Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मंडळींतील तंटे मिटवियों

    अंत्युखियापासून यरुशलेमास आलेल्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या मंडळ्यातील भावाची भेट घेतली. तें सर्वसाधारण सभेसाठी जमले होतें. त्यांनी त्यांना विधर्मी लोकांत जो विजय मिळाला होता त्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. नंतर त्यांनी निर्माण झालेल्या गोंधळाची स्पष्ट रुपरेषा दिली. कांहीं पालट झालेल्या परुशांनी अंत्युखियेला जाऊन असें जाहीर केले होतें कीं, तारण होण्यासाठी विधर्मातून पालट झालेल्यांनी मोशाचे नियमशास्त्र पाळून सुंता करून घेतली पाहिजे. त्या सभेत या प्रश्नाचा खल मनापासून झाला.CChMara 109.4

    पवित्र आत्म्याला दिसलें कीं, विधभतून पालट झालेल्यांना विधि नियमशास्त्र पाळायला भाग पाडणे चागले नाहीं. प्रेषितांचे याविषयींचे मत देवाच्या आत्म्याप्रमाणेच होतें. याकोब सभेचा अध्यक्ष होता. त्याचा शेवटचा निश्चय म्हणजे “माझा निर्णय हाच कीं आम्ही त्यांना त्रास देऊ नये कारण तें विधर्मी लोकांतून देवाकडे वळले आहेत.” याकडून वादविवाद मिटला. CChMara 110.1

    याबाबीत सभेनें दिलेला निकाल जाहीर करण्यासाठींच याकोबाला निवडला होता असें दिसते. ख्रिस्ती धर्माशी विसंगत वाटणार्‍य रीति विधर्मी विश्वासणार्‍यांनी सोडायच्या होत्या म्हणून वडील व प्रेषित यांनी विधम्र्यांना पत्राद्वारे मूर्तीला अर्पिलेले न खाणे, जारकर्म, रक्त व गुदमरून मेलेले खाऊं नये हें शिकविण्यासाठी एकमत केले. त्यांनी देवाच्या आज्ञा पाळून पवित्र आचरण करावे म्हणून सांगण्यांत यावे असें ठरले. आणखी त्यांनी अशी खात्री देण्यांत आली कीं, जे सुंता करून घ्या म्हणतात त्यांना तसा अधिकार प्रेषितांनी दिलेला नाही. 6AA 190-195; CChMara 110.2

    ही बाब मिटविण्यासाठी जी सभा भरली होती तिच्यामध्ये यहदी व विधर्मी मंडळ्या स्थापन करण्यांत जे प्रमुख प्रेषित व शिक्षक होतें. त्यांचा समावेश होतो. सोबत वेगवेगळ्या ठिकाणचे निवडलेले प्रतिनिधी होतें. यरुशलेमांतील वडील व अत्युखियाहून पाठविलेले प्रतिनिधि हजर होतें आणि फार वजनदार मंडळ्यांचे प्रतिनिधिहि हजर होतें. सभेचे कामकाज आत्म्याच्या न्यायानुसार व मंडळीच्या दैवी इच्छेने स्थापन झालेल्या दर्जाने चालत असें. त्यांच्या मसलतीचा परिणाम असा झाला कीं, देवाने लोकांना या बाबतीत पवित्र आत्मा दिला व आत्म्याच्या मार्गदर्शनाचे अनुकरण आपण केले पाहिजे हें त्यांना कळून आलें. CChMara 110.3

    सर्व ख्रिस्ती लोकांना यावर मत देण्यास बोलाविले नव्हते. ‘प्रेषित व वडीलवर्ग’ म्हणजे वजनदार व सभ्य अशा प्रेषित व वडील वर्गाने हा जाहीरनामा तयार करून प्रसिद्ध केला. बहुतेक ख्रिस्ती मंडळ्याकडून त्याचा स्वीकार करण्यांत आला. तरी सर्वांना हा ठराव मान्य नव्हता. कांही महत्त्वकांक्षी व स्वत:वर भरवसा ठेवणाच्या भावांना हा ठराव मान्य नव्हता. ही माणसें आपल्या जबाबदारीवर कार्यात गुंतण्याचे धरून चालतात तें कुरकुर करणे व दोष काढणे यांत आनंद मानतात; नवीन योजना आखतात ; देवाच्या सुवार्तेचा निरोप शिकविण्यासाठी निवडलेल्यांचे काम हाणून पाडतात. अगर्दी आरंभापासून मंडळाला हें अडखळण आहे व काळाच्या शेवटापर्यंत राहील. 7AA 196, 197; CChMara 110.4