Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    वादळासाठी सिद्ध व्हा

    विरोधांचे कोपाचे जे वातावरण अखेरच्या दिवसात उपस्थित होणार आहे त्याला तोंड देण्यासाठी आपल्या लोकांनी तयार व्हावे. हें देवाने उघड करून सागितलेले आहे. येणार्‍या वादळशच्या वेळी प्रभु आपल्या विश्वासू जनास त्या दिवसाच्या संकटांत आसरा देऊन संभाळून घेईल अशा समजुतीने निवांत बसू नये याबद्दल त्यांना पूर्वसूचना दिलेली आहे. प्रभुच्या आगमनाची अपेक्षा करणारे आम्ही लोक आहोत, परंतु ती अपेक्षा आळसांत बसून न करिता आपापल्या कामात आस्थेवाईक व आपापल्या विश्वासांत अढळ असें राहावयास पाहिजे आहे. कमी दर्जाच्या गोष्टींमध्ये मनें गुविण्याची आता वेळ राहीलेली नाही. मानवजात गुग्गीत लोळत असतां सैतान अशा कांही गोष्टी जुळवून आणण्यात निमग्न असतो कीं त्यावरून प्रभूच्या लोकांना दया अगर न्याय ही मिळच नयेत. रविवारविषयक चळवळीचे आपले कार्य तो अधारातून करीत आहे. पुढारीवर्ग वस्तुस्थिति छपवून ठेवीत आहेत आणि ह्या चळवळींत जे सामील आहेत त्यांतील पुष्कळांना यामागील उद्दीष्ट काय आहे हें कळून येत नाही तिचे स्वरूप सौम्य व ख्रिस्तीत्वाचे दिसते, पण कार्य करताना त्या चळवळीने सैतानाचाच आत्मा प्रगट होईल. CChMara 363.3

    स्तोत्रकर्ता म्हणतो, “मनुष्याच क्रोध तुझ्या स्तुतीचे साधन असा होतो; अवशिष्ट क्रोधाने तू आपली कमर बाधितोस.” स्तोत्र ७६:१०. देवाचे असें म्हणणे आहे कीं टीकारक सत्य जरी तिरस्कारणीय मानलेले असेल तरी पुढे करून तें चौकशीचा व वाटाघाटीचा विषयच होईल. मानवाची मने सचेतन केली पाहीजेत. प्रत्येक वादग्रस्त गोष्ट प्रत्येक निंदात्मक बाब, प्रत्येक प्रकारची नालस्ती, ही चौकशी करण्यासाठी मानसिक जागृतीसाठी ईश्वराची साधने आहेत व असली जागृत केली नाही तर मने निद्रावस्थेत पडून राहतील. CChMara 364.1

    देवाने आम्हांकडे सोपविलेले कार्य आम्ही साध्य केलेले नाही. रविवार विषयक कायदा अमलांत आणताना आम्हापुढे कोणता प्रश्न उपस्थित होईल त्यासाठी आमची तयारी नाही. येणार्‍य संकटाची चिन्हे दिसत असतांना कार्यासाठी जागृत व्हावे हें आमचे कर्तव्य आहे. सदेशशास्त्रात निवेदित केल्याप्रमाणे कार्य तर चालूं रहाणार आणि प्रभु आपल्या लोकांचे आश्रयस्थान होणारच अशा विश्वासाने समाधान मानून संकटाची अपेक्षा करीत कोणीही स्वस्थ बसता कामा नये. आमच्या मत-स्वातंत्र्याच्या संरक्षणार्थ कांही एक न करिता निर्धास्त बसणे यांत आम्ही इच्छेप्रमाणे वागत नाही. एवढा काळपावतो दुर्लक्ष केलले कार्य संपेपर्यंत हें संकट पुढे ढकल्याण यावे अशी आस्थेची व अर्थभरित अशी प्रार्थना देवाकडे गेली पाहिजे. अत्यंत कळकळीची प्रार्थना करण्यांत यावी आणि प्रार्थनेनुरूप आमची कर्तबगारीही चालूं ठेविली पाहिजे. जणू काय सैतान विजयी झालेला आहे आणि सत्यावर असत्याची व अतिक्रमणाची मात झालेली आहे असा भास होईल. परंतु शत्रुच्या तावडीतून सुटका करण्यासाठी पुरातन काळी परमेश्वराने आपल्या लोकांसाठी काय काय केले हें आम्ही ध्यानात आणावे अशी त्याची इच्छा आहे. आता सैतानाच्या हातून आपली सुटका होणे अशक्यच, अशा अतिरेकाच्या प्रसंगाचा आपल्या सामर्थ्याच्या प्रगटीकरणासाठी परमेश्वराने नेहमीच योजना केलेली असतें. मानवांची गरज ही परमेश्वराची संधि असते.CChMara 364.2

    माझ्या बंधूंनो आता आम्हांकडे जो कसोटीचा प्रसंग आहे त्याच्या तयारीवर तुमचे स्वत:चे तारण व इतराचे निर्णयात्मक भवितव्य अवलंबून आहे, हें तुम्ही ध्यानात आणाल का ? विरोधाचे धक्के तुम्हांला बसतील तेव्हां त्यांना तोंड देण्यासाठी लागणारी कळकळीची आस्था, धार्मिकता व भक्तिभाव तुमच्या अगी आहे का? जर देवाने मला कधीं कांही सांगितलें असेल तर तें हेंच कीं तुम्हांला लोकसभांपुढे उभे करितील व ज्या सत्यासाठी तुम्ही जगत आहा त्याच्या हर एक बाबींवर कडाडून टीका करण्यांत येईल, अशी वेळ येत आहे. येणार्‍य संकट प्रसंगाकरिता सिद्ध होण्यासाठी देवाने आम्हांला बजावून सांगितलें आहे तो वेळ पुष्कळजण आज वाया जाऊ देत आहेत.CChMara 364.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents