Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्वर्गीय गोष्टींविषयीचे चिंतन व भाषण हें ख्रिस्ती मनुष्याचे काम

    स्वर्गामध्ये देव सर्वस्व आहे. तेथें पवित्रतेचे साम्राज्य आहे. ईश्वराच्या संपूर्ण सुसंगतीत तेथें कसलेही अडखळण होत नाही जर आमची प्रवास यात्रा तिकडची असेल तर स्वर्गीय आत्मा आमच्या अंतरी या जगांत वास करील. परंतु स्वर्गीय गोष्टींचे चितन करायला आम्हांला आता कांही गोडी लागत नसेल, देवाचे ज्ञान मिळविण्यात आमचे मन लागत नसेल, ख्रिस्ताचा गुणधर्म अवलोकण्यात उत्साह वाटत नसेल, पवित्रतेकडे आकर्षक होत नसेल तर आम्ही खात्रीपूर्वक समजून घ्यावे कीं आमची स्वर्गाविषयीची आशा निरर्थक अशी आहे. देवाच्या इच्छेशी संपूर्ण एकवाक्यता असें उच्च ध्येय नित्य ख्रिस्ती मनुष्यापुढे असले पाहिजे त्याला देवाविषयी बोलावयाला आवडेल येशूविषयी बोलावयाला आवडेल आणि ख्रिस्तावर प्रीति करण्यासाठी ज्या गृहाची त्यानें सिद्धता करून ठेवलेली आहे, त्या गृहाच्या परमसुखाविषयी व पवित्रतेविषयी बोलणे त्याला आवडेल. जेव्हां आत्मा ईश्वराच्या धन्य आश्वासनावर संतुष्ट असतो, तेव्हां असल्या गोष्टींचे मनन हें प्रेषिताने सांगितल्याप्रमाणे “येणार्‍य युगाच्या सामर्थ्याची रूचि होय.CChMara 375.2

    सैतानाने आपल्या सर्व शक्तीने आपल्या लुच्चेगिरीच्या आश्चर्यानी, सर्व प्रकारच्या फसवेगिरीने व अन्यायाने देवाच्या गुणवर्माचा विपर्यास करावा. व “जे निवडलेले आहेत त्यांना शक्य तो भ्रष्ट करावे’ अशा प्रकारचा शेवट आता आम्हांपुढे आहे. निरतर वाढत्या स्वर्गीय प्रकाशाची गरज कोणत्या लोकांना असेल तर ती असल्या ह्या संकटाच्या काळीज्यांच्या स्वाधीन देवाने आपले नियमशास्त्र केलेले आहे व ज्यांना जगतापुढे त्याच्या गुणधर्माचे समर्थन करण्यासाठी पाचारण केलेले आहे अशानाच त्या प्रकाशाची गरज आहे. ज्यांच्या स्वाधीन ही एवढी पवित्र ठेव केलेली आहे अशांनी विश्वास ठेविलेल्या सत्यांद्वारे आत्मिक, प्रगत व चैतन्यसपन्न असें बनले पाहिजे. CChMara 375.3