Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    हितचिंतन क्षेत्रांत मातेची कर्तृत्वशक्ति

    मातेच्या संसार गरिबीचा असू शकेल, परंतु पित्यासह एकत्रित झालेले तिचे वजन शाश्वत काळाप्रमाणे अढळ असें असतें. हितचिंतनाच्या बळाविषयी म्हणाल तर तें देवाच्या खालोखाल एकट्या आईचच मात्र अत्यंत थोर असें असतें. CChMara 208.4

    आपल्या मुलांच्या भोंवती असलेली संकटें ताडून घेण्यास ख्रिस्ती मातेची नजर नेहमीच उघडी असतें. ती आपले मन निर्मळ व शुद्ध राखिते. देवाच्या शास्त्रानुसार ती आपला स्वभावधर्म व वागणूकीची तत्त्वे नियमितपणे पाळीत असतें आणि आपली कर्तव्ये विश्वासूपणे करून नेहमीच सहज आडवणार्‍य मोहापासून ती दूर राहाते. CChMara 208.5

    मुलांची जिज्ञासु शक्ति चलाख असतें. उतावळ्या व रागीट हुकमाहून शांत व प्रेमळ शब्द कसे निराळे असतात हें त्यांना समजून येते, कठोर शब्दामुळे मुलांच्या अंतर्यामातील जिव्हाळा सुकून जातो. चिडखोरपणामुळे आणि सहानुभूतिपर प्रीतिच्या अभावामुळे खरी ख्रिस्ती आई आपल्या मुलांना धुडकावून लावणार नाहीं.CChMara 209.1

    मातांनो, आपले वजन व आपला कित्ता हीं आपल्या मुलांच्या शीलावर व भवितव्यावर परिणाम करुं शकतात ही गोष्ट जागृत होऊन पाहून घ्या. आपली जबाबदारी ओळखून समतोल मन व शुद्ध आचरण प्रगल्भ होऊ द्या. जे. कांही सत्य, जे कांही चांगले व कांही उत्कृष्ट यावर नजर ठेवीत राहा. CChMara 209.2

    पुष्कळशा नवर्‍यांना व मुलांना घरचे आकर्षण मुळींच वाटत नाहीं. कठोर शब्दां व कुरकुत्या वाणीने त्याचे निरंतर स्वागत केले जाते. म्हणून घरापासून दूर कोठेतरी नाटकगृहात अगर वर्क्स केलेल्या ठिकाणी तें आपले सुखसमाधान शोधीत राहातात घरांत पत्नि व माता घरच्या चिताकाळजीनें व्याप्त झालेली असतें, त्यामुळे त्यांच्यापुढे आपले मानसिक ओझे न उलगडतां अल्पशा विनयशील शब्दांनी आपल्या नवर्‍यांशी व मुलांशी बोलण्याचे तिला भानच राहात नाही. भोजन-तयारीच्या अगर दुसर्‍य घरकामात ती गुंतलेली असतां घरांत नवरा व मुलगे परक्याप्रमाणे येतात तसे जातात.CChMara 209.3

    घरांमध्ये आया जर गबाळ्या वस्त्रानी राहात असतील तर आपल्य मुलांना गबाळपणे राहाण्याचा त्या शिकवीत राहातील. घरात मळके सळके कपडे चालून जातात असें पुष्कळ आयास वाटत असतें. परंतु कुटुंबांत त्याचे वजन लवकरच नष्ट होऊन जाते. आपल्या आईपेक्षा दुसर्‍यांची कपडे किती नीटनेटकी असतात हें मुलांना कळून चुकते. व आईविषयींचा त्याचा आदर कमी होऊन जातो.CChMara 209.4

    आपल्या हातांनी काम केल्याने नीचपणा येतो असें न मानिता आपला गृहकारभार सुव्यवस्थित करण्याची आवश्यकता पुढे ठेवून खरी गृहिणी व माता आपली कर्तव्ये मोठ्या अभिमानाने व आनंदाने करीत राहील. 2AH 231-254;CChMara 209.5