Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण १ लें - विश्वासणार्‍यांच्या प्रतिफळाविषयींचा दृष्टांत

    (माझा पहिला दृष्टांत)

    कुटुंबातील भक्तिच्या प्रसगी प्रार्थना करीत असतां मजवर पवित्र आत्मा आला आणि मी वर आणि वर अंधार्‍या जगाच्या वर जात आहे असें मला भासलें. मी जगांतील अॅडव्हेंटिस्ट लोकांना शोधण्यास वळले गण तें मला सापडले नाहीत. इतक्यांत एक वाणी मला म्हणाली कीं, “पुन: वर पहा, पहा वर.” तेव्हां मी माझी दृष्टि वर लावली व मला एक सरळ व अरुंद मार्ग या जगाच्या वर असलेला दिसला. अँडव्हेंटिस्ट लोक या मार्गाच्या आरंभीं त्याच्यामागे एक तेजस्वी प्रकाश लावलेला होता. याविषयी दृताने मला सांगितलें कीं, ती मध्यरात्रींची हाक आहे. हा प्रकाश सर्व मार्गावर पसरलेला होता व त्यांच्या पावलांना ठेच लागू नये म्हणून उजेड देत होता. जर त्यांनी आपली दृष्टि त्याच्यासमोर असलेल्या व त्या शहराकडे मार्गदर्शन करणार्‍य येशूवर लावली तर तें सुरक्षित राहणार होतें. पण लवकरच कांही जणांना थकवा आला व म्हणाले हैं। शहर फार दर आहे व या अगोदरच आम्हीं आत जायला पाहिजे होतें. नतर येशु आपला गौरवी उजवा हस्त वर करून त्यांना धैर्य देत होता. त्याच्या बाहूमधून प्रकाश आला व तो अॅडव्हेंटिस्ट मंडळीवर प्रकाशत असतां तें मोठ्यानें म्हणाले, “हालेलुया दुसर्‍यांनी बेपरवाईने त्याच्यामागे असलेल्या प्रकाशाचा नाकार केला आणि म्हणाले कीं, आतापर्यंत आम्हांला मार्गदर्शन करणारा देव नाहीं. त्यांच्यामागे असलेला प्रकाश मालबला व त्यामुळे त्याची पावलें अधारातच राहिली. तें ठेचाळले व त्याचे ध्येय व येशू त्याच्या नजरेआड झाले आणि मार्गावरून खालीं या अधाच्या व दुष्ट जगांत पडले. लवकरच मोठ्या जलप्रवाहासारखी एक वाणी झाली व येशूच्या येण्याचा दिवस व घटका सागू लागली. १४४००० जीवंत धार्मिक ही वाणी ऐकू शकले व समजू शकले. पण दष्टाना वाटले कीं, हा भूमिकप व गडगडाट आहे. जेव्हां देवाने वेळ सांगितली तेव्हां त्यानें पवित्र आत्मा आम्हांवर ओतला, आणि आमचे चेहेरे प्रकाशित होऊन देवाच्या गौरवाने जसा मोशे सीनाय पर्वतावरून खालीं आल्यावर त्याचे मुख चमकूं लागले त्याप्रकारे आमचे चेहरे चमकूं लागले.CChMara 33.1

    १४४००० यांच्यावर शिक्का मारण्यात आला होता व त्यांच्यामध्ये पूर्ण ऐक्यता होती, त्यांच्या कपाळावर देव, नवें यरुशलेम व येशूचे नांव असलेले गौरवी तारे लाविले होतें. आम्ही आनंदीत व पवित्र स्थितीत असताना दुष्टांना चेव आला व हिंसक बुद्धीनें तें आम्हांवर हात पसरले व त्याबरोबर तें निराश्रित होऊन जमिनीवर पडले आणि मग सैतानाची धर्मसभा म्हटलेले समजून चुकले कीं, देवाने आम्हांवर प्रीति केली आहे. कारण आम्ही एकमेकांचे पाय धुवून पवित्र चुंबनाने एकमेकाला सलाम करूं शकतो आणि त्यांनी आमच्या पाया पडून आमची उपासना केली. CChMara 33.2

    लवकरच आमचे डोळे पूर्वेकडे लागले. कारण एक लहान काळा ढग मनुष्याच्या अध्य तळहाताएवढा तेथें दिसला. तो मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह होता है आम्हा सर्वांस माहीत होतें. आम्ही सर्व गभीर शांततेने त्या ढगाकडे पाहिलें. तेव्हां तो अगदी जवळ येत होता व प्रकाशित व गौरवी अधिक गौरवी होत होत शेवटी तो एक मोठा पांढरा ढग बनला. त्याचा खालचा भाग अग्निसारखा दिसला व त्यावर एक धनुष्य होतें. त्यासभोवती दहा हजार देवदुत मंजूळ गाणे गात होतें व त्यावर मनुष्याचा पुत्र बसला होता. त्याचे केस शुभ्र व कुरळे असूत तें त्याच्या खांद्यावर पडले होतें आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होतें. त्याचे पाय अग्नीसारखे होतें. त्याच्या उजव्या हातांत तीक्ष्ण धारेचा विळा होता; त्याच्या डाव्या हातांत चादीचा करणा होता; त्याचे डोळे अग्नीज्वालेसारखे होतें व तें आपल्या लोकांचा कसून शोध करीत होतें. नंतर सर्वांचे चेहेरे फिक्के पडले व देशाने ज्यांचा नाकार केला होता त्यांचे चेहेरे काळे पडले. नंतर आम्ही सर्व ओरडलों. त्याच्यासमोर कोण टिकेल ? माझा झगा डागविरहित आहे काय ?” मग दूतांनी गायन थांबविलें. थोडा वेळ भयकर शांतता होती. तेव्हां येशू म्हणाला, “ज्याचे हात स्वच्छ आहेत व मन शुद्ध आहे तेच टिकतील. माझी कृपा तुझ्याकरतां पुरी आहे.” ह्यावेळी आमचे चेहेरे प्रकाशित झाले व प्रत्येकाचे अंत:करण पान भरून गेलें. दूतांनी पुन: उंच स्वरें गात असतां ढग आणखी पृथ्वीच्या जवळ आला. CChMara 34.1

    मग अग्निज्वालेने वेष्टिलेला ढग खालीं उतरत असतां येशूचा रुपेरी करणा वाजला. त्यानें झोपी गेलेल्या संतांच्या कबरेकडे पाहिलें. मग स्वर्गाकडे हात करून व दृष्टि लावून म्हटले, “जागे व्हा ! जागे व्हा ! मातींत झोपलेल्यांनी ऊठा.” मग एक मोठा भूमिकंप झाला. कबरा उघडल्या व मृत माणसें अमरत्व परिधान करून उठले. १४४००० ओरडत म्हणाले, “हालेलुया !” मरणाने विभक्त झालेल्या आपल्या मित्रांना त्यांनी ओळखले, आणि त्याच क्षणाला आमच्यांत बदल झाला व आकाशात प्रभूला भेटण्यासाठी वर घेतले गेलों.CChMara 34.2

    त्या ढगावर आम्ही सर्वजण बसलों व काचेच्या समुद्रावर पोहंचेपर्यंत सात दिवस लागले. नंतर येशूनें मुकुट आणले व आपल्या उजव्या हातानें आमच्या डोक्यांत घातले. त्यानें आम्हाला सोन्याचे वीणे व विजयाच्या झावळ्या दिल्या. काचेच्या समुद्रावर १४४००० लोक औरस चोरसरीत्या उभे राहिले. कांहींचे मुकुट फार तेजस्वी होतें व कांहींचे इतके तेजस्वी नव्हते. कांही मुकुटांवर तारे असल्यामुळे तें जड झाले होतें तर काहींच्यावर फार थोडे तारे होतें. सर्व आपल्या मुकुटांमुळे पूर्ण संतोषी होतें. खांद्यांपासून पायापर्यंत तें शुभ्र झग्याने वेष्टिले होतें. आम्ही काचेच्या समुद्रावरून नगराच्या वेशीकडे जात असतां सर्व देवदूत आम्हांभोंवती होतें. येशूनें आपला पराक्रमी व गौरवी हस्त वर केला, मोत्याची वेस धरली आणि ती सताड उघडली आणि तो म्हणाला, “तुम्ही आपले झर्ग माझ्या रक्तात धुतले आहेत. माझ्या सत्यासाठी स्थिर उभे राहिला, आत या.” आम्ही सर्व आंत गेलों व आम्हा सर्वांना वाटले कीं या नगरांत आम्हा सर्वांना पूर्ण हक्क आहे.CChMara 34.3

    येथें आम्ही देवाचें सिंहासन व जीवनी झाड पाहिलें, सिंहासनांतून नितळ पाण्याची नदी वाहात होती, आणि नदीच्या दोन्ही तीरावर जीवनाचें झाड होतें. नदीच्या एका तीराला झाडाचें खोड होतें व नदीच्या दुसर्‍य बाजूलाहि झाडाचें खोड होतें. दोन्हीं खोडीं शुद्ध पारदर्शक सोन्याचीं होती. पहिल्यानें मला वाटले कीं, मला दोन झाडे दिसली. मी पुन: पाहिलें त ती शेंड्याला जोडली गेली होतीं. जीवनी नदीच्या दोन्ही बाजूला असलेले तें जीवनाचें झाड होतें. त्याच्या फांद्या आम्ही उभे असलेल्या ठिकाणीं वाकल्या होत्या व त्याचे फळ गौरवी होतें. तें सोने व चादी मिश्रित असें दिसत होतें.CChMara 35.1

    आम्ही सर्व झाडाखालीं गेलों व त्या ठिकाणाचें वैभव पाहाण्यासाठी खालीं बसलों. तेव्हां राज्याची सुवार्ता गाजविणारे ब्रदर फिचे व स्टॉकमन व ज्यांना तारण्यासाठीं देवानें कबरेंत ठेविलें तें आम्हांकडे आलें व विचारू लागले कीं आम्ही झोंपेत असतांना तुम्ही काय करीत होता? आम्ही आमच्या महान संकटाची आठवण करण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाभोंवती असलेल्या सार्वकालिक गौरवाचा परिणाम व मोठेपणा यापुढें तें इतकें लहान दिसूं लागले कीं त्याविषयी आम्ही बोलूं शकलों नाहीं. आम्हीं सर्वजण मोठ्यानें म्हणालों, हालेलुया, आम्हांस स्वर्गप्राप्ति कितीतरी सहज झाली ! आम्ही ते सुंदर वीणे घेतले व स्वर्गाच्या वेशी दणाणून सोडल्या.CChMara 35.2

    येशूबरोबर या नगरांतून खालीं या पृथ्वीवरील मोठ्या पर्वतावर उतरलों. तेथें येशूचा भार सहन होईना म्हणून त्याचे दोन भाग झाले. आणि तेथें मोठे मैदान झालें. नंतर आम्हीं वर पाहिलें तों मोठी नगरी दिसली. तिला बारा पाये, प्रत्येक बाजूला तीन प्रमाणें बारा देशी असून प्रत्येक देशीत एकेक दूत होता. आम्ही सर्व ओरडलों, “नगरी, मोठी नगरी स्वर्गातील देवापासून खालीं येत आहे, खालीं येत आहे.” आणि जेथें आम्ही उभे होतों तेथें येऊन ती स्थिर झाली मग आम्ही नगराच्या बाहेरील सुंदर देखाव्याकडे पाहूं लागलों. तेथें सुंदर घरें दिसलीं तीं चांदीसारखीं दिसत $. त्यांना सुंदर मोत्त्यानी मंडित अशा चार खांबांचा आधार दिला होता. यांत धार्मिक वस्ती करून राहाणार होतें. प्रत्येक घरांत सोन्याचें कपाट होतें. या घरांतून पुष्कळ संतजन जातांना मला दिसले. आपले चमकणारे मुकुट घेऊन त्यांनी तें कपाटावर ठेविलें. मग रानांत जाऊन जमिनींत कांहीं तरी करूं लागले. त्यांच्या डोक्याभोंवती सुंदर प्रकाश चमकूं लागला आणि तें सतत ओरडून देवाची स्तुति करूं लागले. CChMara 35.3

    मीं दुसरें एक शेत सर्व प्रकारच्या फुलांनी भरलेलें पाहिलें. मी ती तोडीत असतां मोठ्यानें म्हणालें, “तीं कधींही सुकून जाणार नाहींत. दुसर्‍यांदा मी उंच गवत असलेलें एक शेत पाहिलें. तें सुंदर होतें. तें सतत हिरवें व सोन्याचांदीच्या प्रतिबिंबासारखें होतें. प्रभूराजाच्या गौरवासाठीं दिमाखानें डोलत होतें. नंतर जेथे सर्व प्रकारचे प्राणी आहेत अशा शेताकडे गेलों. सिंह, कोंकरू चित्ता व लांडगा पूर्ण ऐक्याने एकत्र राहात होतें. त्यांच्यामधून आम्ही चाललों असतां तें शांततेनें आमच्यामागें चालूं लागले. नंतर आम्ही जंगलांत गेलों, तें जंगल येथील जंगलासारखें अंधारे नव्हतें, पण प्रकाशीत होतें. सर्वत्र सुंदरता होती, झाडाच्या फांद्या मागेपुढे हालत होत्या. आम्ही मोठ्यानें म्हणालों, “आम्ही जंगलांत झोंपू व अरण्यांत सुरक्षित वस्ती करुं.” आम्ही जंगलांतून गेलों, कारण आम्ही सीनाय डोंगराच्या मार्गावर होतों.CChMara 35.4

    आम्ही प्रवास करीत असतां, त्या ठिकाणच्या सौंदर्याकडे टक लावून पाहाणार्‍य दुसर्‍य मंडळीला भेटलों. त्यांच्या झग्यांच्या तांबड्या किनारी दिसल्या व त्यांचे मुकुट तेजस्वी होतें. त्यांचे झगे शुभ्र होते. आम्ही त्यांना सलाम केल्यावर मी येशूला विचारीले कीं तें कोण आहेत ? तो म्हणाला कीं ज्यांनी त्याच्याकरतां प्राणाची आहुती दिली ते हें होत. त्याबरोबर लहान लेंकरांचा अगणित समुदाय होता. त्यांच्या झग्यांवरहि तांबडी फित होती. सीयोन डोंगर आमच्या समोर होता आणि या डोंगरावर गौरवी मंदीर होतें. त्याभोंवती दसरे सात डोंगर होतें. त्यावर गुलाब व कमळें वाढत होती. मी पाहिलें कीं, लहान लेंकरें त्यावर चढून किंवा त्यांना वाटले तर आपल्या पंखांनी ती डोंगराच्या शिखरापर्यंत उडत व कधींही न कोमेजणारी फुलें तोडीत होती. त्या ठिकाणाचें सौंदर्य वाढविण्यासाठी त्या देवळाभोंवती सर्व प्रकारची झाडें होती. अननस, पोफळी, द्राक्षें, डाळिब व अंजीराची झाडे आपल्या फळांनी भारावली असल्यानें खालीं वाकलीं होतीं. याकडून त्या ठिकाणाला उत्तम शोभा आली होती. आम्ही त्या पवित्र मंदिरात प्रवेश करणार तोंच येशूनें उत्तम स्वरानें म्हटले, “फक्त १४४००० च या मंदिरात प्रवेश करूं शकतात आणि आम्ही ओरडलों “हालेलुया” CChMara 36.1

    हें मंदिर सात रत्नजडित पारदर्शक सोन्याच्या सात खांबावर उभारले होतें. त्या ठिकाणीं पाहिलेल्या अद्भूत गोष्ट अवर्णणीय अशा होत्या. अहाहा ! मला जर कनानी भाषा आली तरच या उत्तम जगाचें थोडें वर्णन करून सांगता येईल. तेथें मी १४४००० ची नावें सोन्यानें कोरलेल्या दगडी पाट्यावर पाहिल्या. त्या देवळाचें सौंदर्य पाहिल्यावर आम्हीं बाहेर गेलों. येशूनें आम्हांला सोडून तो नगराकडे गेला, पुन: त्याची उत्तम वाणी आम्हीं ऐकली, “माझ्या लोकांनो, या तुम्ही मोठ्या संकटांतून आला आहांत तुम्ही माझी इच्छा शेवटास नेली आहे व मजकरतां दु:ख सोशिलें आहे. आंत जेवायला या, कारण मी कंबर बांधून तुमची सेवा करीन.” आम्ही ओरडलों, “हालेलुया!” “गौरव !” व शहरांत गेलों. मी एक शुद्ध सोन्यांचा मेज पाहिला तो अनेक मैल लांबीचा होता. तरी तो आमच्या नजरेच्या टप्यांतला होता. जीवनी झाडाचीं फळें मीं पाहिलीं, मात्रा, बदाम, अंजीरें, डाळिंब, द्राक्षें व दुसरी अनेक प्रकारचीं फळें पाहिलीं. र्ती फळें खाण्याविषयॊ मी येशूला विचारिलें, तो म्हणाला “आताच नाहीं. येथील फळें जो कोणी खाईल तो परत या पृथ्वीवर पुन्हा जाणार नाहीं. पण लवकरच जर आपण विश्वासू ठरुं तर जीवनी झाडाचीं फळें खाऊं व जीवनी झर्‍यचें जीवनी पाणी पिऊं.” तो म्हणाला, तुला पृथ्वीकडे परत गेले पाहिजे व तुला जें दाखविण्यांत आलें ते दुसर्‍याला सांगितलें पाहिजे.” मग एका दूताने मला या अंधार्‍या जगाकडे हळूच आणलें, कधीं कधीं मला वाटतें कीं, येथे मी आणखी राहूं शकणार नाहीं. या पृथ्वीवरील सर्व गोष्टी भयाण दिसतात. मला येथे करमत नाहीं. कारण मी उत्तम देश पाहिला आहें. अहाहा ! मला जर कबुतराप्रमाणे पंख असतें. तर मी उडून दूर गेले असतें व विसावा पावलें असतें !”CChMara 36.2

    *****