Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    “तुम्ही आपलें नव्हां”

    ख्रिस्त लवकर येणार आहे असा आमचा नि:संशय विश्वास आहे. ही कांहीं कल्पित कथा नसून ती सत्य वस्तुस्थिति आहे. आमच्या पापांपासून आम्हांला शुद्ध करावें, आमच्या शीलांतील उणीवा काढून टाकाव्या अगर आमच्या स्वभाव धर्मातील दुबळेपणा हटवावा, हें कार्य तो आल्यानंतर करील असें नाही. हें सर्व करावयाचें तें तो येण्यापूर्वीच सर्वतः करून टाकिले पाहिजे.CChMara 289.1

    प्रभु येईल तेव्हां जे पवित्र आहेत तें पवित्रच राहतील. ज्यांनी आपली शरीर व मने शुद्धिकरणासाठों व प्रतिष्ठेसाठीं पवित्र राखिलेली आहेत, त्यांना अमरत्वासाठी तयार करण्यांत येईल. तथापि जे अन्यायी, अपवित्र व अमंगळ आहेत तें तसेच सर्वकाळपर्यंत राहतील. तेथें त्याचे दोष काढून टाकण्यात येणार नाहींत व त्यांना पवित्र शीलहि देण्यांत येणार नाहीं. इहलोकीच्या ह्या उमेदवारांच्या काळांत तें सर्व साध्य करावयाचे असतें. आम्हासाठी घर में कार्य पुरे करावयाचे असेल तर तें आतांच घडवून आणले पाहिजे.CChMara 289.2

    ज्या जगांत आम्ही राहत आहों तें न्यायत्वाच्या व शुद्धतेच्या स्वभावधर्माला व कृपेच्या बुद्धीला आडवे आहे. आम्ही कोणीकडेही नजर टाकली तर आम्हांला भ्रष्टता, अमगळता विरुपता व पाप हेच दिसून येते, अमरत्व प्राप्त होण्यासाठी त्यापूर्वी आम्हांला कोणते कार्य हातीं घेतले पाहिजे ? आमची शरीरे निष्कलंक आणि आमची अंत:करणे शुद्ध राखावीत हेच तें कार्य होय अशासाठी कीं या अखेरच्या दिवसांत सर्वत्र भ्रष्टता नांदत असतां आम्हीं निर्दोष असें जगावें. CChMara 289.3

    “तुमचें शरीर, तुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांस मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे हें तुम्हांस ठाऊक नाहीं काय? आणि तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.” १ करिंथ. ६:१९,२०. CChMara 289.4

    आम्ही कांही स्वत:चे नाहीं. फार मोठ्या मोलाने, देवाच्या पुत्राच्या सहनशीलतेच्या व त्याच्या प्राणार्पणाच्या संपत्तीने आमची खरेदी झालेली आहे. हें जर आम्हीं समजून घेतले व त्याची पूर्ण जाणीव मनीं धरिली तर आमचे आरोग्य उत्कृष्ट अवस्थेत ठेवण्याची मोठी जबाबदारी आम्हांला कळून येईल अशासाठीं कीं आम्हांला देवाची सेवा पूर्णपणे करिता येईल. परंतु दुसराच मार्ग पत्करून आमची जबाबदारी आम्हांला कळून येईल अशासाठीं कीं आम्हांला देवाची सेवा पूर्णपणे करिता येईल. परंतु दुसराच मार्ग पत्करुन आमची जीवनशक्ति खर्ची घातली, आमची शक्ति दुबळी केली अगर आमच्या बुद्धीमध्ये गोंधळ निर्माण केला तर आम्ही देवाविरुद्ध पाप करितों, असल्या मार्गाचे अवलंबून केल्याने आमची शरीरें व मने जीं देवार्थी आहेत त्यांच्याद्वारे आम्ही त्याचे गौरव करीत नाहीं तर त्याच्या दृष्टीने फार मोठा अभ्यास करितो. 32T 354-356;CChMara 289.5