Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मद्यपान मानवाला गुलाम बनवितो

    देवाच्या प्रतिरूपाप्रमाणें होण्यासाठी मानव उत्पन्न केलेला असताना तोच जेव्हां जोमदार दारूपानाच्या फंदात पडून जाणूनबुजून दारू तोंडात घेतो, तेव्हां तो स्वत:ला पशूप्रमाणे निचावस्थेत आणून सोडितो. विवेक नेभळट होऊन जातो, बुद्धि गारठून जाते, वैषयिक मनोविकार जागृत होतात व याउपर अत्यंत नीचांतील नीच प्रकारचे गुन्हे होऊ लागतात. 83T 561;CChMara 318.4

    दारूपानाच्या लहरींत पडल्यामुळे त्यांच्या हातून अशा कांही गोष्टी घडतात कीं जर त्यांनी दारूची चवच घेतली नसती तर त्या गोष्टी पाहन तें थरारून गेले असतें. त्या विषारी पेयाच्या आधीन आहेत तोवर तें सैतानाच्या ताब्यात असतात. त्यांच्यावर त्याचा अधिकार असतो व तें त्याचे सहकारी असतात. 9Te. 24;CChMara 318.5

    मद्यपानासाठीं आपले आत्मे विकून टाकतात व तो मोह घालण्यासाठीं सैतान कार्य करीत असतो. मानवाच्या शरीराचा, मनाचा व आत्म्याचा ताबा सैतानाच्या हाती असतो तेव्हां व्यवहार करणारा तो मनुष्य नसून खुद्द सैतानाच तो चालवीत असतो. मरेपर्यंत मी तुजवर प्रीति करीन व तुझा संभाळ करीन असें अभिवचन दिलेल्या पत्नीवर जेव्हां तो दारूडा हात उगारितो तेव्हां सैतानाची क्रूर बुद्धि दिसून येते. दारूड्याच्या कार्यामधून सैतानाची जबरदस्ती व्यक्त केली जाते. 10MM 114;CChMara 318.6

    मद्यपानी लोक स्वत: होऊन सैतानाचे गुलाम बनतात. रेल्वेवर व जहाजांवर जबाबदारीच्या हुद्यांवर असणार्‍य लोकांना तो मोहमशांत पाडितो, मूर्तिपूजक करमणुकीसाठीं बोटींतून व मोटर गाड्यांतून गर्दीने प्रवास करणाच्या मंडळीसही तो भुलवीत राहतो व अशा रितीने त्यांस देवाची व त्याच्या कानूकायद्याची भुरळ पडून जाते.CChMara 319.1

    आपण काय करितों हें त्यांना कळून येत नाहीं. सूचनाखातर दिलेल्या खुणा चुकीच्या असतात व गाड्यागाड्यांची टक्कर होतें. मग अति भय, नुकसान व मरण पदरात पडते व ही असली परिस्थिति वाढत वाढत जाते. CChMara 319.2

    दारूड्याच्या चालीरिती त्याच्या वंशजात उतरतात व त्या पिढीजात चालतात. 11Te. 34, 38;CChMara 319.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents