Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    मंडळीच्या सभासदांना शिक्षण देणारे कामगार

    हें स्पष्ट आहे कीं, जे सर्व उपदेश करण्यांत आलें आहेत, त्यांकडून स्वनाकार करणारे पुष्कळ कामगार बनले नाहींत हा विषय फार गंभीर व परिणामयुक्त मानला पाहिजे. सर्वकाळासाठी आमचे भवितव्य पणाला लावले आहे. मंडळ्या जात आहेत कारण त्यांनी आपल्या देणग्याचा उपयोग प्रकाश सभोंवार पसरविण्यासाठी केलेला नाही. आपल्या धन्यापासून मिळणार्‍य धड्याचे शिक्षण काळजीपूर्वक दिले पाहिजे; अशासाठीं कीं, त्यांनी आपला प्रकाश व्यवहारिक उपयोगांत आणावा, ज्यांना मडठ्यांच्या बाबतीत दूरदृष्टी आहे त्यांनी कर्तबगार सभासद निवडावे व त्यांना जबाबदारी धावी’ त्याचवेळी उत्तम प्रकारे इतरांची कशी सेवा करून कसा आशीर्वाद देऊ शकतील याविषयींचे शिक्षण दिले पाहिजे. 146T 431;CChMara 66.3

    कारागीर, वकील, व्यापारी सर्व प्रकारचे धंदेवाईक हें सर्व स्वत:ला असें शिक्षण देतात कीं, त्याकडून तें आपल्या धंद्यांत निष्णांत होतात. ख्रिस्ताच्या अनुयायांनी कमी हुशार असावे काय? त्याच्या सेवेत गुंतलो असतां त्या सेवेसाठी उपयोगात आणावयाच्या भागाची माहिती ने घेणें योग्य आहे काय? सार्वकालिक जीवन मिळविण्याचे धाडस करणे हें पृथ्वींतील कोणत्याह विचारापेक्षा उच्च आहे. ख्रिस्ताकडे आत्मे वळविण्याकरिता मनुष्य स्वभावाचे ज्ञान असले पाहिजे व मानवी मनाचा अभ्यास केला पाहिजे. सत्याच्या मोठ्या विषयाबाबत पुरुष व स्त्रिया यांना भेटण्याकरिता काळजीपूर्वक पुष्कळसा विचार व सततची प्रार्थना, हीं पाहिजेत. 154T 67; CChMara 67.1

    मंडळी स्थापन झाल्याबरोबर पाळकानें सभासदांना कार्य करण्यास द्यावे. विजयाने कार्य कसे करावे याविषयी त्यांना शिकविले पाहिजे. पाळकाने उपदेशापेक्षा शिकवण्याकडे जास्त वेळ खर्च करावा. लोकानी जे ज्ञान मिळवून घेतले आहे तें इतरांना कसे द्यावे हें त्यांना शिकवावे. कार्यात अधिक अनुभव असलेल्याकडून सल्ला घेण्यास नवीन पालट झालेल्याना शिकवावे व पाळकाला देवाच्या ठिकाणीं मानू नये हेही शिकवावे.CChMara 67.2

    आपल्या लोकांना मोठी मदत देण्यांत येईल ती ही कीं, देवाकरता काम करण्यास व पाळकाऐवजी त्याजवर अवलंबून राहाण्यास त्यास शिकवावे. ख्रिस्ताने जसे काम केले तसे काम करण्यास त्यांनी शिकावे त्यांनी त्याच्या कामगारांच्या सैन्यात येऊन मिळावे व त्याच्याकरिता विश्वासूपणे सेवा करावी. 167T 19, 20; CChMara 67.3

    शिक्षकांनी लोंकामध्ये काम करून मार्गदर्शन करावे व इतर त्यांना मिळाल्यामुळे त्याच्या दाहरणावरून तें शिकतील. पुष्कळ शिकवणुकीपेक्षा एक उदाहरण फार महत्त्वाचे आहे. 17MH 149;CChMara 67.4

    मंडळीची आत्मिक दृष्टि ज्यांना आहे त्यानी देवाच्या कार्यात कांही तरी भाग करण्यास मंडळीच्या प्रत्येक सभासदाला सधि देण्यासाठी मार्ग शोधून काढावा. हें पूर्वी करण्यांत आलेले नाहीं. त्याच्या सेवेत सर्वाच्या देणग्याचा उपयोग केला जाईल अशा योजना अमलांत आणल्या गेल्या नाहीत. ह्यामुळे किती नुकसान झाले आहे हें थोडक्यानाच समजते.CChMara 67.5

    प्रत्येक मंडळींत देणगी आहे व तिची योग्य कामाद्वारे या कार्यात मोठी मदत होण्यासाठी वाढ करता येईल. कामगारांना नेमण्याच्या बाबतींत उत्तम योजना असावी ती अशी कीं त्याद्वारे तें लहान असोत कीं, मोठे असोत मंडळ्यात जाऊन मंडळीच्या उन्नतीप्रित्यर्थ काम करण्यास तें सभासदांना शिकवितील व विश्वास न ठेवणाच्यांनाहि शिकवतील. शिक्षण व कामाच्या पद्धति याची आवश्यकता आहे. या काळासाठी काम करण्याच्या बाबतीत त्यांनी आपले मन व अंत:करण घालून हशार बनावे व जी त्यांना देणगी उपजतच आहे तिच्याद्वारे त्यांनी स्वत:ची लायकी बनवावी.CChMara 67.6

    आपल्या मंडळीच्या उन्नतीप्रित्यर्थ जें आवश्यक आहे तें म्हणजे शहाण्या कामगारांचे उत्तम कार्य होय. त्याद्वारे मंडळींतील देणगी ओळखून तिची वाढ करणे व आपल्या धन्याच्या सेवेसाठी तिचा उपयोग करणे हें होय. जे मंडळ्यांच्या भेटी घेऊ इच्छितात त्यांनी भावाबहिणींना मिशनरी कार्य करण्याच्या व्यवहारिक पद्धति शिकवाव्यात. तरुणाच्या शिक्षणाचाही वर्ग असावा. तरुण पुरुष व स्त्रिया यांना आपल्या घरात, आपल्या शेजार्‍यांत व मंडळींत कामगार बनण्यास शिक्षण द्यावें. 18An Appeal to Ministers and Church Officers,CChMara 67.7

    स्वर्गीय दुत मानवी हस्तकांसाठी म्हणजे मंडळीच्या सभासदासाठी महान कार्य करण्यास त्यांच्याबरोबर सहकार्य करण्यास थांबले आहेत तें तुम्हांकरितांहि थांबले आहेत क्षेत्र इतकें अफाट आहे व योजना इतकी मोठी आहे कीं, प्रत्येक पवित्र केलेले अंत:करण, दैवी शक्तीचे साधन म्हणून त्याच्या सवंत हिरीरीने भाग घेईल. 199T 46, 47;CChMara 68.1

    जर ख्रिस्ती लोक योग्य रितीने वागतील, एकजुटाने एका अधिपतीखाली एकच हेतु सिद्धीस नेण्यास पुढे होतील तर तें जगाला हालवून सोडतील. 2097 221; CChMara 68.2

    चव्हाट्यावर पाचारण केले पाहिजे अशासाठीं कीं, ज्यांना जागतिक कार्यात भाग आहे त्यांना व शिक्षक आणि लोकांचे पुढारी यांना सुवार्ता सांगण्यांत यावी. जे सार्वजनिक कार्यात भाग घेणारे आहेत-उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षक, वकील, न्यायाधीश, सरकारी अधिकारी व व्यापारी यांना स्पष्ट संदेश दिला पाहिजे. “मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मनुष्याने आपल्या जीवाचा मोबदला काय द्यावा ?” मार्क ४:३६, ३७.CChMara 68.3

    जे दुर्लक्षित झालेले आहेत त्यांच्याविषयी आपण बरेच बोलतों व लिहितों; पण दुर्लक्ष झालेले जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे थोडेही लक्ष देऊ नये काय ? पुष्कळांना हा वर्ग गैरआशेचा वाटतो आणि सैतानाच्या शक्तीने जे अंध बनले आहेत व दिपून गेले आहेत त्याचे डोळे उघडण्यास तें थोडे कांहीं तरी करितात हजारों श्रीमंत लोक इशारा न ऐकता कबरेंत गेले आहेत. कारण त्यांची वर वर पारख केली गेली व निरुपयोगी म्हणून सोडून दिले. पण कदाचित् तें वेगळे भासतील पण मला असें दाखविण्यांत आलें आहे कीं या वर्गाचे पुष्कळ लोक आत्म्याची कळकळ बाळगणारे असतात. हजारो श्रीमत माणसें आत्मिक अन्नाशिवाय उपाशीं मरत आहेत. पुष्कळ अधिकार्‍यांना त्यांच्याजवळ नाही अशा गोष्टींची गरज भासते. त्यापैकी काहीं उपासनेला जातात कारण त्यांना असें वाटते कीं त्यांना कांही फायदा होणार नाही तें जी शिकवण ऐकतात त्याकडून त्यांच्या आत्म्यांना स्पर्श होत नाही. त्यांच्याकरिता आम्ही व्यक्तिवाचक खटपट करुं नये काय ? कांहीं म्हणतील कीं, त्यांना आपण वाङ्मयाद्वारे भेटू शकत नाहीं काय? असें पुष्कळ आहेत कीं त्यांना याद्वारें आपण भेटू शकत नाही. त्यांच्याकरिता व्यक्तिवाचक खटपट पाहिजे. विशेष इशारा ऐकण्याऐवजी त्यांना नाश पावू द्यावे का? प्राचीन काळांत असें नव्हते देवाचे सेवक जे उच्च पदावर आहेत त्यांना सुवार्ता सागण्यास पाठविण्यात आलें होतें. अशासाठी कीं, प्रभू येशू ख्रिस्तांत फक्त त्यांना विसावा व शांति प्राप्त व्हावी.CChMara 68.4

    स्वर्गाचा राजा या पतित मानवाला शोधण्यास व तारण्यास या जगांत आला. त्याचे कार्य फक्त मागासलेल्या लोकांसाठी नव्हते पण मानाच्या जागेवर जे आहेत त्याच्यासाठीही होतें. जे त्याच्या आज्ञा पाळींत नव्हते व ज्यांना देवाची माहिती नव्हती अशा वरच्या वर्गातील आत्म्यांना भेटण्याचे कार्य त्यानें केले.CChMara 68.5

    ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर तेच कार्य चालूं होतें. कर्नेल्य जमादारामध्ये प्रभूने जी गोडी दाखविली होती त्याविषयी वाचून माझे अंत:करण फार मऊ झाले आहे. कर्नेल्य हा उच्च हा दर्जाचा मनुष्य होता म्हणजे रोमी सैन्यांत अधिकारी होता. पण त्याला जो प्रकाश मिळाला होता त्याप्रमाणे तो कडक रितीने वागत असें. प्रभूनें स्वर्गातून त्याला एक विशेष संदेश दिला व दुसर्‍य संदेशाद्वारे पेत्राला त्याला भेटण्यास व प्रकाश देण्यास सागण्यात आलें. जे सत्यप्रकाशासाठी शोध करीत आहेत व प्रार्थना करीत आहेत त्याच्याकरिता देवाची प्रीति व कळकळ याविषयींच्या विचाराने आपणास फार मोठे धैर्य यावें. CChMara 69.1

    कर्नेल्याप्रमाणे पुष्कळजण मला दाखविण्यांत आलें. आपल्या मडळीशी त्यांचा संबंध असावा अशी त्यांच्याविषयी देवाची इच्छा आहे. त्यांची सहानुभूति प्रभूच्या आज्ञा पाळणाच्या बरोबर आहे. पण त्यांना जगाशी बांधणाच्या धाग्याकडून तें गच्च धरले जातात. जे कनिष्ठ आहेत त्याबरोबर राहाण्यास त्यांना नैतिक धैर्य नाही. या आत्म्यासाठी आम्हांला त्यांच्याकरिता विशेष कार्य करण्याची गरज आहे. CChMara 69.2

    मला जो प्रकाश दिला आहे त्याप्रमाणे मला ठाऊक आहे कीं, “प्रभू असें म्हणतो याविषयी जगांत वजन व अधिकार असणार्‍यांशी बोलले पाहिजे. त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यांत आली आहे असें तें देवाचे कारभारी आहेत. जर तें त्याचे पाचारण स्वीकारतील तर तो त्यांना आपल्या आपल्या कार्यात उपयोग करून घेईल.CChMara 69.3

    वरच्या लोकामध्ये काम करण्यास लायक असलेले काहींजण आहेत. त्यानी प्रभूचा शोध करावा व या लोकाना कसे भेटावे. याविषयी अभ्यास करावा. फक्त त्यांच्याशी ओळख करून घेण्याच्या हेतूनेच नव्हें पण व्यक्तिवाचक कार्याद्वारे व जीवंत विश्वासाद्वारे या आत्म्यासाठी मोठे प्रेम व्यक्त करून त्यांना देवाच्या वचनातील सत्याचे ज्ञान देल्याच्या हेतूने त्यांना भेटावें. 216T 78-81. CChMara 69.4

    *****

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents