Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ३९ वें - मनाच्या प्रवेशमार्गाविषयीं सावधगिरी

    सैतानानें ज्ञानेंद्रियांवर वर्चस्व करूं नये म्हणून सर्वांनी त्यावर चांगली नजर ठेवावी; कारण हीं इंद्रिये अंतर्यामा प्रवेशद्वारे होत. CChMara 233.1

    जर आपल्या मनावर आपला ताबा ठेवावयाचा असेल आणि निरर्थक व अमंगळ विचारापासून आपला आत्मा निष्कलंक राखावयाचा असेल तर आपले नेत्र, कर्ण व सर्व ज्ञानेंद्रियांवर तुम्हांला कडक पहारा ठेवावा लागेल. या अत्यंत इष्ट कार्याच्या सिद्धीसाठी ईश्वरी कृपेचे सामर्थ्य मात्र अवश्य आहे.CChMara 233.2

    सैतान आणि त्याचे दतगण ज्ञानेंद्रियांची अवस्था नेभळट करण्याच्या कामीं इतके गुंतलेले असतात कीं त्या इंद्रियाना धोक्याच्या, इषाच्याच्या आणि दोषात्मक सूचना ऐकूच येत नाहीत, व जर त्या ऐकून घेतल्याच तर त्यांचा अंत:करणावर कांहींच परिणाम घडत नाहीं आणि जीवनचरित्रांत सुधारणा होत नाहीं.CChMara 233.3