Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    औषधीं द्रव्यांचा उपयोग

    ज्या व्यवहार-प्रधातानें पुष्कळशा आजारांचा किंबहुना अधिक अपायकारक पिडाचा जणू काय पायाच घातला जातो, तो व्यवहार बाजारात मिळणाच्या ठराविक औषधी द्रव्यांचा मनसोक्त उपयोग हाच होय. आजार आला तर तो कशामुळे आला याची कारण चिकित्सा पुष्कळजण करीत नाहींत. दु:ख व त्रास नाहींशीं करावीत हीच मोठी चिंता त्यांच्यापुढें असतें. CChMara 320.7

    ह्या अपायकारक औषधी द्रव्यांनी पुष्कळजण जन्मभरीचे आजार लावून घेतात. आजार निवारण करण्याच्या निसर्गसिद्ध उपचारांची हेळसांड केल्यामुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. असल्या ह्या उपचारांमध्ये अशी कांही अपायकारक द्रव्ये असतात कीं, त्यांनी आत्म्याचा व शरीराचा अंतच होईल अशा संवयी व आवडी लागून जातात. हीं तयार केलेली पुष्कळशीं लोकप्रिय औषधी द्रव्ये व कांहीं वैद्यांकडून मिळणारी औषधे ही दारूपान आणि अफू घेण्याच्या संवयीचा मार्गच तयार करतात व हा जनताचरित्रामध्ये भयंकर शापच असतो. 20MH 126, 127;CChMara 321.1

    साधारणत: प्रचलित असलेला हा औषधी द्रव्यांचा व्यवहार एक शपच आहे. ही द्रव्ये टाळण्याचे शिक्षण द्या. त्यांचा उपयोग कमी कमी करून आरोग्याच्या नैसर्गिक साधनांवर अवलंबून राहण्याचे उत्तेजन द्या. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, योग्य व्यायाम आणि स्वच्छ सद्सद्विवेक ही देवाचीं रोगनिवारक साहित्ये निसर्गाला हातभार लावतील. चहा-कॉफी आणि मांसाहार, यांवरच ज्यांचा कटाक्ष आहे, त्यांनाच औषधी द्रव्यांची गरज पडेल. परंतु जे कोणी आरोग्याची बंधने मान्य करितील, तें औषधाचा एक थेंबहि न घेता रोगमुक्त होतील. औषधांचा उपयोग क्वचितच लागेल. 21CH 261;CChMara 321.2