Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ४८ वें - स्वच्छतेचें महत्त्व

    सुदृढ प्रकृतीसाठी चांगल्या रक्ताचा पुरवठा जरूर असतो; कारण रक्त जीवनांतील प्रवाह होय. नासक्या कुजक्यांची तें दुरुस्ती करते आणि शरीरसंपत्तीचें तें परिपोषण करिते. योग्य प्रकारच्या अन्नाने आणि शुद्ध हवेने प्रकृतीच्या हरएक भागाला नवीन जीवन व तजेला प्राप्त होतो. रक्ताभिसरण जितकें निर्दोष तितकें आरोग्य संरक्षण अधिक सुलभ होऊन जातें. 1MH 271;CChMara 293.1

    रक्ताभिसरणाचा नियमिपणा ठेवण्यासाठी अंगाला पाणी चोळणे हा अत्यंत सोपा व समाधानकारक मार्ग आहे. थंड अगर गार पाण्याची आंघोळ उत्तमांतील उत्तम बलसंवर्धन करिते. उष्ण पाण्याच्या आंघोळीने छिद्रे खुलीं होतात व शरीरातील अशुद्ध द्रवे बाहेर पडतात. उष्ण अगर कोमट पाण्याच्या आंघोळीने स्नायूमध्ये नरमाई आणि रक्ताभिसरणांत सारखेपणा येतो.CChMara 293.2

    व्यायामाने रक्ताभिसरण वाढते व त्यांत समानता येते. परंतु आळशीपणांत रक्त खेळते राहत नाहीं आणि प्रकृतीसाठीं अवश्य जे फेरफार हवे असतात, तें घडत नाहींत. त्वचासुद्धा निष्क्रिय होऊन जाते आणि शरीरातील अशुद्ध द्रव्येहि निघून जात नाहीत. उलट जोमदार व्यायामाने रक्ताभिसरण वाढून तजेला येतो, त्वचा निरोगी राहते व फुफ्फुसांना भरपूर शुद्ध व ताजी हवा मिळतें. 2237, 238;CChMara 293.3

    फुफ्फुसांना शक्य तेवढा अधिकाधिक मोकळेपणा देण्यांत यावा. मोकळ्या हालचालीने त्यांचे कार्यसामर्थ्य प्रबळ होतें, परंतु त्यांना चेंगरुन व दाबून ठेवल्याने तीं शक्तिहीन होतात. यामुळेच बैठकीच्या कामांत व वाकून काम केल्याने जे दुष्परिणाम सामान्यत: घडतात तें दिसून येतात असल्या बैठ्या अवस्थेत खोल व भरपूर श्वासोच्छ्वास मिळत नाहीं. वरवर (कृत्रिम श्वासोच्छ्वासाची संवय पडून जाते व फुफ्फुसांचे प्रसरण-सामर्थ्य नष्ट होतें.)CChMara 293.4

    याप्रकारें प्राणवायूची कमतरता पडते. रक्तप्रवाहाची गति मंदावली जाते. फुफ्फुसांच्या उच्छ्वासाने कुजकीं व विषारी द्रव्ये जी बाहेर फेकली गेली असतीं तीं तेथेच राहतात व त्यामुळे रक्तांत अशुद्धपणा येतो हा परिणाम नुसत्या फुफ्फुसावरच घडतो असें नाही तर अन्नाशय, पित्ताशय व मेंदवर घडन येतो. त्वचा फिकट पडते. पचनक्रिया मंदावते. हृदयात उदासीनता येते. बुद्धींत गोंधळ होतो, विचारसरणींत अंधुकता येते, मनांत खिन्नता घर करिते, एकंदरीने संबंध प्रकृति दबलेली व निष्क्रिय होऊन जाते व विशेषत: कसल्याहि आजाराला ती उघडी होते.CChMara 293.5

    फुफ्फुसें घाण निरंतर बाहेर फेकून देतात व शुद्ध हवेचा पुरवठा त्यांना कायमचा अवश्य असतो. अशुद्ध हवेला अवश्य असलेला प्राणवायु न मिळाल्यामुळे रक्त जीवनशक्तीशिवाय CChMara 293.6

    मेंदूकडे व इतर अवयवाकडे जाते. म्हणूनच जीवनशक्तीच्या भरपूर पुरवठ्याची आवश्यकता भासते. बद केलेल्या व मोकळी हवा नसलेल्या खोल्यांतील हवा घातक व दूषित असतें. अशा ठिकाणी राहिल्याने संबंध प्रकृतिमान दुबळे होऊन जाते. अशा ठिकाणी सर्दी पडसे सहज जडते व थोडं कांही झाले तर आजाराची झडप येते. घरातल्या घरांत बंद करून राहणार्‍य पुष्कळशा स्त्रिया पिगट व अशक्त असतात. तीच हवी त्या पुन: पुन: घेतात व सोडतात. शेवटीं फुफ्फुसांतून व छिद्रांतून बाहेर पडलेली विषारी द्रव्ये परत घेतली जातात व ती दूषित द्रव्ये परत रक्तांत जातात. 3MH 272-274;CChMara 294.1

    आपल्या खोल्यांतून रात्रींच्या वेळी रात्रींची शुद्ध हवा येऊ देण्याची मनाई करणारे पुष्कळसे लोक व्याधिग्रस्त असतात. आपणाला जे अत्यंत मौल्यवान् आशीर्वाद उपभोगिता येतील, त्यात ईश्वराकडून लाभणारी मोकळी व शुद्ध हवा ही एक होय. 42T 528;CChMara 294.2

    स्वच्छ शारीरिक व मानसिक प्रकतीसाठी अत्यत काटेकोर स्वच्छतेची फार जरूरी असतें. त्वचेच्याद्वारे शरीरातील घाण निरतर बाहेर पडत असतें. वारंवारच्या आंघोळीने ती स्वच्छ ठेविलीं नाहींत तर लाखों त्वचाछिद्रे त्वरित बुजून जातात आणि त्वचेतून बाहेर पडणारी घाण अवातर शुद्ध अवयवांना अधिक ओझे अशी होऊन जाते.CChMara 294.3

    सकाळी अगर संध्याकाळी थंड अगर कोमट पाण्याने रोजरोज आघोळ करणे पुष्कळांना हितावह होईल. सर्दी पडसे होण्याची काहीं भीति असेल तर सहन होईल अशी आघोळ घेतल्याने सर्दीला मज्जाव केला जाईल कारण तिच्याद्वारे रक्ताभिसरण सुलभ होतें ; रक्त पृष्ठभागावर येते आणि अधिक सरळ व नियमित प्रवाह वाहू लागतो. मन आणि त्याचप्रमाणे शरीर ही उभय तरतरीत होतात. स्नायु अधिक लवचिक आणि बुद्धि अधिक सतेज होतें. आंघोळीने मज्जातंतूचे कार्य अधिक सौम्य होतें. आतडी, जठर व पिताशय यांना आघोळ साहाय्यभूत होतें व प्रत्येकाला आरोग्य व शक्ति पुरविते. त्यामुळे पचनक्रियेतहि सुधारणा होते.CChMara 294.4

    कपडे स्वच्छ ठेवणे हें सुद्धा महत्वाचे आहे. त्वचाछिद्रातून जी घाण बाहेर पडते तिचा संपर्क अंगावरच्या कपड्यांना होतो. जर तें वारंवार धुवून बदलले नाहीत तर त्यातली अशुद्धता परत शरीरात घुसेल. CChMara 294.5

    कोणत्याहि प्रकारच्या अस्वच्छतेने आजार होण्याचा संभव असतो. अंधारांत, दुर्लक्ष केलेल्या कानाकोपर्‍यांत, कुजक्या केरकचर्‍यांत, दमट ठिकाणी भरपूर प्राणघातक जंतु असतात. हवा कुबट व विषारी होऊ नये म्हणून नासलेला भाजीपाला अगर झाडांच्या पडलेल्या पानांचा ढीग घराजवळ राहं देऊ नये. अस्वच्छ अगर कुजणारे असें काहीही घरात पडू नये.CChMara 294.6

    रोगापासून दूर राहावयाचे असेल व गृहातील प्रत्येक जणाला आनंदित व तरतरीत ठेवावयाचे असेल तर संपूर्ण स्वच्छता, भरपूर सूर्यप्रकाश (उन्ह), गृहजीवनाच्या प्रत्येक बाबींकडे आरोग्याच्या दृष्टीने काळजीपूर्वक लक्ष ह्या गोष्टी अवश्य होत. 5MH 276;CChMara 294.7

    शरीरानें मळीण व गबाळ, फाटके-तुटके कपडे असल्या स्वरुपात तुम्हांला पाहून देव खूष होत नाही, हें लहान मुलांना शिकवा. कपडे नीटनेटके व स्वच्छ असले म्हणजे विचारही स्वच्छ व गोड ठेविता येतील. शरीराशी संबंध येईल अशी प्रत्येक गोष्ट विशेषत: स्वच्छ ठेवण्यात यावी. CChMara 294.8

    जेथें अशुद्धता व अमंगळपणा आहे, तेथें सत्य आपली नाजूक पावलें कदापि ठेवणार नाहीं. इस्राएलांच्या मुलांनी स्वच्छतेच्या सवयाची आवड धरावी असा ज्या देवाचा कटाक्ष होता तो आज आपल्या लोकांमध्ये अशुद्धता चालूं देणार नाहीं. कसल्याही प्रकारच्या अशुद्धतेकडे परमेश्वर नाखूष नजरेने पाहतो. गृहातील अशुद्ध व निष्काळजीने ठेविलेले कानाकोपरे आत्मिकतेच्या कानाकोपर्‍यांना सुद्धा अमगळ ठेवू शकतील.CChMara 295.1

    स्वर्ग हा शुद्ध व पवित्र आहे व जे कोणी ईश्वरी नगरीच्या द्वारातून प्रवेश करूं इच्छितात, त्यांनी येथेच अंतबाह्य निष्कलंकतेचे पेहराव केले पाहिजेत. 6MLT 129. CChMara 295.2

    *****