Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ६० वें - सैतानाच्या लुच्चेगिरीचीं आश्चर्ये

    सांप्रतच्या पिशाच्चवादाला (संचारवादाला) विशेष प्रकारे लागू पडेल अशा शास्त्रपाठाकडे माझे लक्ष वेधण्यात आलें. कलस्सै, २:८: “ख्रिस्ताप्रमाणे नव्हें, तर मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान व पोकळ भुलथापा यांनी तुम्हांस कोणी हिरावून घेऊन जाऊ नये म्हणून जपा.” मस्तक-सामुद्रिक विद्या (मस्तकावरील अगर कपाळावरील गुणलक्षणांची विद्या) आणि मोहिनी विद्या यांनी हजारों लोकांचा नाश होऊन तें विश्वासहीन बनलेले आहेत. असें मला दाखविण्यांत आलें अशा प्रकारे मनाची प्रवृत्ति होऊ लागली कीं मनाचा समतोलपणा नाहीसा होतो व सैतान त्यावर ताब करितो लाचार मर्त्य मानवाची मने पोकळ भुलथापांनी भरून जातात. मोठमोठी कामें साधण्याची जादू तिच्यात असल्यामुळे वरिष्ठ प्रतीच्या सामर्थ्याकडे जाण्याची त्यांना गरज वाटत नाही. त्यांची तत्त्वे व विश्वास मनुष्यांच्या संप्रदायाप्रमाणे जगाच्या शिक्षणाप्रमाणे असतात ख्रिस्ताप्रमाणे नसतात. CChMara 357.1

    हे तत्वज्ञान ख्रिस्ताने त्यांस शिकविले नाही. त्यांच्या शिक्षणात असल्या कशाचाही मागमूस लागणार नाही. मर्त्य लाचार आपणा स्वत:कडेच व त्यांच्याच शक्तीकडे पाहावे असें त्यानें सांगितलें नाही. विश्वाचा उत्पन्नकर्ता परमेश्वर जो सामर्थ्याचा व सूज्ञतेचा उगम आहे त्याजकडेच मने लावावीत असें तो निरंतर दाखवीत होता. १८ व्या वचनांत (कलस्सै. २:१८) विशेष सूचना देण्यांत आलेली आहे, “आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्यांवर टेकून जो देहबुद्धिने व्यर्थ फुगतो असा कोणी, नम्रता व देवदृतांची सेवा यांच्या योगाने तुम्ही आपल्या बक्षिसास मुकाल, असें तुम्हांस न फसवो.” CChMara 357.2

    संचारवादाचे शिक्षक तुम्हांला फसवायाच्या उद्देशाने आनंदीत व मोहक पद्धतीने तुम्हांकडे येतात आणि जर का तुम्ही त्यांच्या खोट्या गोष्टी ऐकून घेतल्या तर शत्रु तुम्हांला न्यायमार्गापासून भुलवल आणि खात्रीने आपल्या बक्षिसास मुकाल. एकदा का तुम्ही त्या महाठकाच्या आकर्षक धोरणांत अडकलां कीं तुम्ही विषारी बनता आणि देवाचा पुत्र ख्रिस्त यावरील तुमचा विश्वास त्यांच्या घातक सहवासाने बिघडून जातो व क्षय पावतो आणि ख्रिस्ताच्या रक्ताच्या पुण्याईवर टेकून राहण्याचे तुम्ही सोडून देतो. असल्या तत्त्वज्ञानाने जे फसतात तें सैतानाच्या लुच्चेगिरीमुळे आपल्या बक्षिसास मुकतात. तें स्वपुण्याईवर टेकून राहतात, स्वेच्छेने नम्रता धारण करतात, स्वनाकारही करावयास तयार असतात आणि स्वत:ला नीच करून घेतात व त्या अत्यंत निरर्थकतेला आपली मने देऊन टाकीतात. जे त्याचे मित्र मरून गेलेले आहेत. त्यांच्याकडून त्यांना विक्षिप्त कल्पना प्राप्त होतात. सैतानाने त्यांची दृष्टी अधळी केलेली असतें, त्यांची न्यायबुद्धि भ्रष्ट केलेली असतें. इतकी कीं त्यांना वाईट काय हें दिसूनच येत नाही आणि त्यांचे मृत मित्र आता उच्च दर्जाचे दृत झालेले आहेत असें तें समजतात. त्यांजकडून त्यांना मार्गदर्शन मिळून तें त्याप्रमाणे वागतात. CChMara 357.3

    सैतानाचे मोह आणि त्याच्या करामती यांचा सर्वत्र आणि जोरकसपणे प्रतिकार करून सावधगिरी बाळगली पाहिजे असें मला सांगण्यांत आलें आहे. प्रकाशाचा दूत असें स्वरूप धारण करून हजारों लोकाना तो फसवीत आहे व गुलाम करून नेत आहे. मानवी मनाच्या विज्ञानशास्त्राचा तो घेत असलेला आधार फार मोठा आहे. सामुद्रिक विद्याशास्त्र, मानसशास्त्र, आणि मोहीनी विद्याशास्त्र ह्यांच्या साधनांनी तो सरळ ह्या पिढीला गाठितो आणि मानवी स्वभावाच्या कसोटीत लागणाच्या प्रयत्नांना त्याची ती शक्ती दिसून येते.CChMara 358.1