Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ३ रें - प्रभूला भेटण्याची तयारी करा

    मला दिसलें कीं प्रभूचें येणें आपण लांबणीवर टाकूं नये. दूत म्हणाला, “पृथ्वीवर जें येत आहे त्याकरितां तयारी करा, तयारी करा, व तुमची कार्ये तुमच्या विश्वासाला जुळतील अशीं असूं द्या.” आणखी मीं पाहिलं कीं मन देवावर खिळून राहिलें पाहिजे व आमच्या आचरणाद्वारें देव व त्याचें सत्य यांची साक्ष पटली पाहिजे. जेव्हां आम्ही निष्काळजी व बेपरवाईपणा दाखवितो तेंव्हा आपण देवाचा मान राखत नाही. जेव्हां आम्ही निराश होतों तेव्हां त्याचें गौरव करूं शकत नाहीं. आम्हीं आमच्या स्वत:च्या आत्म्याचा बचाव करण्यासाठी आवेशी असले पाहिजे. सर्व महत्त्वाच्या बाबींचा यांशी संबंध आला पाहिजे व इतर बाबींचा नंतर विचार केला पाहिजे. CChMara 41.1

    मला स्वर्गाचें वैभव दिसलें. दूत आपली मंजूळ गाणीं गातांना मीं ऐकलें. त्यांत ते येशूला मान, महिमा व गौरव देत होतें. तेणेकडून देवाच्या पुत्राच्या अद्भुत प्रेमाविषयीं मी समजूं शकलें. त्यानें स्वर्गातील सर्व वैभव व गौरव सोडून त्याला आमच्या तारणाची एवढी गोडी लागली हें ती कीं, त्यानें सौम्यतेनें व धीराने मनुष्याने त्याजवर लादलेला अनादर व अवमान सहन केला. त्याला मार बसला व त्यामुळे त्याला जखमा होऊन तो घायाळ झाला, त्याला कॅलव्हरीच्या क्रूसावर देण्यांत आलें तेथें आम्हांला मरणापासून तारण्यासाठीं त्यानें असह्य दुःख भोगिलें अशासाठीं कीं, आम्ही त्याच्या रक्तात धुतलें जावें व जें गृह तो आम्हांसाठी तयार करीत आहे त्यांत राहाण्यांसाठी उठविले जावें व स्वर्गाचे गौरव, प्रकाश अनुभवण्यास व दृतांचें गाणें ऐकून त्याबरोबर गावयास मिळावे. CChMara 41.2

    मला असें दिसलें कीं, सर्व स्वर्ग आमच्या तारणाबद्दल गोडी घेत आहे. आम्ही बेपरवाईपणा करावा का? आम्ही तरूं किंवा मरूं त्याची कांही काळजी नाहीं, ही लहानशी बाब आहे असें म्हणावें काय ? आम्हांकरितां जो यज्ञ करण्यात आला आहे त्याचा अवमान करावा काय ? कांहींनी केलेला आहे. त्यांनी देऊ केलेल्या दयेचा खेळ केला आहे म्हणून त्यांच्यावर देवाचा क्रोध भडकला आहे. देवाचा आत्मा नेहमी दुःखी राहाणार नाहीं आणखी थोडा वेळ दुःख दिले तर तो निघून जाईल. मानवाला तारण्यासाठीं जे सर्व करायचे तें केल्यावर जर त्यांनी आपल्या जीवितांकडून दर्शविले कीं त्यांनी येशूनें देऊ केलेल्या दयेचा अवमान केलेला आहे तर मरण त्यांच्या वाट्याला येणार याकरिता त्यांना फार मोठी किमत द्यावी लागेल. हें भयंकर मरण होईल. कारण ज्या उद्धाराचा त्यांनी नाकार केला तो मिळवून देण्यासाठी ख्रिस्ताला क्रूसावर ज्या यातना सोसाव्या लागल्या त्याच यातना त्यांना झाल्या पाहिजेत. मग त्यांना समजून येईल कीं, सार्वकालिक जीवन व अमरपणाचे वतन तें गमावून बसले आहेत. जो महान् यज्ञ आत्म्यांच्या तारणासाठी करण्यांत आला आहे तो त्याची किंमत प्रगट करतो. जेव्हां मौल्यवान आत्मा एकदा हरवला जातो तेव्हां तो सर्वकाळासाठी हरवला जातो. CChMara 41.3

    मीं एका दृताला हातांत तराजू धरून देवाच्या लोकांचे विचार व आवडीनिवडी तोलून पाहाताना पाहिलें. विशेषेकरून तरुण लोकांचे विचार तोलून पाहाताना दिसलें. एका पारड्यांत स्वर्गाकडे जाणारे विचार व गोडी, दुसन्यांत या जगाकडे जाणारे विचार व गडी होत्या. या तराजूत सर्व गोष्टींची पुस्तकें, दिमाख व पोशाख याविषयींचे विचार, व्यर्थता व गर्व टाकलेला होता. अहाहा, किती गंभीर वेळ ही ! देवाचे दृत हातांत तराजू घेऊन उभे आहेत व ख्रिस्ती म्हणविणार्‍य आपल्या लोकांचे विचार तोलून पाहात आहेत. तें जगाला मलले व देवाला जीवंत असें आहेत जे तराजू जगिक विचाराने व गर्वाने भरले होतें, तें खालीं गेले. जरी तराजूतील वजने एकामागून एक काढून टाकण्यात आलीं तरी पारडे वर गेल्याबरोबर स्वर्गाकडे लावलेले विचार व आवड याचे पारडे हें खालीं गेलें. अहाहा, किती हें हलकें होतें ! मी तें पाहिलें असल्यामुळे त्याविषयी मी सांगू शकते. पण देवाच्या लोकांचे विचार व गोडी यांचे वजन करीत असलेला दृत मी पाहात असतां माझ्या मनावर गभीर व विस्तृत झालेला परिणाम याविषयी मी सांगू शकत नाहीं. दूत म्हणाला, “अशाचा स्वर्गात प्रवेश होईल का? नाही, नाहीं, कधींही नाहीं. त्यांना सांगा कीं जी आशा तें धरून आहेत ती व्यर्थ आहे आणि त्वरितपणे पश्चात्ताप केल्याशिवाय व तारण मिळवून घेतल्याशिवाय तें नाश पावतील.CChMara 42.1

    वरपागी धार्मिकता कोणाचे तारण करूं शकत नाही. सर्वांना खोल व जीवत अनुभव आला पाहिजे. याच गोष्टीद्वारे संकटात त्याचा बचाव होईल. मग त्यांच्या कृत्याची ती कसल्या प्रकारची आहेत हें पाहाण्यासाठी कसोटी होईल. ती जर सोने, चांदी व मौल्यवान हिरे असतील तर तें परात्पराच्या गुप्त स्थळीं लपवून ठेवण्यात येतील. पण त्याची कृत्ये जर लाकूड, गवत व घसकट असतील तर त्यांचा कशानेहि यहोवाच्या क्रोधाच्या प्रखरतेपासून बचाव होणार नाही.CChMara 42.2

    मीं पाहिलें कीं, पुष्कळजण स्वत:मध्येच स्वत:ला पाहातात व आपलीं जीविते इतराच्या जीवितांबरोबर ताडून पाहातात. पण असें नसावें ख्रिस्ताशिवाय आपला कित्ता कोणी नाहीं. तो आमचा खरा नमुना आहे. प्रत्येकाने त्याचे अनुकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न करावा. आम्ही ख्रिस्ताचे सह कामगार आहोत किंवा सैतानाचे सह कामगार आहोंत. आम्ही ख़िस्ताबरोबर गोळा करतो किंवा विखरून टाकतों. आम्ही मानवापासून ख्रिस्ती होण्याचा निश्चय केलेला आहे कीं नाहीं. ख्रिस्ताने म्हटले, “तुम्ही उष्ण किंवा थंड असतां तर बरे होतें. कारण तुम्ही कोमट आहा म्हणजे उष्णहि नाहीं व थडहि नाही म्हणून मी तुम्हांला तोंडातून ओकून टाकिलें आहे.” प्रगटी. ३:१५,१६.CChMara 42.3

    स्वनाकार व स्वार्पण म्हणजे काय याची फार थोड्या लोकांना माहिती आहे म्हणजे सत्याकरता सोसणे याचा अर्थ काय हें त्यांना माहीत नाही असें मला दिसलें. स्वार्पण केल्याशिवाय कोणीहि स्वर्गाला जाऊ शकणार नाहीं. स्वार्पण व स्वनाकार याची वृत्त धारण केली पाहिजे. कांहींनीं स्वत:चे स्वार्पण केलेलें नाहीं व स्वत:ची शरीरें देवाच्या वेदीवर ठेविलेली नाहीत तें त्वरित लहरी संताप याची आवड धरतात. वासना तृप्त करायला पाहातात व स्वत:च्या आवडीच्या गोष्टीकडे लक्ष देऊन देवाच्या कार्याकडे कानाडोळा करतात. जे सार्वकालिक जीवनानाठीं स्वार्पण करायाला तयार होतील त्यांना तें मिळेल. मूर्ति अर्पण करणे महत्त्वाचे आहे. गौरवाचा सार्वकालिक भार जगिक लालसा व सर्व कांहीं यांना गिळून टाकतो.१CChMara 42.4

    *****