Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    शिक्षकाच्या योग्यतेचे गुणधर्म

    तुमच्या शाळेचा मुख्याधिकारी हा भक्कम स्वभावाचा मनुष्य असावा. शिस्तसंरक्षणाच्या कार्यात त्याची बळकट शरीरप्रकृति उपयोगी पडावी, सुव्यवस्था, नीटनेटकेपणा आणि उद्योगशीलता या संवयाचे विद्यार्थ्यांना वळण लावणारा असा तो असावी. कसलेही काम हाती घेतले तर तें पुरें करून टाका. सर्वसाधारण विषय जर तुम्हीं विश्वासूपणाने शिकविलेत तर तुमच्या विद्यार्थ्यांतून पुष्कळजण सुवार्ता-प्रवर्तक, धर्मवाङ्मय विक्रेते व सुवार्तिक म्हणून कामाला लागतील. सर्वच कामगार मंडळी भारी भारी शिक्षणाची असावी असें कांहीं वाटण्याची गरज नाहीं. 18CT 213, 214;CChMara 279.3

    धर्मसेवेसाठीं करावयाची निवड जितकी गांभीर्याने करितात तशाच प्रकारे शिक्षकांची निवड करितांना हरएक सावधगिरी घेतली पाहिजे. ज्यांना शालांची पारख करिता येते, अशाच चतुर लोकांकडून निवड करण्यांत यावी. तरुणांना सुशिक्षण देण्यांत यावे व त्याची मने तयार करावीत यासाठी अत्यंत बुद्धिवान् शिक्षक हस्तगत करण्याची गरज असतें आणि आमच्या मंडळाच्या शाळेतर्फे पुष्कळ कामें यशस्वी रीतीने पार पाडता येतील अशाच शिक्षकांची गरज पडणार आहे. ज्यांना कारभार चालविता येणार नाही अशा तरुण व अनुभवी शिक्षकास नेमण्यात येऊं नये कारण त्यांच्या खटपटीने बेशिस्त होण्याचा संभव असतो. 19CT 174, 175; CChMara 279.4

    कसोटी व चौकशी करून शिक्षक जर देवावर प्रीति करणारा व त्याचा अवमाव न करणारा असेल तरच त्याला कामावर घेण्यात यावे. शिक्षकमंडळ जर देवाच्या शिक्षणतालमींतील असतील व खिस्तापासून जर तें आपले रोजरोजचे धडे घेत असतील, तरच तें ख्रिस्ताच्या बाजूने कार्य करूं शकतील. ख्रिस्तासह त्याना जिंकता येईल व आकर्षण करिता येईल, कारण प्रत्येक मूल व प्रत्येक तरुण फार मौल्यवान असतो. 20FE 260;CChMara 280.1

    त्याच्या शैक्षणिक लायकीपेक्षा त्यांच्या वागण्याच्या रीतीभाती व त्याचे तात्विक जीवन याविषयींचा विचार शिक्षक घेतांना अधिक महत्त्वाचा असतो. त्यानें योग्य प्रकारचे वळण पाडावें म्हणून तो संपूर्णत: आत्मसंयमन करणरा असावा. आपल्या विद्यार्थ्यांविषयी खुद्द त्याच्या अंत:करणांतील प्रीति इतकी ओतप्रोत भरलेली असावी कीं ती त्याच्या दृष्टींत, भाषणात व कृतींत दिसून यावी. 21FE 19; CChMara 280.2

    एक ख्रिस्ती सभ्यगृहस्थ म्हणून शिक्षकाने नेहमीच आपली वागणूक ठेवावी. आपल्या विद्याथ्र्यांचा मित्र व सल्लागार असा तो असावा. जर आमचे सर्वच लोक-शिक्षक, दीक्षित सेवक, व मंडळीचे सभासद ख्रिस्ती विनयशीलता अंगीकृत करितील तर तें फार सहजगत्या जनसमुहशीं समरस होऊन जातील. विचार करून सत्य ग्रहण करण्यास पुष्कळ अधिक जण तयार होतील. जेव्हां प्रत्येक शिक्षक “स्व’ला विसरुन जाईल व आपल्या विद्यार्थ्यांच्या भरभराटीसाठीं व उत्कर्षासाठी आस्थापूर्वक मन घालील आणि ही प्रजा देवाच्या मालकीची असें समजून त्यांच्या मनावर व शीलावर पाडलेल्या वजनाचा मला जबाब द्यावा लागणार आहे, जेव्हां तो आपल्या ध्यानात बाळगील, तेव्हांच कोठे आमची शाळा अशी होऊन जाईल कीं तिच्यांत रेंगाळणाच्या दिव्यदुतांनासुद्धा तेथेच रेंगाळण्यास आवडू लागेल. 22CT 93, 94;CChMara 280.3

    ज्या शिक्षकाचा नैतिक दर्जा भारदस्तीचा आहे, जे विश्वसनीय आहेत, जे आपल्या धर्मनिष्ठेत भक्कम आहेत, जे चतुर व शांतवृत्तीचे आहेत, जे देवाची सोबत करून वाईटाच्या नुसत्या दृश्यापासून दूर राहतात अशाच शिक्षकांची आमच्या मंडळीच्या शाळांना गरज आहे.CChMara 280.4

    स्वभावानें गर्विष्ठ आणि निष्ठर अशा शिक्षकाची तरुण मुलावर नेमणूक करणे हें पाप होय. ज्या मुलांचे स्वभावधर्म झपाट्यानें वाढत आहेत अशांचे असला शिक्षक मोठे नुकसान करील, जे शिक्षक ईश्वरासमोर नम्र नाहींत व ज्या मुलांवर आपली नेमणूक झालेली आहे त्याच्यावर ज्या शिक्षकांची प्रीति नाहीं अगर जे पुढे पुढे करितात त्यांचा पक्ष धरतात आणि नावडती, अस्थिर व बेचैन मुलांकडे दुर्लक्ष करतात असें ज्या शिक्षकाकडून घडते त्यांना कामावर ठेवू नये कारण त्यांच्या कामाकडून ख्रिस्तासाठी जे आत्मे आहेत त्यांचा नाश होईल.CChMara 280.5

    विशेषत: जी मुलें स्वभावाने शांत व मायाळ असतात आणि आपल्या सहनशीलतेची व प्रेमाची इतरांना गरज आहे असें ज्या मुलांच्या मनात फार असतें अशा मुलांना शिक्षकांची गरज असते. 23CT 175, 176; प्रार्थनेची आवश्यकता जर शिक्षकाच्या ध्यानात आली नाहीं वे ईश्वरासमोर जर त्यानें आपलें अंत:करण विनम्र केले नाही, तर शिक्षण-शास्त्रातील एका आवश्यक गुणाला तो मुकला असेच होईल.२४CChMara 280.6

    शिक्षकाच्या शारीरिक आरोग्यांवरून दिसून येणार्‍य लायकीचे महत्त्व किती हें सागावें तितकें थोडेचं होईल. कारण जितका तो आरोग्यसंपन्न तितकाच तो अधिक कार्यसपन्नही होऊ शकेल. अशक्ततेमुळे अगर आजारामुळे ज्याची प्रकृति ढासळलेली आहे त्याचे मनही विचार व कार्य करावयास असावें. तितके मोकळे व बळकट राहूं शकत नाही. मनाचा परिणाम अंत:करणावर घडतो परंतु शारीरिक दुर्बलतेमुळे मन निरुत्साही होतें व त्यांतील काय यांतील अंतर शिक्षकाला कळन येत नाही. आजारी प्रकृतीमुळे शांत व आनदी वृत्त ठेवणे अगर प्रामाणिकपणे व न्यायाने वागणे ही गोष्ट त्याच्यासाठीं इतका सोपीशीं राहत नाहीं. 24CT 231;CChMara 281.1