Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    चहा व कॉफी शरीरघटनेला पोषक नसतात.

    चहा हा चेतनाप्रद असतो व कांहीं अशीं तो अमलहि आणिता. कॉफीचे व दुसर्‍य पुष्कळ पेयांचेहि असेच असतें. पहिला परिणाम उत्साहदायी असतो. जठरांतील पेशी सचेतन होतात; त्या मेंदूला संतप्त करितात व ह्याचा परिणाम हृदय क्रियेची गतिवाढ होतें आणि संबंध शरीर-घटनेला तात्पुरती हिंमत येते. थकवा तर अजिबात पुढे येतच नाहीं, शक्ति वाढलेली वाटतें बुद्धि जागृत होतें व कल्पना शक्ति अधिक जोमदार होते. CChMara 320.3

    ह्या कारणांमुळे चहा-कॉफीचा चांगला फायदा होतो अशी पुष्कळांची समजूत होतें. पण ही भूल आहे. शरीरघटनेला चहा-कॉफीकडून जीवन मिळत नाहीं. त्यांचे पचन व जिरण होण्यापूर्वीच त्यांचे परिणाम दिसून येतात. जी शक्ति म्हणून वाटते, ती केवळ मज्जातंतूंची जागृति असतें. त्यांतील अमल नाहींसा झाला म्हणजे जो अस्वाभाविक जोम भासत असतो तो कमी होऊन जातो व परिणाम अधिक शिथिलता व अशक्तता अनुभवाला येते.CChMara 320.4

    मज्जातंतूना क्षोभकारक येथे चालूं ठेविल्याने मस्तक द:खी, निद्रानाश, हृदयाची धडबड. अपचन, थरकाप व अनेक असें त्रास उद्भवतात व जीवन-शक्तींचा क्षय करून टाकतात. थकून गेलेल्या मज्जापेशींना जागृति व फाजील श्रमापेक्षां आराम व स्वास्थ्य पाहिजे असते. 18MH 326, 327;CChMara 320.5

    कित्येकजण तर चहा-कॉफीविषयी बेशिस्तपणे लुडबुड करीत राहतात आरोग्य - सुधारणेची बंधनें धाब्यावर ठेवितात. तें मनाने आधळे होऊन देवाच्या आज्ञेचा भंग करितात. 19Te. 80;CChMara 320.6