गीय नोंद पुस्तकात टिपली जाईल व न्यायाच्या दिवशी आपण उणे आहो असें आढळून येईल.CChMara 254.3

    तुम्हांसभोवती असलेल्या काहींना धार्मिक शिक्षण देण्यांत आलें असेल, काहींना मनसोक्त वागू देत असतील, काहींना कौतुकाने वागविण्यात येत असेल, कित्येकांची फाजील वाहवा करण्यांत येत असेल, कित्येकांची प्रशंसा करण्यांत येत असेल व हें इतके होतें कीं तें प्रत्यक्ष व्यवहारांत अगदी निरर्थक असें झालेले असतात. मला माहित असलेल्या लोकांविषयी मी बोलत आहे फाजील लाडानें, शाबासकीने आणि सुस्तीने तें इतके गुरफटून गेलेले असतात कीं हें जीवन जगण्यास तें निरर्थक असें झालेले असतात. जर ऐहिक जीवनासाठी तें असें निरुपयोगी ठरतात तर ज्या भावी जीवनामध्ये सर्व प्रकारची शुद्धता व पवित्रता आहे व ज्या ठिकाणी सर्व स्वभावधर्म सुसंगतीचे आहेत तेथें याचे काय? मी ह्या लोकांसाठी प्रार्थना केलेल्या आहेत, मी त्यांना स्वत: संदेश दिलेले आहेत. मला असें दिसून आलेले आहे कीं, हें आपल्या सहवासाने इतराची मने निरर्थकतेकडे नेतील. पोषाखाच्या फंदात पाडतील व सार्वकालिक हिताविषयी त्यांस बेफिकिर करितील. अंत:करणे विनम्र करावीत व आपलीं पायें पदरी घेऊन अंतर्यामानं पालटून जावें, एवढीच मात्र आशा ह्या लोकाविषयी उरलेली आहे.CChMara 254.4