Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आपल्या शाळेविषयींची निष्ठा, ही विद्याथ्र्याची जबाबदारी होय

    आमची देवावर प्रीति आहे व सत्याला धरून आम्ही वागतो असें जे विद्यार्थी म्हणतात त्यांच्या अंगी कांही तरी अंशाने आत्मसयमन व धार्मिक तत्त्वाचे बळ असावयास पाहिजे, म्हणजेच त्यास मोहपाशात अगर कॉलजांत, वस्तीगृहात अगर जेथे कोठे तें असतील तेथें तें अढळ व ख्रिस्ताशी निष्ठ राहतील. धर्म हा कांही उपासना मंदिरात घालावयाचा झगा नव्हें, तर संपूर्ण जीवनकलेच्या हालचालींत दिसून येणारी तत्त्वे होत.CChMara 286.1

    जे कोणी जीवनाच्या प्रवाहातून आपली तृष्णा भागवीत असतात, तें प्रापचिक लोकासारखे निरनिराळ्या नादात अगर सुखचैनीत गुगले जाणार नाहींत. त्यांच्या वर्तनात व शीलात त्यांना येशूकडून प्राप्त झालेली विश्रांति, शांति व सुखसंपत्ति ह्या दिसून येतील कारण रोजरोज तें आपले गांधळ व दु:खाचे भार येशूचरणी नेऊन सादर करतात. आज्ञांकितपणाच्या आणि कर्तव्य क्षेत्राच्या मार्गात समाधानच नव्हें तर आनंद असतो असें तें दाखवून देतील. असलेच नैतिकबळ तें आपल्या सहविद्यार्थीगणावर पाडतील व तें संबंध शाळेला मोठे भूषणावह होतील.CChMara 286.2

    सस्थेतील एक प्रकारची अनिष्ठा काढून टाकावी, भांडणतटे मिटवावेत, नियम व बंधने पाळण्याची निष्काळजी करण्यांत येऊ नये म्हणून प्रयत्न करून निराश झालेली शिक्षक व प्राध्यापक मंडळी ही संघटित झालेली निष्ठावंत सेना पाहन त्यांना नवीन उत्तेजन व बळकटी येईल. त्याचे वजन हें तारणदायी ठरेल व परमेश्वराच्या महान दिवशी त्यांची कुतकायें नाश पावणार नाहींत तर भावी जगामध्ये ती त्याच्यासह येतील. त्यांच्या आयुष्यातील कार्यक्षमता अखंड युगांत अविनाशी राहील.CChMara 286.3

    शाळेतील एक आस्थेवाईक, विवेकी, निष्ठ तरुण त्या शाळेतील एक अमोल भाडवल होय. स्वर्गातील दूतगण त्याजकडे प्रेमळ नजरेने पाहात राहतील. त्याचा आवडता तारणारा त्याजवर प्रीति करील, त्यानें केलेले प्रत्येक धर्मकत्य, प्रतिकार केलेला प्रत्येक मोह व दृष्टाईवर विजय मिळविलेली प्रत्येक बाब यांची नोंद स्वर्गीय ग्रंथात केली जाईल. सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून भावी काळांसाठी भरभक्कम पाया तो घालीत राहील. CChMara 286.4

    आपल्या कार्याचा प्रसार व्हावा म्हणून परमेश्वराने योजिलेल्या संस्था ह्या साधनीभूत होत. त्यांचे संरक्षण व त्यांची प्रगति फार मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती तरुणावर अवलंबून आहेत जे तरुण आज आपल्या कार्यक्षेत्रात उतरत आहेत, त्यांच्याच माथी ही भारी जबाबदारी येऊन पडत आहे. मानवाच्या एका पिढीमध्ये एवढे भारी महत्त्वाचे निर्णय अवलंबून राहावेत असा काळ पूर्वी कधीच आलेला नव्हता. एवढ्यासाठी आमच्या तरुणांना परमेश्वराने आपल्या कार्यासाठी आपले हस्तक करावे म्हणून त्या थोर कार्यासाठी त्यांची सिद्धता करणे किती महत्त्वाचे आहे. त्यांच्या स्वामीचा त्याच्यावर हक्क असून तो अवातर सर्व हक्काहून फार श्रेष्ठ आहे. CChMara 286.5

    जीवन देणारा देवच आहे आणि त्यांच्यापाशी असलेली हरएक शारीरिक व मानसिक देणगी त्याजपासून आहे. सूज्ञतेने सुधारणा करता येईल अशा प्रकारच्या कार्यशक्ति देवाने त्यांस दिलेल्या आहेत व त्या अशासाठीं कीं त्यांच्याकडे सोपविलेले कार्य अविनाशी काळापर्यंत टिकून राहावे. ह्या महान् देणग्यांचा मोबदला म्हणून आमच्या तरुणांनी आपल्या बौद्धिक व नैतिक शक्तीचे योग्य संगोपन व त्याचा योग्य कारभार करावा, ही देवाची हक्काची मागणी आहे. केवळ त्यांच्या करमणुकीसाठीं अगर देवाच्या इच्छेविरुद्ध अगर त्याच्या योजनेविरुद्ध त्यांचा दुरुपयोग व्हावा म्हणून त्या दिलेल्या नाहीत, तर जगांत सत्याचे व पवित्रतेचे ज्ञान प्रगट व्हावे एखाद्यासाठी त्यांचा विनियोग करावयाचा आहे. देवाच्या निरतरच्या मायाळूपणाबद्दल व अगम्य दयेबद्दल तरुणांनी आपली कृतज्ञता, आदरबुद्धि आणि प्रेम दर्शवावें ही देवाची मागणी आहे. त्याच्या नियमशास्त्राचे व सर्व सूज्ञ निबंधांचे आज्ञापालन व्हावे ही त्याची मागणी रास्तच आहे कारण त्यांच्याद्वारे तरुणांना सैतानाच्या युक्त्याप्रयुक्त्याविषयी सावध राहाता येईल व त्यांना शांतीच्या मार्गात जाता येईल. CChMara 286.6

    आपल्या सस्थाचे नियमबंधने मान्य करण्यांत आपण आपलाच सामाजिक दर्जा स्थिर करितों एवढेच नाही तर आपल्या शीलाची बढती होतें, मनाची थोरवी वाढते व आपल्या सौख्यात भर पडते असें आमच्या तरुणांनी लक्षात आणिले तर तें योग्य नियमाविरुद्ध व सत्तेविरुद्ध बंडाळी करणार नाहींत. अगर संस्थाविषयी शंकाकुशका अगर कलुषितपणा निर्माण करणार नाहींत. तरुणांनी जे कांही करावयास पाहिजे असतें तें साध्य करण्यासाठी त्याच्या अगी प्रसंगावधान व समतोल बुद्धि असली पाहिजे. यांतच त्यांच्या सफलतेची गुरुकिल्ली असते. आजच्या जगांत दिसून येणारा पुष्कळ तरुणाचा बेफाम व अविचारी स्वभाव अति दुःखदायक असा वाटतो. गृहातील मातापितरांकडेच यासंबधीचा मोठा दोष असतो. ईश्वराच्या भयाव्यतिरिक्त कोणालाही खरोखरीचे सुखी होता येणार नाहीं. 43432-435..CChMara 287.1

    *****