Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मुलांच्या संख्याबलाविषर्थी मसलत

    मुलें प्रभूपासून मिळालेला वारसा होत व त्याच्या कारभाराविषयी आम्ही त्याला जबाबदार आहोत. प्रेमळपणे, निष्ठापूर्वक आणि प्रार्थनापूर्वक आईबापांनी आपल्या कुटुंबाचे असें संगोपन करावे कीं शेवटी त्यास प्रभूसमोर येऊन असें म्हणता यावे कीं, “पाहा, मी प्रभूने मला दिलेली ही मुलें.”CChMara 211.3

    आईबापांनी सबुद्ध प्राण्याप्रमाणे वागावे अशी देवाची इच्छा आहे. प्रत्येक मुलाला यथायोग्य शिक्षण देण्यासाठी त्यांनी जगावें. आपल्या मुलांना दूतांचा जणू कळप असल्या प्रकारची शिस्त देण्यासाठी आईने आपली मानसिक शक्ति खर्ची घालावी. यासाठींच तिला बळ व वेळ असावयास पाहिजे. आपला कार्यभार उदारपणे उरकरण्यासाठी तिला धैये पाहिजे आहे. आपली मुलें आपल्या कुटुंबाला व समाजाला आशीर्वादकारक होतील अशा त-हेने देवाचे भय व त्याची प्रीति मनी बाळगून तिला आपले काम करिता यावें.CChMara 211.4

    पत्नि व आपल्या मुलांची माता हिच्यावर अति भार पडं नये व ती निराशाने व्यथित होऊ नये म्हणून पतीने व मुलांच्या पित्याने या सर्व गोष्टींविषयी मोठी खबरदारी घेतली पाहिजे. आपल्या लहान मुलांसाठी शक्य तें तिला करिता येऊ नये व योग्य शिक्षणाच्याद्वारे त्यांची उभारणी तिला करिता येऊ नये अशा दुरावस्थेत पत्नीने म्हणजे मुलांच्या मातेने पडू नये, हें नवर्‍यने पाहावयास पाहिजे. जी मुलें संपूर्णत: आपल्या आईबापांच्या संगोपनावर व शिक्षणावर अवलंबून राहणार त्यांचे हित आपणाला करितां येईल किंवा नाही याचा काहीं एक विचार न करितां आपलें अवाढव्य कुटुंब लहानग्या निरपराधी प्राण्यांनी भरून काढणारीं आई-बाप दृष्टोत्पतीस येतात हा आईवरच नव्हें तर मुलावरसुद्धा एक दु:खद अन्याय केला जातो.CChMara 211.5

    सालासालाला एक मूल आईच्या मांडीवर खेळत राहावे हा तिजवर एक मोठा अन्याय होय. यामुळे तिच्या सामाजिक सुखसवलती कमी होतात किंहबुना त्या नष्टही होतात आणि घरातील तिरस्करणीय अवस्था वाढत जाते. आपल्या मुलांची काळजी घ्यावी. त्यांना शिक्षण द्यावे व त्यांना सुखी करावें हीं आईबापांनी करावयाची कर्तव्ये हिरावली जातात.CChMara 212.1

    आपल्या मुलांची कशी काय तरतूद करावयाची याचा (आईबापांनीं) शांतपणे विचार करावा. दसर्‍यांना भार करण्यासाठी मुलांना जगांत जन्म द्यावयाचा त्यांना कांही हक्क पोंचत नाहीं.CChMara 212.2

    मुलांचे पुढे काय व्हावयाचे याचा किती कोतेपणीं विचार करण्यांत येतो! विषयवासनेची तृप्ति एवढाच काय तो विचार, पत्नीवर व मार्तवर दु:खाची धोंडच लादण्यात येते. यामुळे तिची जीवनशक्ति ढासळलेली आणि तिचे आत्मिक सामर्थ्य दुबळे होऊन जाते. खालावलेल्या आरोग्यांत व नाउमेद मानसिक अवस्थेत असल्यावर सभोवारच्या लहानशा कळपाची जी काळजी घ्यावयास पाहिजे असती ती तिच्याने घेववत नाही. अवश्य तें शिक्षण त्यांना न मिळाल्यामुळे देवाचा अनादर करण्यांतच ती मुलें वाढतात व आपले तें दुर्बर्तन दुसन्यापुढे मांडतात. अशा प्रकारे सैतान आपल्या मनाजोगें सैन्यच उभारीत राहतो. 6AH 159-164. CChMara 212.3

    ****