Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ४ थे - देवाच्या पवित्र शब्बाथाचें पालन करा

    शब्बाथ पालनाच्या बाबतींत मोठा आशीर्वाद गोवलेला आहे आणि देवाची इच्छा आहे कीं, शब्बाथ दिवस हा आनंदाचा दिवस आम्ही मानावा. शब्बाथ स्थापण्यावेळींचे आनंद भरलला होता. देवाला आपल्या हातचे काम चागले दिसलें. सर्व निर्माण केलेल्या गोष्टी “चांगल्या आहेत” असें त्यानें म्हटले. उत्पत्ति १:३१ आकाश व पृथ्वी हर्षाने भरून गेली होती. “प्रभात-पुत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवपुत्रानी आनंदाचा गजर केला.” इयोब ३८:७ जरी देवाचे पूर्ण काम नासून टाकण्यास पाप जगांत शिरले आहे, तरी देव अजून आम्हांला एक सर्वसाक्षी, दया व चांगुलपणा यांत अमर्याद, सर्वांचा निर्माणकर्ता या नात्याने साक्ष म्हणून शब्बाथ देत आहे. आमचा स्वर्गीय पिता शब्बाथ पालनाद्वारे स्वत:चे ज्ञान राखून ठेवले जावें असें इच्छितो. त्याची अशी इच्छा आहे कीं, शब्बाथ हा आमची मने जीवत व खर्‍य देवाकडे लावील आणि त्याला जाणल्याकडून आपल्याला जीवन व शांति लाभेल. CChMara 44.1

    जेव्हां देवानें मिसरांतून आपल्या लोकांची सुटका केली व आपले नियम त्यांना लावून दिले तेव्हां त्यानें त्यांस असें शिकविले कीं, शब्बाथ पालनाद्वारे तें मूर्तिपूजक लोकांपासून वेगळे समजले जाणार होतें. ह्याद्वारेच जे देवाचा अधिकार कबूल करतात आणि जे त्याला आपला निर्माणकर्ता व राजा म्हणून कबूल करण्याचे नाकारतात यामधील फरक दर्शविला जातो. “ते इस्राएल लोक व मी यामधलें सदासर्वकाळचे चिन्हे आहे” असें प्रभू म्हणाला. “म्हणून इस्राएल लोक शब्नाथ पाळतील व सर्वकाळचा करार म्हणून त्यांच्या पिढ्यानपिढ्या शब्बाथ पाळतील.” निर्गम ३१:१६.१७.CChMara 44.2

    ज्याप्रमाणें इस्राएल लोक मिसरांतून जगिक कनानात जाण्यास बाहेर आलें त्यावेळी त्याचा वेगळेपणा दाखविण्यासाठीं शब्बाथ एक खूण होती, त्याप्रमाणे स्वर्गीय विसाव्यात जाण्यासाठी या जगातून जे बाहेर आलें आहेत तें देवाचे लोक आहेत असें या खुणेवरून दर्शविले जात आहे. शब्बाथ ही एक देव व मनुष्य यामधील नात्याची खूण आहे. त्याच्या नियमाचा मान करणाच्या लोकामधील व देवामधील खूण आहे. जे त्याच्या आज्ञा मोडतात व जे एकनिष्ठ आहेत यामधील फरक या खुणने दर्शविला जातो.CChMara 44.3

    मेघस्तंभांतून शब्बाथासंबंधाने ख्रिस्ताने जाहीर केले कीं, “खरोखर तुम्ही माझे शब्बाथ पाळाल. कारण पिढ्यानपिढ्या तुम्हांमधील व मजमधील ही एक खूण आहे. कारण मी परमेश्वर तुम्हांला पवित्र करणारा आहे हें तुम्हांला समजावें.” निर्गम ३१:१३. जगाला शब्बाथ हा देवाची खूण म्हणून दिलेला आहे. तो परमेश्वर निर्माणकर्ता आहे म्हणून दिला आहे. त्याचप्रकारे तो पवित्र करणारा आहे याचीही शब्बाथ खूण आहे. सर्व निर्माण करणाच्या सामथ्र्यानेच त्याच्या प्रतिमेप्रमाणे आत्म्याला पुनः निर्माण केले आहे. जे शब्बाथ दिवस पवित्र पाळतात त्यांना शव्वाथ ही पवित्रीकरणाची खूण आहे. खरें पवित्रीकरण हें देवाच्या इच्छेनुसार असतें व त्याच्या शीलासारखें शील बनविते. हें आज्ञापालनाद्वारे प्राप्त होतें. त्याच्या शीलाचे प्रगटीकरण अशा तत्त्वांचे पालन केल्यानेच प्राप्त होतें आणि शब्बाथ ही आज्ञापालनाची खूण आहे जो कोणी मनापासून चौथ्या आज्ञेचे पालन करतो तो सर्व नियम शास्त्राचे पालन करील. तो आज्ञापालनाद्वारे पवित्र केलेला आहे.CChMara 44.4

    इस्राएल लोकांप्रमाणे आपल्यालाही शब्बाथ हा “पिढ्यापिढ्यांचा करार’ म्हणून दिला आहे. जे कोणी देवाच्या पवित्र शब्बाथाविषयी पूज्यबुद्धि दाखवितात त्यांना देव आपले लोक म्हणवितो याचे चिन्ह शब्बाथ होय. तो आपला करार पूर्ण करील याविषयीची शब्बाथ ही एक प्रतिज्ञा आहे. जो प्रत्येक आत्मा देवाचा अधिकार कबूल करतो तो देवाच्या सार्वकालिक कराराखाली स्वत:ला आणतो. तो स्वत:ला आज्ञापालनाच्या सोनेरी साखळीला बांधून घेतो. त्यांतील प्रत्येक कडी एक आश्वासन आहे. 16T 349, 350; CChMara 45.1