Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ८ वे - कारभारीपणाविषयीं सल्ला

    औदार्याची वृत्ति ही स्वर्गाची वृत्ति होय. ख्रिस्ताचे स्वार्पणाचे प्रेम क्रूसावर दर्शविण्यात आलें. मनुष्याला तारण्यासाठीं त्याच्याजवळचे त्यानें सर्व दिले व नंतर स्वत:ला देऊन टाकले. धन्य तारणान्याच्या अनुयायांना परोपकारी होण्यास ख्रिस्ताचा क्रूस विनवितो, यांत जें तत्त्व गविले आहे तें देण्याचे तत्त्व आहे. हें तत्त्व परोपकार व सत्कृत्य या बाबतींत अगी आणल्यास ख्रिस्ती जीवितांचे खरे फळ होतें. जगक तत्त्व द्या’ असें आहे. अशा प्रकारे तें सुखसमाधान मिळविण्याची इच्छा बाळगतात. पण असें आचरण केल्याने जे फळ प्राप्त होतें तें मरण व त्रास होय. CChMara 72.1

    ख्रिस्ताच्या क्रूसापासून प्रकाशणारा सुवार्तेचा प्रकाश स्वार्थीपणाला धमकावतो. औदार्य व सदिच्छा यांना प्रोत्साहन देतो. देण्यासंबंधाने अधिक विनंत्या आहेत म्हणून दु:ख करण्याचे कारण नाहीं. देव आपल्या दयेने आपल्या लोकांस मर्यादित कृतींच्या परिस्थितींतून निघून मोठ्या साहसाच्या गोष्टींत प्रवेश करण्यास बोलावीत आहे. नैतिक अंधार पृथ्वीला झांकीत असतां या काळांत अमर्याद अशा कार्याची गरज आहे. देवाचे पुष्कळ लोक लोभीपणा व जगिकपणा यांच्या जाळ्यांत सापडण्याच्या धोक्यात आहेत त्याना समजायला पाहिजे कीं त्यांच्या प्राप्तीची मागणी त्याच्या दयेने दुणावते. उपकारबुद्धि कृतींत आणण्यासाठी पाचारण करणारा हेतु त्यांच्यापुढे मांडावा. नाहीतर तें आमचा जो मोठा कित्ता तयाच्या शीलाचे अनुकरण करणार नाहींत.CChMara 72.2

    आपल्या शिष्यांना सर्व जगांत जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करण्यास, त्यानें केलेल्या आज्ञेत त्यानें आपल्या कृपेचे ज्ञान पसरविण्याचे काम मानवाला नेमून दिले आहे. पण जेव्हां काहीजण सुवार्ता सागण्यास जातात त्यावेळी तें इतरांना आपल्या या जगांतील कार्याला मदत व्हावी म्हणून अर्पणे देण्यास पाचारण करितात. त्यानें मनुष्याच्या हातांत पैसा दिला आहे. अशासाठी कीं, त्याच्या दैवी देणग्या मानवी हस्तकाद्वारे आमच्या सोबत्याच्या तारणासाठी नेमलेले काम करण्यास सहाय्यक व्हाव्यात. मानवाला उंचावरण्याचा हा एक देवाचा मार्ग आहे. हेच काम मनुष्याला जरूरीचे आहे. कारण याकडून त्याच्या अंतकरणातील खोल सहानुभूति हालवली जाईल व मनाची उच्च शक्ति खर्च करण्यांत येईल. 19T 254, 255;CChMara 72.3

    योग्य मार्गदर्शन केलेली उपकारबुद्धि मनुष्याच्या बौद्धिक व नैतिक शक्तींना ओढून घेते व सर्वात अधिक आरोग्यदायी कार्याकडून जे अधिक गरजू आहेत त्यांना आशीर्वाद देण्यांत व देवाचे कार्य वाढविण्यात उत्तेजन देते. 23T 401;CChMara 72.4

    गरजू भावाला मदत करण्याची प्रत्येक संधी किंवा देवाच्या कार्यास्तव सत्य प्रसार करण्यांत मदत करणे हें एक रत्न असून तुम्ही आगोदरच तें स्वर्गीय भांडारांत सुरक्षिततेसाठी पाठवूं शकतां. 33T 249;CChMara 73.1