Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पोषाखाच्या पद्धतीचा प्रभाव

    ख्रिस्ती कुलीन स्त्रीच्या अंगीं विनयशीलता व शुद्ध विवेकबुद्धि असतें. परंतु ज्या स्त्रीचे मन पोषाखाच्या नादात असतें ती ख्रिस्ती स्त्रीहन अगदीच वेगळी असतें, म्हणजे तिचे नैतिक जीवन धोक्यांत असतें. (जी स्त्री पोषाखाच्या नादात रमलेली असतें. तिचे नैतिकबळ धोक्यात असतें. ख्रिस्ती सभ्य स्त्री तर हिच्या अगदी उलट असतें, कारण तिच्या अंगीं विनयशीलता व विवेकबुद्धि जागृत असतें.) दिखाऊ व भपकेबाज वस्त्रे घालणार्‍य स्त्रीच्या मनात वारंवार विषयवासनेच्या भावना येऊ लागतात व तिच्याकडे पाहाणार्‍यच्याहि मनात नीच विकारांची प्रवृत्ति होतें. कपड्यांतून निर्माण होणारा अहंकार आणि डामडौल ही शिलाच्या नाशार्थी वारंवार पूर्वचिन्हेंच होत आहे हें देवाला दिसून येते. मोलामहागाचे कपडे सत्कृत्ये करण्याची इच्छा दाबून टाकतात, हें तो जाणून असतो. 74T 645;CChMara 251.5

    साधा, सरळ आणि निर्दाभिक पेहरावे ही माझ्या तरुण भगिनींची बोलती शिफारसच होय. दुसर्‍यांवर जर तुम्हांला आपला प्रकाश पाडावयाचा असेल तर तुमच्या साध्या पोषाखाचा व वर्तनाचा जो मार्ग आहे त्यापेक्षा अधिक कार्यवाहक असा दुसरा कोणताच नाहीं. शाश्वत गोष्टींचा तुलनात्मक विचार करतांना ऐहिक गोष्टींना तुम्ही यथायोग्य स्थान देत आहा, हें तुम्हांला सर्वांस दाखवून देता येईल. 837 376;CChMara 251.6

    ख्रिस्तीवर लोकांवर वजन पडावे म्हणून पुष्कळ जणांना जगरीतीप्रमाणे पोषाख करावासा वाटतो. पण ही त्यांची एक दु:खप्रद चूक आहे. जर त्याच्या अंगात अस्सल व उद्धारक धमक असेल तर त्यांनी आपल्या वागण्याप्रमाणे जगून दाखवावे. आपल्या धार्मिक कृत्यांनी आपला विश्वास प्रगट करावा आणि खिस्ती आणि जगिक बुद्धिच्या लोकात काय अंतर आहे, हें स्पष्ट करून दाखवावे. भाषणाच्या, पेहरावाच्या आणि कृतींच्याद्वारे देवाविषयींची साक्ष द्यावी. तेव्हांच मात्र आसपासच्या लोकांवर त्याचे निर्भेळ वजन पडेल व तें येशच्या समागमांतले आहत है अविश्वासणान्यांच्यासुद्धा लक्षात येऊन जाईल. आपल्या वजनाने सत्यच मात्र प्रगट केले जावें असा ज्यांचा मनोदय आहे, त्यांनी आपल्या प्रतिज्ञेप्रमाणेच जगून दाखवावे व या प्रकारे आपल्या विनयशील नमुन्याचे अनुकरण करावें. 94T 633, 634;CChMara 252.1

    माझ्या भगिनींनो, वाईट अवस्थाच्या देखाव्यापासूनसुद्धा दूर राहा. भ्रष्टतेने धुमसत असलेल्या ह्या चैनबाजीच्या काळांत अगदीं सावधगिरी बाळगल्याशिवाय तुम्ही कांही सुरक्षित नहीं, सद्गुण आणि विनय क्वचितच दिसून येतात. विनयशीलतारूपीं जें मौल्यवान रत्न आहे, त्यांचे संगोपन करण्यासाठी अति जोरकस प्रयत्न करा, अशी तुम्ही ज्या ख्रिस्ताचा अनुयायी आहा; त्या तुम्हांला माझी विनंति आहे. ह्यानेच सद्गुणाचे संरक्षण होईल.CChMara 252.2

    पोषाखांतील निष्कलंक साधेपणाला जर नम्र शिलाची पुस्ती मिळाली तर तो एखाद्या तरुणीच्या सभोवार असें पवित्रतेचे वातावरण निर्माण करील कीं तें हजारों सकटापासून सुरक्षित ठेवणारी ढालच होईल. 10CG 417;CChMara 252.3

    पोषाखाच्या साधेभोळेपणामुळे एखादी विचारवंत स्त्री अत्यंत हितावह अशीच दिसून येईल.CChMara 252.4

    ख्रिस्ती लोकांनी वापरावयाचा असाच पोषाख वापरण्यांत यावा. ज्या स्त्रियांच्या अंगी सत्कार्यासह देवभिरुपणा आहे त्यांनी शोभेल अशाच साध्या व सरळ वस्त्रांनी स्वत:ला विभूषित करावें.CChMara 252.5

    मूर्खतेच्या फैशनशी बरोबरी करण्याच्या उद्देशाने पुष्कळ जणींना नैसर्गिक साधेपणा आवडेनासा होतो व त्या दिखाऊपणाला भुलून जातात. वेळ आणि पैसा, बौद्धिक उत्साह आणि आत्म्याची खरी प्रगति या गोष्टी सोडून देऊन त्या ऐटबाज जीवनाकडेच आपले संपूर्ण लक्ष घालतात. CChMara 252.6

    प्रिय तरुणींनों, ऐटबाज पोषाखाने आणि दागदागिन्यानीं आणि चित्रविचित्र पोषाखाच्या भपक्याने तुम्ही राहिला तर तुमच्या धर्माचा व तुम्हीं पत्करलेल्या त्याचा इतरांवर कांहीं परिणाम होणार नाहीं. (हीं कांही तुम्ही पत्करलेल्या धर्माचा व सत्याचा इतरांत प्रसार होऊ देणार नाहींत.) आपले बाह्यस्वरुपच सौदर्यमय करण्याचे तुमचे हें प्रयत्न तुमच्या दुबळ्या मनाचे आणि गर्विष्ट अंत:करणाचे पुरावेच होत, असें विचारवंत लोकांना दिसून येईल. 11CG 421;CChMara 252.7

    प्रत्येक मुलाला आणि तरुणाला एक पोषाख आहे तो साध्य करण्याचे निरपराधीपणाने प्रयत्न करावेत. तो संतांच्या सात्विकतेची वस्त्रे होत. जगिक हौसेच्या आणि ऐटबाजीच्या पोषाखासाठी जितक्या उत्सुकतेने व चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. तितक्याच उत्सुकतेने व चिकाटीने हा पोषाख साध्य करण्यासाठी प्रयत्न केले तर तें लवकरच ख्रिस्ताच्या न्यायत्वाच्या पोषाखाने सुसज्ज होतील व त्यांची नांवे जीवन पुस्तकांतून कमी केली जाणार नाहींत. आयांना, त्याचप्रमाणे तरुणांना, मुलांना पुढील प्रार्थना करण्याची गरज आहे. हें देवा, माझ्याठायीं शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायीं स्थिर असा आत्मा पुन: घाल.” (स्तो ५१:८) ही आंतर्यामाची शुद्धता आणि आत्म्याची प्रेमळता इह लोकी आणि परलोकी सोन्यांपेक्षा फार अधिक मौल्यवान आहे. अंत:करणाचे शुद्ध तेच देवाला पाहातील. 12CG 417, 418.CChMara 252.8

    *****