Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    खिस्ती शिक्षणांत पवित्रशास्त्राचें स्थान

    कोणत्याही एका पुस्तकापेक्षा अगर सर्व पुस्तकांपेक्षा बौद्धिक प्रगतीसाठीं पवित्रशास्त्र हैं अधिक उपयुक्त आहे असें दिसून येईल. त्यातील थोर विषयप्रतिपादन निवेदनांतील आदरनीय साधेपणा आणि त्यातील कल्पकतेची सौंदर्यसंपन्नता यामुळे विचारसरणीला जी गति व उन्नति मिळते तशी दुसरी कोठेही मिळ शकत नाहीं. ईश्वरी प्रकटीकरणाचीं जी आश्चर्यकारक सत्यें साध्य करण्यासाठी मानसिक शक्ति लागते ती दुसर्‍य कोणत्याही अभ्यासक्रमांत मिळू शकत नाहीं. अशा प्रकारे ईश्वरीसंबधींच्या विचारांत जे मन मग्न झालेले असतें त्याची वृद्धि व बळकटी झाल्याशिवाय राहणार नाहीं. 25CT 177;CChMara 281.2

    आत्मिक स्वभावाचा विकास करण्याच्या कामी पवित्रशास्त्राचे सामर्थ्य तर फार भारी आहे. देवाशीं सोबत करण्याप्रीत्यर्थच उत्पन्न केलेल्या मानवाला देवाच्या सोबतींतच त्याचे वास्तविक जीवन व त्याचा विकास आढळू शकेल. परमेश्वरामध्ये थोर उल्हास-प्राप्त करून घेण्यासाठी निर्माण केलेल्या मनुष्याला आपल्या अंत:करणांतील तळमळ शांत करण्याकरिता आणि आपल्या आत्म्याची भूक व तहान शमविण्याकरिता पवित्रशास्त्राशिवाय आवांतर दुसरे कोणतेहीं साधन मिळू शकत नाहीं. पवित्रशास्त्रामधील सत्याचे आकलन करण्याच्या उद्देशाने जो कोणी खरेपणाने व जिज्ञासुबुद्धीने देवाच्या वचनांचा अभ्यास करील त्याचा व त्याचा ग्रंथाचा जनक (परमेश्वर) याचा सहवास घडेल व त्याला मान्य असेल तर त्याच्या विकासाच्या प्रगल्भतेला सीमाच राहणार नाहीं. 26Ed. 124, 125; CChMara 281.3

    शास्त्रपाठांतील मौल्यवान असें भाग पाठ करण्यांत यावेत, परंतु तें एक किटकिटीचे नव्हें तर फायद्याचे कार्य म्हणून करावे. आरंभीं आरंभीं स्मरणशक्ति अपुरीशी भासेल पण सरावाने ती वृद्धिंगत होईल व कालांतराने सत्य-वचनांच्या संग्रहावरून तुम्हांला आनंद वाटेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी ही सवय अत्यत मौल्यवान् अशी आढळून येईल. 27CT 137, 138;CChMara 281.4