Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ५ वे - तुम्हांसाठी देवाजवळ काम आहे

    ह्या पृथ्वीवरील देवाचे कार्य मंडळीच्या सभासदातील पुरुष व स्त्रिया यांनी एकत्र येऊन मंडळीचे पाळक व कामदार याबरोबर एकत्र काम केल्याशिवाय संपणार नाहीं. 19 117;CChMara 55.1

    “तुम्ही संपूर्ण सृष्टत जाऊन सुवार्तेची घोषणा करा’ हें शब्द (मार्क १६:१५) ख्रिस्ताच्या प्रत्येक अनुयायाला सांगण्यांत आलें आहेत. ख्रिस्ताच्या जीवनासाठी ज्यांनी स्वत:ला वेगळे केले आहे त्यांनी आपल्या सोबत्याच्या तारणाच्या कार्यासाठी स्वत:ला वेगळे केले आहे. त्याला आत्म्याच्या तारणाची जी कळकळ वाटली तीच त्यांना वाटली पाहिजे. सर्व एकच जागा भरून काढू शकत नाहींत, पण सर्वांसाठी ठिकाण व काम आहे. देवाने ज्यांना आशीर्वाद दिलेला आहे त्या सर्वांना कार्य करायचे आहे त्याच्या राज्याच्या वाढीसाठी प्रत्येक दान कारणी लावायचे आहे. 28T 16;CChMara 55.2

    आत्म्याच्या तारणासाठी सुवार्ताप्रसार में एक लहानसे काम आहे. देवाचा आत्मा पाप्यांना सत्याविषयी खात्री करून देतो व त्यांना मंडळीच्या स्वाधीन करतो. पाळक त्यांचा भाग करूं शकतील, पण मंडळीला जे करायचे काम आहे तें तें करूं शकणार नाहींत. जे अनुभवाने व विश्वासाने नवीन आहेत त्यांची जोपासना करण्यास देव आपल्या मंडळीला सांगतो व त्यांच्याकडे जाऊन गप्पा माराव्या म्हणून नव्हें पण त्यांच्याबरोबर प्रार्थना करावी व “चांदीच्या करड्यात असलेल्या सोन्याच्या फळाप्रमाणे असणारे दैवी वचन त्यांना सांगावे म्हणून तो त्याच्याकडे जाण्यास सांगतो. 34T 69;CChMara 55.3

    प्राचीन काळीं देवाने जसे इस्राएल लोकांना या पृथ्वीवर प्रकाश होण्यासाठी बोलाविले तसेच या दिवसांत तो आपल्या मंडळीला बोलावीत आहे. सत्याच्या बलवान् सुन्याने म्हणजे पहिल्या, दुसर्‍य व तिसर्‍य दूताच्या निरोपाने, त्यानें त्यांना इतर मंडळ्यापासून व जगापासून त्याच्या पवित्र सान्निध्यांत आणण्यास त्यांना वेगळे केले आहे. त्यानें त्यांना आपल्या नियमाचे जबाबदार करुन या काळासाठी असलेल्या भविष्याचे सत्य दिलेले आहे. प्राचीन इस्राएलाना पवित्र प्रगटीकरण दिले तसेच ही पवित्र ठेव जगाला देण्यासाठी दिली आहे.CChMara 55.4

    प्रकटी १४ मधील तीन दृत हें जे कोणी देवाच्या संदेशाचा प्रकाश स्वीकारून त्याचे हस्तक या नात्याने पृथ्वीच्या चारी कोपर्‍यांत हा इशारा देण्यास जातील त्यांचे दर्शक आहेत. ख्रिस्त आपल्या अनुयायांना म्हणतो : “तुम्ही जगाचा प्रकाश आहा” मत्तय ५:१४. जो प्रत्येक आत्मा येशूचा स्वीकार करतो त्याला कलव्हरीवरील क्रूस म्हणतो : “आत्म्याची किंमत पाहा.” “संपूर्ण जगांत जाऊन सुवार्तेची घोषणा करा.” मार्क १६:१५. हें काम करण्यासाठी कोणताही अडथळा येऊ नये. या काळासाठी फार महत्त्वाचे हें काम आहे. अनंतकाळासारखे तें दूरवर जाणारे आहे. येशूनें मानवाच्या तारणासाठीं जो यज्ञ केला त्याद्वारे मानवाच्या आत्म्यासाठी दाखविलेले प्रेम त्याच्या अनुयायांना प्रेरित करील. 45T 455, 456; CChMara 55.5

    अहो, ज्यांनी स्वत:ला ख्रिस्ताला वाहून घेतले आहे अशा प्रत्येक मानवी हस्तकाचा स्वीकार तो करतो. तो दैवी ऐक्यांत मानवाला आणतो. अशासाठीं कीं, अवतारी प्रेमाच्या गुह्य गोष्टी त्याच्याद्वारे त्यानें जगाला प्रगट कराव्यात. त्याविषयी बोलत जा, प्रार्थना करा, गायन गा व त्याच्या सत्याच्या संदेशाने सर्व जग भरून टाका व त्याच्या पलिकडे नेण्यास अधिक झटा. 59T 30;CChMara 56.1

    ख्रिस्ताचे खरे अनुयायी त्याच्यासाठीं साक्ष देतीलCChMara 56.2

    जर तुम्हांपैकीं प्रत्येकजण कार्यक्षम मिशनरी झाला तर या काळाचा संदेश सर्व राष्ट्रातं व भाषेंत गाजविला जाईल. 667 438;CChMara 56.3

    देवाच्या नगरांत ज्याचा प्रवेश होणार आहे तें या पृथ्वींतील जीवितांत त्यांच्या कार्यात ख्रिस्ताला पुढे ठेवितील. याच गोष्टीनें तें ख्रिस्ताचे सदेश वाहक व साक्षी बनतात. त्यांना सर्व वाईट गोष्टीविरुद्ध ठरविलेली स्पष्ट साक्ष द्यावयाची आहे व जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा याकडे पाप्यांना बोट दाखवावयाचे आहे. जे त्याचा स्वीकार करतात त्या सर्वांना देवाचे पुत्र होण्यासाठीं सामर्थ्य देतो. पुनर्जन्माने फक्त आम्ही देवाच्यानगरांत प्रवेश करूं शकतो. ज्या मार्गाने आम्ही आत जाणार तो अरुंद व सरळ आहे व त्यासोबत आम्ही पुरुष, स्त्रिया व मुलें यांना शिकवून तारणासाठी मार्गदर्शक होऊन तारणासाठी नवीन अंत:करण व नवीन आत्मा मिळविणे जरुरीचे आहे असें शिकविले पाहिजे. जुने अनुवंशिक गुण नाहींसे झाले पाहिजेत. आत्म्याच्या स्वाभाविक इच्छा बदलत्या पाहिजेत. सर्व ठकबाजी, खोटी साक्ष, अभद्र भाषण टाकून दिले पाहिजे. ज्या जीविताकडून पुरुष व स्त्रिया ख्रिस्तासारख्या बनतात, तें नवीन जीवित जगले पाहिजे. 79T 23; CChMara 56.4

    माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, ज्या जादूने तुम्हांस पछाडिलें आहे तिला झटकण्यासाठी तुमची इच्छा आहे काय? तुम्ही मरणाच्या सुस्तपणाशी जुळणाच्या आळसातून जागे होणार नाहीं का ? तुम्हांला तें आवडो किंवा न आवडो, जाऊन काम करा. तुम्ही वैयक्तिक कार्य करून पुष्कळ आत्मे ख़िस्ताकडे व त्याच्या सैन्यांत आणा. अशा कार्यात तुम्हांला प्रेरणा व शक्ति प्राप्त होईल. तें या दोहोला उत्तेजित करून शक्ति पुरवील. आत्मिक शक्तीचा उपयोग केल्याने तुमची इच्छाशक्ति बळकट होईल व अशाने तुम्हीं पुर्ण विजयाने तुमचे तारण मिळवून घ्याल. जे ख्रिस्ताचे अनुयायी म्हणवितात अशा पुष्कळावर मरणाची गुगी आली आहे. त्यांना उत्तेजित करण्यास होईल तितकी खटपट करा. इशारा द्या, विनवणी करा, कानउघाडणी करा. देवाच्या प्रीतीने थंड झालेला त्यांचा स्वभाव गरम व मऊ होण्यासाठी प्रार्थना करा व जरी त्यांनी ऐकायचे नाकारलें तरी तुमचे श्रम वाया जाणार नाहींत. इतरांना आशीर्वाद देण्याच्या बाबतींत तुम्हांला स्वत:ला आशीर्वाद प्राप्त होईल. 85T 387;CChMara 56.5

    आपण सुशिक्षित नाहीं म्हणून आपल्याला देवाच्या कार्यात भाग घेता येत नाहीं असें कोणाला वाटू नये. देवाजवळ तुम्हांकरिता काम आहे. प्रत्येक मनुष्याला त्यानें काम दिले आहे. तुम्ही स्वतः पवित्रशास्त्र शोधून पहा. “तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्यानें भोळ्यास ज्ञान प्राप्त होतें. स्त्रोत्र ११९:१२०. तुम्ही कार्यासाठी प्रार्थना करूं शकता. मनापासून विश्वासाने केलेली प्रार्थना देव एकल. तुम्हांला तुमच्या शक्तिप्रमाणे काम करायचें आहे. 96T 433;CChMara 56.6

    स्वर्गीय दूत मानवी हस्तकांबरोबर सहकार्य करण्यास थांबले आहेत अशासाठीं कीं, मानव प्राणी कोणता दर्जा गाठू शकतील व जे आत्मे नाश पावत आहेत त्याच्या तारणासाठी त्यांना काम करता येईल तें प्रगट करावें.CChMara 57.1

    जे हजारों लोक पापांत मरत असून सर्व देशात पसरले आहेत. त्यांच्यासाठीं धीराने व चिकाटीने कार्य करायला ख्रिस्त आम्हांस सांगतो. जे त्याच्या गौरवांत भाग घेतात त्यांनी त्याच्या सेवेत दुर्बलाना, त्रासलेल्यांना व निराश झालेल्यांना मदत करीत भाग घेतला पाहिजे. 109T 30, 31;CChMara 57.2

    प्रत्येक विश्वासणाच्याने मनापासून मंडळीशी संबंध ठेवला पाहिजे. मंडळीची भरभराट ही त्याची पहिली आवडीची बाब पाहिजे आणि मंडळीशी संबंध ठेवणे हें त्याचे पवित्र कर्तव्य आहे असें त्याला वाटल्याशिवाय कांहीं फायदा नहीं. देवाच्या कार्यासाठी काहीतरी करण्याची गोष्ट सर्वांच्या अधिकारातील आहे असें काहीजण आहेत कीं तें मोठी रक्कम चैनीसाठी खर्च करतात. तें आपल्या वासना तृप्त करण्याचा प्रयत्न करतात, पण मंडळी चालविण्यासाठी पैशाद्वारे मदत देणे म्हणजे एक प्रकारचा कर समजतात. तें मंडळीच्या सुसंधींतून जो फायदा होईल तो घेण्यासाठी तयार असतात, पण इतरांनी खर्च भरावा असें म्हणतात. 114T 18;CChMara 57.3

    ख्रिस्ताच्या मंडळीची सैन्याशी तुलना करता येईल. प्रत्येक शिपायाचे जीवित कष्टमय, धोक्याचे व श्रमाचे असतें. चोहोंकडे सावध शत्रु असतात व तें अंध:काराच्या राजाचे सैन्यांतील असतात व तें कधीही झोप घेत नाहींत व आपल्या कर्तव्यापासून पराङ्मुख होत नाहीत. जेव्हां जेव्हां ख्रिस्ती मनुष्य निष्काळजी असतो तेव्हां तेव्हां हा बलवान शत्रु अकस्मात व जोराचा हल्ला करतो. मंडळीचे सभासद कर्तबगार व सावध असल्याशिवाय तें त्याच्या युक्तींपुढे टिकणार नाहींत.CChMara 57.4

    जेव्हां हुकूम होतो तेव्हां सैन्यांतील अर्धे शिपाई जर झोपी गेले किंवा गैरसावध राहिले तर काय होईल? तर त्याचा परिणाम पराजय, किंवा मरण यांत होईल. शत्रूच्या हातून जर कांहीं निसटले तर तें बक्षीसास पात्र आहेत असें समजावे काय ? नाहीं. त्यांना त्वरित मरणदंड भोगावा लागेल. ख्रिस्ताची मंडळी निष्काळजी व अविश्वासू असेल तर त्याहिपेक्षा अधिक गंभीर परिणाम त्यांत गाविले जातील. ख्रिस्ती शिपायाचे झोपाळू सैन्य याशिवाय आणखी भयंकर गोष्ट कोणती ! जगाविरुद्ध कोणती मजल मारु शकू? जे अंधकाराच्या अधिपतीच्या ताब्यात आहेत त्याच्याविरुद्ध कोणती चढाई करुं शकू? लढाईच्या दिवशी जे बेपर्वाईने मागें राहातात आणि जणू काय त्यांना कांहींच गोडी नाहीं, जबाबदारी घेत नाहीत तर त्यांनी ताबडतोब सैन्यातून निघून जावे किंवा दुसरे कांही तरी करावें. 125T 394;CChMara 57.5