Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण ५४ वें - रोगग्रस्तांप्रीत्यर्थ प्रार्थना

    शास्त्र असें सांगते कीं, “लोकांनी सर्वदा प्रार्थना करावी व थकू नये.” (लूक १८:१) प्रार्थनेची गरज आहे असें जर कधीं त्यांना वाटत असेल तर ज्यावेळीं शक्ति नाहींशीं होतें व जीव जणू काय निसटून जाते आहे असें त्यांस भास लागते तेव्हां. प्रकृति जेव्हां अगदीं ठाकठीक असतें तेव्हां दैनंदिन व वर्षानुवर्षे होत असलेल्या अद्भुत कृपेचे त्यांना स्मरणहि होत नाही ना त्या उपकाराबद्दल ईश्वराची स्तुतिहि करण्यांत येत नाहीं. परंतु आजार आला कीं देवावी आठवण होतें. मानवी शक्ति ढासळली कीं मानवाना दैवी साहाय्याची गरज वाटते. खरेपणाने देवाच करुणा भाकल्यास तो कृपावत देव कदापि आपले तोंड फिरवीत नाहीं. आरोग्यांत तसाच आजारातही तो आमचा आश्रय असतो.CChMara 329.1

    पृथ्वीवर असतांना ख्रिस्ताने जी सेवा केली तीच ती मायाळू वैद्य आजहि करीत आहे. प्रत्येक आजारावर त्याचपाशीं मलमपट्टी आहे व प्रत्येक दुर्बळता काढून टाकण्याची शक्ति त्याजजवळ आहे. पुरातन काळ्या शिष्यवर्ग ज्याप्रमाणे रोगग्रस्तांसाठी निश्चितपणे प्रार्थना करत असें तसेच त्याच्या शिष्यांनी आजही करावयास पाहिजे. गुण पडू लागले कारण “विश्वास ची प्रार्थना दुखणाईतास वाचवील.” आम्हांजवळ पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आहे व देवाची वचने परिपूर्ण होतील अशा विश्वासाची खात्री आहे. त्यांनी दुखणाईतावर हात ठेविले म्हणजे तें बरें होतील.” हें प्रभूचे वचन प्रेषितीय काळीं जसे विश्वसनीय होतें. तसेच आजही आहे. ईश्वरी लोकांचा हक्क काय आहे तें त्यावरून दिसून येते. आपल्या विश्वासाच्या कक्षेत काय आहे तें सर्व करण्यांत आमच्या विश्वासाने सिद्ध झाले पाहिजे. ख्रिस्ताचे सेवक हें त्याच्या कार्याचे हस्तक होत व त्यांच्याद्वारे त्याची निरोगी करण्याची शक्ति कार्यकारी व्हावी अशी त्याची इच्छा असतें. आमच्या विश्वाससंपन्न हस्तांनी आजार्‍यांना व दुखणाईतांना आम्ही देवापुढे सादर करावे हें आमचे कर्तव्य आहे. त्या महान् वैद्यावर विश्वास ठेवावा असें आम्ही त्यास शिक्षण द्यावे. आजारी, निराश्रित आणि संकटग्रस्त लोकांनी तारकाच्या सामर्थ्याचा उपभोग घ्यावा असें आम्हीं त्यास उत्तेजन द्यावे असा आमच्या तारकाचा मनोदय आहे.CChMara 329.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents