Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    घरांतील सामनसुमान साधें व स्वस्त असावें

    घरांतलें सामानसुमान साधें व बेताचें असावें. सहजासहजी हालविता यावे, टापटिपाने ठेविता यावे व मोडतोड झाल्यास अल्प खर्चात दुरुस्त करिता यावे. प्रीतीचे व समाधानाचे वातावरण असल्यास अभिरुचीला पटेल त्याप्रमाणे फार साधे गृह आकर्षक व आवडते करिता येईल.CChMara 214.5

    दिखाऊपणात सौख्य नसते. गृहकारभार जितका अधिक साधा व नियमितपणाचा असेल तितकें तें गृह अधिक सुखी होईल. आपल्या मुलांना सुखीसमाधानीं राखण्यासाठी मौल्यवान वातावरण व खर्चिक सामानसुमान असण्याची गरज नसते. त्यांना मायाळपणाची प्रीति व काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता असतें.CChMara 214.6

    तुमच्या घरांत आपण स्वत: कायमचे शिस्तीचे नमुने होण्यास तुम्ही देवाला बांधलेले आहां. स्वर्गात बेशिस्तपणा नसतो हें ध्यानात आणा. तुमचे येथील गृह स्वर्गच बनावयाचे आहे. आपल्या गृहांतील लहानसाहान गोष्टी रोज रोज जर विश्वासूपणे पार पाडल्या तर ख्रिस्ती शिलाची सपन्नता करण्यांत तुम्ही देवाचे सहकामकरी आहां. CChMara 214.7

    आईबापांनो, आपल्या मुलाचे तारण साधण्यासाठी तुम्ही परिश्रम करीत आहां हें लक्षात आणा. जर तुमच्या संवया अचूक असतील, नीटनेटकेपणा व धर्माचरण व न्यायीत्व, शरीर, मन व आत्मा यांचे शुद्धिकरण जर तुम्ही दर्शवीत असला तर “तुम्ही जगाचा प्रकाश आहा’ या तारकाच्या शब्दांना तुम्ही साद देत आहां. CChMara 215.1

    आपल्या कपड्यालत्त्याची टापटीप ठेवण्याविषयी आपल्या लहान मुलांना अगदी प्रारंभापासूनच शिकवा. त्यांच्या चीजवस्तु ठेवण्यासाठी त्यांना ठिकाण द्या व प्रत्येक गोष्ट नीटनेटकी, घडी घालून व जेथल्या तेथें ठेवण्याचे शिक्षण द्या. जर खणाखणाचे कपाट देता येत नसेल तर एकादें खोके घेऊन त्याचे कपाट करा व सुंदरशा नकशीच्या कपड्याचे आच्छादन करून द्या. हा नीटनेटकेपणा शिकविण्यास व शिस्त राखण्यास रोज रोज वेळ लागणार हें खरे, परतु मुलाचे भवितव्य बनविण्यासाठी तें उपयुक्त ठरेल आणि अखेरीस तुमच्या पुष्कळ वेळेची व काळजीची तुम्हांला बचत करिता येईल. 1AH 131-155;CChMara 215.2

    कांहीं आईबाप आपल्या मुलांना विध्वंसक होऊ देतात. ज्या गोष्टींना स्पर्श करण्याचा त्यांना हक्क नसतो त्या घेऊन त्यांचा ती खेळ बनवितात. दुसर्‍यांची चीजवस्तु घेऊ नये असें त्यांना शिक्षण दिले पाहिजे. कुटुंबास सुखसमाधान लाभावे म्हणून मुलांना शिस्तीच बंधारणे घालून दिलीच पाहिजेत. दिसत असलेली प्रत्येक वस्तु त्यांना हाताळू दिल्याने ती सुखीसमाधानी होत नाहींत. काळजी वाहण्याचे त्यांना शिकविलें नाहीं तर ती प्रेमहीन व विध्वंसक शिलाचीं बनून जातील.CChMara 215.3

    सहजासहजी मोडतोड होईल असले खेळ मुलांना देऊ नयेत. असें केल्याने नाश करण्याचे त्यांना आपण जणू पाठच देतो. त्यांना द्यावयाचे खेळ थोडकेच पण भक्कम व टिकावू असावेत. असल्या सूचना लहानसहान दिसतील पण बाल-शिक्षणांत त्या भारी महत्त्वाच्या असतात. 2 CG 110, 111, 101, 102.CChMara 215.4

    ****