Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    ऐक्यामध्ये सामथ्ये आहे

    ऐक्याकरिता मनापासून प्रयत्न करा. त्याकरता प्रार्थना करून कार्य करा. त्याकडून तुम्हांला आत्मिक आरोग्य, विचाराची श्रेष्ठता, शीलाचा मोठेपणा, स्वर्गीय मनोवृत्ति प्राप्त होऊन त्याद्वारें तुम्हांला स्वार्थ व दुष्टता यावर जय मिळेल व ज्याने तुम्हांसाठी प्राण दिला त्याद्वारे तुम्ही विशेष विजयी व्हाल. स्वला खांबी द्या. इतरांना स्वत:पेक्षा विशेष माना. अशाकडून ख्रिस्ताशीं तुमचं ऐक्य घडेल. स्वर्गापुढे आणि जगापुढे व मडळींपुढे तुम्ही अशी साक्ष द्याल कीं, तुम्ही देवाचे पुत्र व कन्या आहांत. तुम्ही जो कित्ता घालून द्याल त्यानें देवाचे गौरव होईल. ख्रिस्त प्रीतीने देवाच्या लोकांची अंत:करणे बांधली जातील असा चमत्कार पाहाण्याची जगाला गरज आहे. ख्रिस्तामध्ये स्वर्गात देवाचे लोक एकत्र बसलेले पाहावयाला पाहिजे. जे त्यावर प्रीति करून त्याची लोक एकत्र बसलेले पाहावयाला पाहिजे. जे त्यावर प्रीति करून त्याची सेवा करतात त्यांच्यासाठी देवाच्या सत्याचा पुरावा तुम्ही तुमच्या जीविताद्वारे देणार नाही काय? तुम्ही कसे असणार हें देवाला माहीत आहे. दैवी कृपा तुम्हांसाठी काय करूं शकते हें त्याला माहीत आहे पण तुम्ही त्याच्या देवी स्वभावाचे भागीदार झाले पाहिजे. 59T 188;CChMara 133.6

    “म्हणून भावांनो, प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुम्हांला विनविते कीं, तुम्ही एकाच गोष्टाविषयी बोला आणि तुम्हांमध्ये फूट नसावी पण तुम्ही पूर्णपणे एकत्र जोडलेले असावे.” १ करिथ १:१०.CChMara 134.1

    एकीमध्ये बळ आहे, फुटीमध्ये दुर्बलता आहे. सत्यावर विश्वास ठेवणारे एक होतात तेव्हां तें चागले वजन पाडतात. सैतानाला हें चांगले माहीत आहे. देवाच्या लोकांत भेद व कडूपणा निर्माण करून देवार्च सत्य परिणामकारक होऊ नये म्हणून त्यानें पक्का निश्चय केलेला आहे. 65T 236.CChMara 134.2

    *****