प्रकरण २ रें - शेवटला काळ
आम्ही शेवटल्या काळांत राहात आहेत. लवकरच काळाचीं पूर्ण होणारी चिन्हें ख्रिस्ताचें येणें जवळ आलें आहे असें दर्शवितात. ज्या दिवसांत आम्ही राहात आहेत ते गंभीर व महत्त्वाचे आहेत. देवाचा आत्मा हळूहळू पण खात्रीपूर्वकरित्या पृथ्वीपासून काढून घेतला जात आहे. पीडा व शिक्षा देवाच्या दयेविना निराश झालेल्यांवर येत आहेत. समुद्रावरील व भूमीवरील संकटे, समाजाची अस्थिर स्थिति, युद्धाचा इशारा ही प्रामुख्यानें दिसत आहेत. घडणार्या महान् गोष्टीजवळ येत आहेत हें यावरून दर्शविलें जात आहे. CChMara 37.1
वाईटाचें हस्तक, आपली सेना एकत्र करून बळकट करीत आहेत. शेवटच्या आणीबाणीच्या प्रसंगासाठी ते बळकटी आणीत आहेत. आपल्या जगांत मोठाले बदल लवकरच होणार आहेत व शेवटल्या घटना झपाट्याने घडून येणार आहेत.CChMara 37.2
जगांतील परिस्थिति दर्शविते कीं, संकटाचा काळ आम्हांवर आला आहे. वर्तमानपत्रें लवकरच भयंकर लढा निर्माण होणार यांच्या चिन्हांनी भरलेली असतात. धाडसीपणानें घातलेले दरोडे सतत घडत आहेत. संप चालूं आहेत. चोहोंकडे चोर्या व खून होत आहेत. भूतविद्या जाणणारे पुरुष, स्त्रियाव लेंकरें यांचा नाश करीत आहेत. मनुष्याला वाईटाचें वेड लागले आहे व सर्व प्रकारचा वाईटपणा भरला आहे.CChMara 37.3
सैतान न्यायाचा विपर्यास करण्यांत विजयी झाला आहे व मनुष्यांची अंत:करणे स्वार्थी गोष्टीनें भरून टाकीत आहे. न्यायाला मागें ढकलेलें आहे, धार्मिकता लांब उभी राहिली आहे. कारण चव्हाट्यावर सत्य अडकून पडलें आहे तेथें सरळतेचा प्रवेशच होत नाही.” यशा. ५९:१४. मोठमोठ्या शहरातून अनेक लोक अन्न, आसरा व कपडे याविना बेकार होऊन गरिबी व वाईट स्थितीनें गांगरून गेले आहेत. त्याच शहरांत ख्यालीखुशालीनें राहणारे चैनीच्या वस्तूंनी घरें भरण्यास अतोनात पैसा खर्च करीत आहेत, एवढेंच केवळ नव्हें पण स्वत:च्या शोभेसाठी व त्याहूनहि वाईट म्हणजे चेतनायुक्त पदार्थांनी तृप्ति करून घेणें, दारू, तंबाखू आणि दुसर्य वस्तु घेऊन आपल्या बुद्धीचा नाश करून घेत आहेत. मनाचा समतोलपणा घालवून आत्म्याची हानि करून घेत आहेत. मानव प्राण्याची उपासमारीमुळें होणारी आरोळी देवापुढें येत आहे. प्रत्येक प्रकारचें दडपण व शक्ति याद्वारें मनुष्यें आपली अफाट दौलत वाढवित आहेत.CChMara 37.4
मला रात्रींच्या वेळीं मजल्यावर मजला आकाशापर्यंत चढत चाललेला पाहावयास बोलाविले. या इमारती आग न लागणार्या होत्या. त्या बांधणारे व मालक यांच्या गौरवासाठीं उभारल्या होत्या. उंच, अन् उंच इमारती बांधल्या जात होत्या. फार किंमतीच्या वस्तु वापरण्यांत आल्या होत्या. ज्यांच्या या इमारती होत्या तें विचारीत नव्हते कीं “देवाचें उत्तम प्रकारें आपल्याला कसे गौरव करता येईल?” त्यांच्या योजनेत प्रभूला स्थान नव्हते. CChMara 37.5
या उंच इमारती वरवर जात असतां जे मालक होतें तें महत्त्वाकांक्षेच्या अभिमानाने हर्षित झाले होतें. त्यांच्याजवळ स्वत:च्या तृप्तीसाठी पैसा होता. शेजार्यांच्या मनात मत्सर उत्पन्न करीत होतें. अशा प्रकारें खर्च केलेला पुष्कळसा पैसा गरबाला पिळून काढून मिळविलेला होता. स्वर्गात प्रत्येक बाबींचा हिशेब राखलेला आहे हें ते विसरले होतें, त्याशिवाय प्रत्येक अन्यायाचा सौदा, प्रत्येक फसवेगिरीचें कृत्य लिहून ठेविलें आहे.CChMara 38.1
पुढचा देखावा मजसमोरून गेला, तो अग्नीचा इशारा याविषयांचा होता. लोक या उंच व अग्नीनें नाश न पावणाच्या इमारतीकडे पाहून म्हणाले, “त्या अगदी सुरक्षित आहेत. पण या इमारती तंबूप्रमाणे जळून भस्म झाल्या. अग्नीभक्षक त्यांना वाचविण्यासाठी कांही करूं शकले नाहीत. त्यावरील यंत्रं मनुष्यें चालवूं शकलीं नाहींतCChMara 38.2
मला असें सांगण्यांत आलें कीं, प्रभूची वेळ येते. तेव्हां महत्त्वाकांक्षी गर्विष्ठ लोकांच्या अंत:करणात कांहीं बदल होणार नाही तर लोकांना आढळून येईल कीं, बचाव करणारा हात नाश करण्यासाठी समर्थ आहे. पृथ्वीवरील कोणतीही सत्ता देवाचा हात आवरू शकणार नाही. नाशापासून बचाव व्हावा म्हणून उभारण्यांत येणार्य इमारतींचे सामान, मानवावर देवाचा कोप होण्याची वेळ येईल तेव्हां तें टिकणार नाहीं ! कारण त्यांनी स्वार्थी महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन देवाच्या नियमांचा भंग केला आहे.CChMara 38.3
मुत्सदी व विद्वान लोक यामध्ये समाजाच्या हल्लीच्या स्थितीची आंतील कारणें काय आहेत हें जाणणारे जास्त नाहींत. ज्यांच्या हातीं राज्यसूत्रें आहेत तें नैतिक अध:पात, गरिबी, भिक्षुकी व वाढते गुन्हे यांतील समस्या सोडवू शकत नाहीत. तें आपलीं घरें अधिक सुरक्षित पायावर रचण्याचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत. जर मनुष्याने देवाच्या वचनांतील शिक्षणाकडे अधिक लक्ष पुरविले तर त्यांना गोंधळून टाकणाच्या समस्या सोडविण्याचा उपाय त्यांना आढळून येईल.CChMara 38.4
ख्रिस्ताच्या द्वितीयागमनापूर्व जगाच्या स्थितिचें वर्णन पवित्रशास्त्र करतें. चोरी व गुन्हे याद्वारें माणसें धन सांठवीत आहेत त्याविषयी असें लिहिलें आहे; “शेवटल्या दिवसाकरतां तुम्हीं धन सांठविलें आहे. पाहा ज्या कामकन्यांनी तुमचीं शेतें कापिलीं आहेत त्यांची तुम्ही अडवून ठेवलेली मजूरी ओरडत आहे; आणि कापणारांच्या आरोळ्या सेनाधीश प्रभूच्या कानीं गेल्या आहेत. तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला आहे. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ति केली आहे. धार्मिकास तुम्ही दोषी ठरविलें त्याचा घात केला; तो तुम्हांस अडवीत नाही.” याकोब ५:३-६. CChMara 38.5
या काळाचीं चिन्हें इतक्या जलदरीतीनें पूर्ण होत असतां हे इशारे कोण वाचतो ? जगित लोकांवर याचा परिणाम होत आहे? त्यांच्या वृत्तीतं कोणता फरक दिसून येतो? नोहाच्या काळांतील लोकांच्या वृत्तींत जें दिसलें त्यापेक्षां अधिक नाहीं. जगाच्या धंद्यांत व ख्यालिखुशालींत गुंतून गेले होते व जलप्रलय होईपर्यंत व त्यांचा नाश होईपर्यंत त्या काळांतील लोकांना समजले नाहीं.” मत्तय २४:३९ त्यांना स्वर्गीय इशारा देण्यांत आला पण त्यांनी त्यांचा नाकार केला आणि आज जग देवाच्या वाणीचा संदेश दिला जात असतां त्याला न जुमानतां सार्वकालिक नाशाकडे झपाट्यानें चाललें आहे.CChMara 38.6
हल्लीचें जग युद्धाच्या वृत्तीनें भारावून गेलें आहे. दानीएलाच्या अकाराव्या अध्यायांतील भविष्याची पूर्णता जवळ जवळ होत आली आहे. लवकरच भविष्यांत सांगितलेल्या त्रासाचा देखावा घडून येईल.CChMara 39.1
“पाहा, प्रभु पृथ्वी ओसाड करतो. तिला शून्य बनवितो. तिला उलथी पालथी करतो. तिच्या रहिवाश्यांना चोहोंकडे विखरितो. कारण त्यांनी नियमांचा भंग केला आहे, विधि बदलेले आहेत, सार्वकालिक करार मोडला आहे. म्हणून पृथ्वीला नाशानें खाऊन टाकले आहे व तिच्यांत राहाणारे हैराण झाले आहेत, डफांचा आवाज बंद पडला आहे. उत्सव करणार्यचा कज्जा थांबला आहे. किनरीचा हर्षनाद बंद झाला आहे.” यशाया २४:१४.CChMara 39.2
“त्या दिवसाबद्दल हाय हाय करा. भयंकर दिवस, परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.” योएल १:१५ मीं पृथ्वीकडे पाहिलें तों ती वैराण व शून्य झाली आहे. आकाशाकडे पाहिलें तों त्यांत प्रकाश नाहीं मीं पर्वताकडे पाहिलें तों ते कापत आहेत. सर्व डोंगर डळमळत आहेत. मीं पाहिलें तों कोणी मनुष्य दिसला नाहीं व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत. मीं पाहिलें तों पहा बागाईत वैराण झाली आहे व परमेश्वरासमक्ष त्याच्या तीव्र कोपानें तेथील सर्व नगरें नष्ट झाली आहेत.” यिर्मया ४:२३-२६.CChMara 39.3
“हाय हाय तो महादिन आहे. त्यासमान दुसरा नाहीं तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यांतून त्याचा निभाव होईल.” यिर्मदा ३०:७. CChMara 39.4
या जगांतील सर्वानीं देवाविरुद्ध सैतानाशी सख्य केलेलें नाही. सर्वच द्रोहि नाहीत. देवाशीं एकनिष्ठ असणारे कांही थोडे विश्वासू आहेत. कारण योहान लिहितो, “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवर विश्वास धरून राहाणारे यांचा धीर यावरून दिसून येतो.” प्रगटी. १४:१२. जे देवाची सेवा करतात व जे त्याची सेवा करीत नाहींत, यांच्यामध्ये भयंकर लढाई लवकरच सुरू होईल. लवकरच सर्व हालवून सोडलें जाईल. ज्या गोष्टी हालल्या जाणार नाहींत त्या शिल्लक राहातील. CChMara 39.5
सैतान हा पवित्रशास्त्राचा हुशार विद्यार्थी आहे. त्याची वेळ थोडी राहिली आहे हें त्याला माहीत आहे. या पृथ्वीवर प्रत्येक बाबतींत तो प्रभूच्या कार्याविरुद्ध वागणूक करतो. पूर्वीच्या काळाची पुनरावृत्ति व आकाशांतील गौरवी देखावा हें एक झालेले पाहाण्यास या पृथ्वीवर जिवंत राहातील त्या देवाच्या लोकांच्या अनुभवाची कल्पना करणें अशक्य आहे. देवाच्या सिंहासनापासून निघणार्य प्रकाशांत तें चालतील. दूतांच्याद्वारे स्वर्ग व पृथ्वी यामध्ये सतत दळणवळण राहील. दुष्ट दृतांसह सैतान मी देव आहें असें म्हणून अनेक चमत्कार करील व साधल्यास निवडलेल्यासहि फसवील. चमत्कार करण्यांत देवाच्या लोकांना संरक्षण मिळणार नाहीं. कारण सैतान त्या चमत्काराची नक्कल करील. निर्गम ३१:१२-१८ मध्यें सांगितलेल्या चिन्हांमध्ये देवाच्या कसोटीला उतरलेल्या व छळांतुन निघालेल्या लोकांना सामर्थ्य प्राप्त होईल “असें लिहिले आहे” या देशाच्या वचनावर त्यांना अवलंबून राहायाचे आहे. ज्याच्यावर तें सुरक्षित उभे राहूं शकतात तो “एक’ पाया आहे. ज्यांनी देवानें केलेला करार मोडिला आहे तें त्या दिवसांत देव-विरहित व आशाहीन होतील.CChMara 39.6
देवाचे उपासक चौथ्या आज्ञेला मान दिल्याकडून विशेषेंकरुन ओळखलें जातील. कारण ती देवाच्या उत्पत्ति सामर्थ्याची खूण आहे व लोकांनी पूज्यबुद्धि व आदर दाखविण्याच्या बाबतींत देवाच्या मागणीला साक्ष आहे. उत्पन्नकर्त्यांचे स्मारक मोडून टाकून रोमच्या संस्थेला उच्चता देणारे दुष्ट लोकत्यांच्या प्रयत्नावरून ओळखले जातील. या महान् लढ्यांत सर्व ख्रिस्ती लोकांचे दोन वर्ग केले जातील. एक जे देवाच्या आज्ञा पाळतात व येशूवर विश्वास धरून राहातात आणि जे श्वापदाची खूण धारण करण्यास मंडळी व सरकार एकत्र होऊन लहान मोठ्यास, श्रीमंत व गरिबास, स्वतंत्र व बांधलेल्यास सक्त करण्यास आपली शक्ति एकत्र करतील. तरी देवाचे लोक ती खूण धारण करणार नाहीत. प्रगटी १३:१६ पात्म बेटावरील भविष्यवादी पाहातो कीं, “त्या काचेच्या समुद्रावर श्वापदापासून, त्याच्या मूर्तीपासून व त्याच्या नामसंख्येपासून जय मिळविणारे लोक हातांत देवाच्या वीणा घेऊन उभे राहिलेले दृष्टीस पडले.” प्रगटी. १५:२ व तें माशाचें व कोंकर्यचें गीत गात होतें.CChMara 40.1
देवाच्या लोकांवर भीतिदायक कसोट्या व संकटे येऊन ठेपली आहेत. पृथ्वीच्या एका टोकापासून तों दुसर्य टोकापर्यंत लढाईचे वारे राष्ट्रांना हालवून सोडीत आहे. पण संकटाच्या वेळीं, राष्ट्रांच्या ह्यातींत यापूर्वी कधींच उद्भवले नाही. अशा संकटसमयी देवाचे लोक स्थिर उभे राहातील. सैतान व त्याचे लोक त्यांचा नाश करूं शकणार नाहींत कारण बलवान् दृत त्यांचें संरक्षण करतील.CChMara 40.2
*****