Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    व्यवहारिक जीवनांतील कर्तव्य-शिक्षणाचे महत्त्व

    इस्राएल लोकांच्या काळी करीत त्याचप्रमाणे आजसुद्धा प्रत्येक तरुणाला व्यवहारिक जीवनातील कर्तव्याचे शिक्षण देण्यांत यावे. प्रपंच चालविता यावा म्हणून प्रत्येकाने गरजेप्रमाणे काहीं तरी धदे-शिक्षण हस्तगत करावें. चरितार्थांत निरनिराळ्या घडणाच्या उलाढालींना तोंड देता यावे म्हणूनच हें अवश्य आहे असें नाही तर त्याचा आमच्या शारीरिक मानसिक व नैतिक विकासाशी संबंध येतो. CChMara 282.4

    आमच्या शिक्षणसंस्थांतून निरनिराळ्या उद्योग धंद्याच्या योजना चालूं ठेवाव्यात. तेथील शिक्षणांत जमाखर्च अगर हिशेब ठेवणे, सुतारकी आणि शेतकी व्यवहारांतील अवश्य त्या गोष्टींचा समवेश करण्यांत यावा. लोहकाम, चित्रकला, चर्मकाम तसेच पाकशास्त्र, भटारखाना, परीटकाम, टायपिंग व मुद्रणकलेच्या शिक्षणाचाही तरतूद करण्याची योजना करण्यांत यावी. असल्या प्रकारच्या शिक्षणासाठी आमच्या बुद्धिचा भरपूर व्यास करावा असें कीं यांतून तयार झालेले विद्यार्थी व्यवहारिक जीवनासाठी चांगले सिद्ध होतील. CChMara 282.5

    स्त्रीविद्यार्थी-मंडळाच्या आटोक्यात येतील असें अनेक उद्योगधंदे आहेत त्यांना द्यावयाचे शिक्षण व्यापक स्वरुपाचे व व्यवहारिक असावे. शिवणकामाची व बगीचाकामाची त्याना माहिती द्यावी. त्याना फुलझाडे व फळझाडे यांची लागवड करता येईल. याप्रकारे उपयुक्त उद्योग-शिक्षण देता देतां त्यांना उघड्या हवेतील आरोग्यकारक व्यायामही मिळून जाईल. 31CT 307; 312;CChMara 282.6

    मनाचा शरीरावर त्याचप्रमाणे शरीराचा मनावर योग्य प्रभाव घडावा म्हणून जोर दिला पाहिजे. बदिच्या विस्मयकारक सामथ्र्याला मानसिक चळवळींचे पाठबळ मिळाले. म्हणजे संबंध प्रकृति घटनेत सजीवता निर्माण होतें व तेणेंकडून रोग-प्रतिकाराला अमोल्य साह्य मिळून जाते.CChMara 283.1

    शरीरविज्ञानशास्त्रातील एक सत्य शास्त्रामध्ये दिलेले आहे त्याचा आम्ही विचार करणे अशक्य आहे “आनंदी हृदय में उत्कृष्ट औषध होय.’’ 32Ed. 197;CChMara 283.2

    मुलांना व तरुणांना आरोग्य, आनंदीवृत्ति, उल्हास व मज्जास्नायूमध्ये चांगली वाढ करावयाची असेल तर त्यांना उघडी हवा, पद्धतशीर उद्योग व करमणूक देण्यांत यावी. शाळेत जाणार्‍य मुलांना व तरुणांना जर पुस्तकाशींच जखडून ठेविलें तर त्यांची प्रकृति सदृढ राहणार नाहीं. अभ्यासाचा मेंदूवरच भार पडला व त्या प्रमाणात त्यांना शारीरिक व्यायाम मिळाला नाहीं तर रक्ताचे शोषण मेदूकडेच अधिकाधिक होऊन शरीर घटनेत रक्ताभिसरण समतोल राहणार नाहीं. मेंदूला वाजवीपेक्षा जास्त व अवयवांना पाहिजे. त्यापेक्षा कमी रक्त पुरवठा होईल. अभ्यासासाठी ठराविक वेळ व शारीरिक खटपटीसाठीं कांहीं वेळ घालून देण्यांत यावा. खाण्यापिण्याच्या, पोषाख-पेहरावाच्या आणि निजण्याबसण्याच्या त्याच्या संवया आरोग्यशास्त्राला धरून असतील तर शारीरिक आणि मानसिक प्रकृति धोक्यात न आणता त्यांना आपले शिक्षण साध्य करिता येईल. 33CT 83;CChMara 283.3