Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ख्रिस्त मनुष्याला देवाचा पुत्र बनण्यास सामर्थ्य देतो

    वधस्तभीं जाण्याअगोदरच्या रात्रीं त्या माडीवर ख्रिस्ताने बोललेल्या शब्दाचा अभ्यास करूं या तो आपल्या चौकशीच्या घटकेजवळ येत होता व आपल्या शिष्याचे समाधान करण्याचे ठरविलें कारण त्यांना मोह व छळ भयंकररीत्या येणार होते.CChMara 136.9

    देवाशीं संबंध असलेल्या ख्रिस्ताच्या शब्दांचा अर्थ शिष्यांना कळला नव्हता. त्याची पुष्कळशी शिकवणूक त्यांना अंधूक अशी होती. त्यांनी त्यांचा संबंध व त्यांचे हल्लीच्या भविष्य काळांतील कल्याण याविषयींचे अज्ञान प्रगट करणारे अनेक प्रश्न विचारलें होतें त्यांना देवाचे स्पष्ट ज्ञान व्हावे अशी ख्रिस्ताची इच्छा होती. CChMara 137.1

    जेव्हां पन्नासाव्या दिवशीं शिष्यांवर पवित्र आत्मा आला, तेव्हां ख्रिस्तांने दाखल्याद्वारे सांगितलेले सत्य त्यांना कळले. त्यांना जे शिक्षण गूढ वाटत होतें, तें स्पष्ट झाले. पवित्र आत्मा आल्यावर त्यांना जो समज प्राप्त झाला त्याकडून त्यांना त्यास चुकीच्या तत्त्वांची लाज वाटली. त्यांचे विचार व त्यांनी केलेला अर्थ, त्यांना आता मिळालेल्या स्वर्गीय गोष्टीच्या ज्ञानाशी तुलना करणे मूर्खपणाचे वाटले. त्यांना आत्म्याने चालविले होतें, त्याच्या अंधुक विचारांत प्रकाश शिरला. CChMara 137.2

    पण अजून पूर्णपणे ख्रिस्ताच्या वचनाची पूर्णता शिष्यांना प्राप्त झाली नव्हती. त्यांना समजण्याइतके देवाचे सर्व ज्ञान प्राप्त झाले. देवाविषयींचे वचन ख्रिस्त पूर्णपणे दर्शवू शकला असतां तें त्यांना प्राप्त झाले नव्हते. हीच गोष्ट आज आहे. देवाविषयींचे आमचे ज्ञान अपुरे आहे. जेव्हां हा लढा संपेल व आपल्या विश्वासू कामदारांना पित्यासमोर येशू ओळखील तेव्हां जे या पापीष्ट जगांत त्याची खरी साक्ष देणार आहेत त्यांना ज्या गोष्टी रहस्यमय वाटतात त्या स्पष्टपणे कळतील.CChMara 137.3

    ख्रिस्तानें आपल्याबरोबर स्वत:चा गौरवी मानवीपणा स्वर्गीय राजवाड्यांत नेला. जे त्याचा स्वीकार करतात त्याना देवाचे पुत्र होण्याची शक्ति देतो अशासाठीं कीं शेवटी त्यांना देवाने स्वीकारावे व त्यांनी सार्वकालिकरीत्या त्यांच्याबरोबर वस्ती करावी. जर या आयुष्यांत तें देवाशी एकनिष्ठ राहतील तर तें शेवटी त्याचे मुख पाहतील. त्याचे नांव त्याच्या कपाळावर लिहिले जाईल. (प्रगटी २२:४.) देवाला पाहाण्याशिवाय दुसरा कोणता आनंद आहे? ख्रिस्ताच्या कृपेने ज्या पाप्याचे तारण झाले आहे त्याला देव आपला पिता आहे असें समजून त्याचे मुख पाहावयास मिळल त्यापेक्षा दुसरा कोणता मोठा आनंद आहे ?CChMara 137.4