Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ७ वे - मंडळीचें वाङमय

    आमचें प्रकाशन कार्य देवाच्या नेतृत्त्वाखाली व त्याच्या विशेष देखरेखीखाली स्थापन झाले आहे. एक विशेष हेतु शेवटास नेण्यास ही योजना होती. से.डे.अॅडव्हेटिस्ट या लोकांना देवाने आपले खास लोक म्हणून जगापासून वेगळे असें निवडले आहेत. सत्याच्या महान् सुन्याने त्यानें त्यांना जगाच्या खाणींतून खणून घेतले आहे व आपल्याकडे त्यांना आणले आहे. शेवटल्या तारणाच्या कार्यात त्याच्यासाठीं वकील होण्यास व त्याचे प्रतिनिधी होण्यास त्यांना बोलाविले आहे. महान् सत्य ठेवा मर्त्य मानवाच्या स्वाधीन केला आहे व गभीर व भययोग्य असा देवाने मनुष्याला दिलेला इशारा त्यांना जगाला देण्यासाठी स्वाधीन केला आहे, व हें कार्य शेवटास नेण्यासाठी आमचे छापखाने परिणामकारक हस्तकें आहेत.CChMara 70.1

    आमच्या छापखान्यातून पाठविलेले वाङमय देवाला भेटण्यासाठी लोकांना तयार करण्यासाठी आहेत. 17T 138, 139; जर एखादे कोणते काम दुसर्‍य कामापेक्षा महत्त्वाचे असेल तर तें लोकांपुढे आपले वाङ्मय नेणे हें होय. अशाप्रकारे त्यांना शास्त्र शोधायला लावले जाते. मिशनरी कार्य म्हणजे आमच्या वाङ्मयाची कुटुंबातून ओळख करून देणे व त्यांच्याबरोबर बोलून त्यासाठी प्रार्थना करणे हें चांगले काम असून त्याकडून पुरुष व स्त्रिया पाळकाच्या कामाची माहिती शिकतील. 24T 390;CChMara 70.2

    आमच्या वाङमयाकरता प्रतिनिधीत्व करणे फार महत्त्वाचे व फायद्याचे असें सुवार्ता प्रसाराचे काम आहे. आमचे वाङ्मय जेथे सभा भरविता येत नाहींत त्याठिकाणी जाऊ शकते. अशा ठिकाणीं विश्वासू पुस्तकविक्रेता जीवंत उपदेशकाची जागा घेतो. अशा कार्याद्वारे ज्यांना कधीं ऐकायला मिळालेले नसते अशा हजारों लोकांना सत्य गाजविले जाते. CChMara 70.3

    पुस्तकविक्यांनी देशांतील वेगवेगळ्या भागात जावे. ह्या कार्याचे महत्त्व सुवार्तिकाच्या कामाइतके आहे. आम्हापुढे असलेले महान कार्य पुढे नेण्यास जीवंत सुवार्तिक व गुप्त निरोप्या या दोघांची गरज आहे. 3CM 8; CChMara 70.4

    देवानें आमच्या वाङ्मयात असलेला प्रकाश लोकांपुढे मांडण्यासाठी पुस्तकविक्याचे काम एक साधन म्हणून नेमले आहे. लोकांच्या आत्मिक शिक्षणाकरिता व प्रकाशाकरिता आमच्या पुस्तकविक्यानी आवश्यक असलेली पुस्तकें यापुढे त्वरितरित्या नेण्याचे महत्त्व समजून घ्यावे. या काळांत आपल्या लोकांनी करावे म्हणून देवाने नेमलेले हेच काम होय. पुस्तकविके या नात्याने ज्यांनी देवाला वाहून घेतले आहे, तें जगाला शेवटचा इशार्‍यचा सदेश देण्याच्या कामात मदत करीत आहेत. आम्ही या कार्याची किंमत करूं शकत नाही. कारण पुस्तकविक्यांनी ही खटपट केली नसती तर पुष्कळांना हा इशारा ऐकायला मिळाला नसता. 46T 313;CChMara 70.5

    आमचें वाङ्मय चोहोंकडे गेलें पाहिजें तें अन्य भाषेंत छापले गेले पाहिजे. तिसर्‍य दूताचा निरोप या साधनाद्वारे व जीवंत सुवार्तिकाद्वारे गाजविला गेला पाहिजे. या काळासाठी जे तुम्ही सत्यावर विश्वास ठेवणारे आहांत तें तुम्ही जागे व्हा. सत्याचा प्रसार करण्यासाठी ज्यांना सत्य समजले त्यांना मदत करण्यास शक्य तें साधन मिळवून देणे तुमचे कर्तव्य आहे. आमचे वाङ्मय विकून आलेल्या पैशातून कांही भाग अधिक वाङ्मय तयार करण्याच्या सोयी वाढविण्यासाठी उपयोगांत आणावा, कारण त्याद्वारे त्यांचे डोळे उघडतील व अंत:करणाची पडीक जमीन नागरली जाईल. 59T 62; CChMara 71.1

    मला असें सांगण्यांत आलें कीं जेथे जीवंत सुवार्तिकाकडून संदेश लोकांनी ऐकला आहे, तेथें पुस्तकविक्याने पाळकाशीं सहकार्य करून आपले काम चालूं केले आहे. कारण जरी सुवार्तिकाच्या कामाद्वारे विश्वासूपणे संदेश गाजविला जातो तरी लोक सर्वच ठेवू शकत नाहींत त्याकरतां छापील पाने असण्याची आवश्यकत आहे, त्याचा या काळासाठी असलेल्या सत्याच्या महत्त्वाबाबत जागृति करण्यासाठी उपयोग व्हावा एवढेच नव्हें पण त्यांना सत्यांत मुळावणे व भक्कम करणे व फसवेगिरीच्या धोक्याविरुद्ध खंबीर करणे होय. मासिकें व पुस्तकें या काळाचा सदेश सतत लोकांपुढे ठेवण्यासाठी प्रभूचे साधन आहेत. सत्यामध्ये प्रकाशित करून खंबीर करण्याच्या बाबतींत सुवार्ताप्रसाराच्या कार्याकडून जे होईल त्यापेक्षा अधिक मोठे काम वाङ्मयाद्वारे होईल. पुस्तकविक्याद्वारे लोकांच्या घरात विकलेल्या वाङ्मयाद्वारे सर्व बाबतींत सुवार्ताप्रसाराचे कार्य भक्कम होईल. कारण लोक ही पुस्तके वाचीत असतां पवित्र आत्मा त्यांच्या मनावर कार्य करील व परिणाम दिसून येईल. दूत सुवार्तिकाच्या कामाकडे जितकें लक्ष देतात तितकेंच लक्ष सत्याने भरलेल्या पुस्तकांकडे देतात. 66T 315, 316; CChMara 71.2

    जे होतकरु विद्यार्थी आहेत त्याची जर इच्छा असेल तर ही पुस्तकें विकून त्यांची फी मिळविण्यास मदत म्हणून चांगल्या योजना आखा ह्याप्रकारे जे भरपूर पैसे मिळवितात व त्याद्वारे आमच्या शाळेतील शिक्षण घेण्यासाठी त्याचा उपयोग करतात त्यांना मोलाचा व्यवहारिक अनुभव येऊन तें दुसर्‍य क्षेत्रांत मिशनरी काम करण्यास लायक बनतील. 79T 79; जेव्हां मंडळीच्या सभासदांना वाङ्मयप्रसाराचे महत्त्व कळेल तेव्हां तें या कामात अधिक वेळ खर्च करतील. 8 CM 7,CChMara 71.3

    जोपर्यंत कृपेचा काळ चालूं राहील तोपर्यंत पुस्तकविक्याला या कामासाठीं संधि मिळेल. 96T 478; CChMara 71.4

    भावानो आणि बहिणींनो, जर तुम्ही मनापासून प्रकाशनखात्याला हातभार लावण्यास तुमच्या पैशाद्वारे मदत कराल तर देवाला त्याबद्दल आनंद होईल. देवाचा भरपूर आशीर्वाद या कार्यावर यावा म्हणून सकाळी व संध्याकाळी प्रार्थना करा. कुरकूर व टीका यांना उत्तेजन देऊ नका. तुमच्या ओठातून कुरकूर व तक्रार येऊ नये. दूत तें शब्द ऐकतात हें लक्षात ठेवा. सर्वांना समजून आलें पाहिजे कीं, प्रकाशन खाते देवाने नेमलेली संस्था आहे. जे कोणी स्वत:च्या फायद्यासाठी या कार्याला तुच्छ लेखितात त्यांना देवाला हिशेब द्यावा लागेल. जे सर्व त्याच्या कार्याला जोडले आहे तें सर्व पवित्र आहे अशी त्याची योजना आहे. 107T 182, 183.CChMara 71.5

    *****