Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण २९ वें - विवाह

    स्त्री ही पुरुषाची सोबतीण व साहाय्यक व्हावी म्हणून देवाने तिला पुरुषापासून उत्पन्न केले. त्याच्यासह राहून तिने त्याला आनंदित, उत्तेजित व आशीर्वादित करावयाचे होतें. त्याचप्रमाणे पुरुषही तिचा सबळ साहाय्यकारी व्हावयाचा होता. जे कोणी शुद्ध हेतूने विवाहाच्या नात्यात भाग घेतात त्या सर्वांना आपल्याविषयी परमेश्वराचा असलेला उद्देश परिपूर्ण करावयाचा असतो म्हणजे पतीने आपल्या पत्नीचे प्रेममय अंत:करण हस्तगत करावयास पाहिजे आणि तसेच पत्नीने आपल्या पतीच्या शीलांत सौम्यता व सुधारणा निर्माण करून त्याच्या गुणधर्मातील उणेपणा भरून काढावयास पाहिजे.CChMara 188.1

    ख्रिस्ती विवाहसंस्था नष्ट करण्यासाठी ख्रिस्त आलेला नव्हता तर त्याची मुळांत जी पवित्रता व जो उच्च दर्जा होता ती परत देण्यासाठी आला होता. मानव देवाची नैतिक प्रतिमा होता, त्या प्रतिमेची भरपाई करण्यासाठीं तो आला. विवाहसंबंध किती पवित्र असतात तें दर्शविण्यासाठी त्यानें आपल्या लौकिक कार्याचा प्रारंभ केला.CChMara 188.2

    ज्यानें हवा ही आदामाची सहकारिणी म्हणून त्याला दिली, त्यानेच लग्न-मेजवानीच्या प्रसंगी आपला प्रथम चमत्कार करून दाखविला. जेथे कोठे मित्र व आप्तमंडळी उत्सवासाठी एकत्रित झाले, तेथेच ख्रिस्ताने आपल्या लौकिक सेवेची सुरुवात केली. या प्रकारे विवाहाला त्यानें मान्यता देऊन तो संस्कार आपणच स्वत: प्रस्थापित केला हें तो ओळखून होता पवित्र अशा वैवाहिक नात्यांत स्त्री पुरुषांनी संघटित व्हावे, कुटुंबाची उभारी करावी व त्यातील सभासदांनी सन्माननीय बनावे आणि त्यांनी स्वर्गीय कुटुंबातील सभासद म्हणून ओळखले जावे.CChMara 188.3