Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण ३२ वें - मातोश्री व तिचें मूल

    केवळ गृहकृत्यांच्या कटकटीत गढून जाण्याऐवजी पत्नीने-मातेने वाचनासाठी कांही वेळ काढावा, सद्य:स्थितीची काहींतरी माहिती मिळवावी. आपल्या पतीची चांगली सहचारिणी व्हावे व आपल्या मुलांची मानसिक प्रगति कशी काय होत आहे, तें तिने पाहात राहावे. आज ज्या संधि तिच्या हाती आहेत त्याचा आपल्या चिरजीवांच्या उन्नतीसाठीं चतुराईनें उपयोग करावा. आपला प्रिय उद्धारक हा रोजचा सोबती व परिचित मित्र कसा होईल याकडे तिने आपला वेळ व मन घालावे. प्रभूच्या वचनाचा अभ्यास करण्यांत तिने वेळ घालवावा. मुलाबाळासाह उघड्या शेतावर जाण्याचा तिने प्रसंग काढून सौंदर्य संपत्तीवरून व देवाच्या हस्त-कार्यावरून मुलांना देवाचे ज्ञान देत राहावें.CChMara 201.1

    तिनें स्वत:ला उत्तेजित, आनंदित ठेवावे. अवघ्या शिवण कामातच हरएक क्षण घालण्याऐवजी रोजची कामे आटोपल्यावर संध्याकाळची वेळ भेटीगाठींत, कौटुबिक मेळाव्यात, आनंदात व मर्जत घालवावा. असें झाले तर पुष्कळशीं पुरुषमंडळी बैठकीत अगर अन्य ठिकाणच्या करमणुकीकडे न धावतां घरच्याच सार्वजनिक सहवासात रमून जाणे त्यांना अधिक आवडेल. बर्‍यचशा मुलाना इकडे तिकडे रेंगाळण्याची अगर कानाकोपर्‍यतून भटकण्याची पाळी टाळितां येईल. निरर्थक व गैरशिस्त संगतसोबतीपासून पुष्कळशा मुलींचे संरक्षण करता येईल. आईबापांना व मुलाबाळांना आपल्या गृहाचे वातावरण देवाच्या मर्जीप्रमाणे करावे हा एक त्याच्या आयुष्यभर पुरेल असा आशीर्वादच होऊन जाईल. वारंवार असें विचारण्यांत येते कीं, “बायकोला आपल्या स्वत:चे इच्छा-स्वातंत्र्य नसावेंच कीं काय?” पवित्रशास्त्रामध्ये असें स्पष्ट सांगितलें आहे कीं, नवरा हा कुटुंबाचा मस्तक असतो. बायकांनो, तुम्ही आपापल्या नवर्‍यांच्या अधीन असा.” येथेच जर ह्या आज्ञेची अखेरता असेल तर बायकोचा दर्जा कांही स्पृहणीय वाटत नाही; परंतु त्याच आज्ञेचा शेवट कसा केला आहे तें पाहा “जशा प्रभूच्या अधीन तशा.” आमच्या अंगी देवाच्या आत्मा असला पाहिजे. नाहींतर आमच्या गृहांत ऐक्य कदापि नादावयाचे नाही. ज्या बायकोच्याठायी ख्रिस्ताची वृत्त आहे ती आपल्या बोलण्यांत सावधगिरी ठेवील, ती आपले मन आटोक्यात राखील, नम्रता धारण करील तरी आपल्या नवर्‍यची दासी म्हणून राहाणार नाही; तर ती त्याची सहचारिणी राहील. नवरा जर देवाचा सेवक असेल तर तो तिच्यावर सत्ता गाजवणार नाहीं, तो लहरी आणि जुलमी व कडक असणार नाही. नुसत्याच CChMara 201.2

    अति चिंतातुरतेनें गृहात प्रेमाचे वातावरण आम्हांला बनविता येणार नाही. कारण ज्या गृहीं प्रभूची वस्ती असतें, तें प्रत्यक्ष स्वर्गस्थानच होत असतें. जर एकाच्या हातून कांही चूक घडली तर दुसरा ख्रिस्तासारख्या सहनशीलतेने त्याजकडे पाहील. त्याजवर रागावणार नाही. 1 AH 110-118;CChMara 202

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents