Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अंगावर पाजणाच्या मातेची मनोवृत्ति

    नैसर्गिकरित्या लाभणारे अन्नच लहान मुलांचे उत्कृष्ट अन्न होय. अगदी अवश्यक नसल्यास तें काढून घेऊ नये. आपल्या लहान बाळाला पाजण्याचे मायाळूपणाचे कर्तव्य कांहींतरी सुखसोईसाठी अगर सामाजिक समजुतीमुळे आईने सोडून द्यावे, ही एक निर्दयपणाची गोष्ट होय.CChMara 204.1

    आईच्या दुधावर राहणार्‍य बाळकाचा हा काळ आणीबाणीचा असतो. मुलांना पाजणाच्या पुष्कळ आयाना वाजवीपेक्षा अधिक कष्ट करावे लागतात आणि चुलीजवळ बसून रक्त गरम होऊ द्यावे लागते. अंगावर पिणाच्या मुलावर याचा फार मोठा परिणाम घडतो. स्तनातील गरम झालेले दुध त्याला घ्यावे लागते, एवढेच नव्हें तर आईला न मानवणाच्या अन्नाने त्याचे रक्त दूषित होतें; आईची संबंध प्रकृति नादुरुस्त होतें व त्याचा परिणाम मुलाच्या अन्नावर होतो. आईच्या मानसिक अवस्थेमुळेसुद्धा असेल, मनोविकाराच्या झपाट्यांत वाढेल अशी बब करीत असेल तर तिच्या दूध-पानाने मुलांत जळजळ उत्पन्न होईल, त्याला पोटदु:खी लागेल, आळेपिळे देऊन त्याला वारंवार झटकेसुद्धा येऊ लागतील. CChMara 204.2

    आईपासून मिळणाच्या अन्नामुळे मुलाच्या शीलावरहि कमीजास्त प्रमाणात परिणाम घडेल म्हणून स्तनपान करणाच्या आईने आपली मानसिक प्रकृति सुखी ठेवून आपले मन संपूर्णत: आटोक्यात ठेवणे हें तिच्यासाठी कितीतरी महत्त्वाचे आहे. तसे केल्याने मुलाचे दुध उत्तम राहील. शात आत्मसंयमी शक्ति आईने धारण केली तर बाळाची मानसिक स्थिति आईला चांगली बनविता येईल. मज्जातंतूच्या त्रासामुळे जर मूल अस्वस्थ होत असेल तर आईच्या शांत व धैर्यशील काळजीने मुलाच्या प्रकृतींत सौम्यता निर्माण करता येईल व मुलाची तब्यत पुष्कळ प्रकारे सुधारली जाईल.CChMara 204.3