Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    दशमांश देवाने नेमिला आहे

    स्वखुषीचीं अर्पणे आणि दशांश यांचा सुवार्तेच्या कार्यात समावेश होतो. मनुष्याला दिलेल्या पैशांतून देव एका विशेष भागाची मागणी करतो तो म्हणजे दशमाश होय. 75T 149;CChMara 74.2

    आम्ही सर्वांनी लक्षात ठेवावे कीं, प्रत्येक दुसर्‍य मागणीपेक्षा देवाच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत. तो आम्हांला भरपूर देतो. आणि मनुष्याबरोबर त्यानें केलेला करार म्हणजे त्याच्या मिळकतीचा दहावा भाग देवाला परत देण्यांत येईल. देव चांगुलपणाने आपल्या कारभाच्याकडे आपला खजिना सोपवून देतो. पण दहाव्या भागाविषयी तो म्हणतो: हा माझा आहे. मनुष्याने आपल्या सर्व मिळकतीचा दशमांश विश्वासाने देवाला द्यावयाचा आहे. ही स्पष्ट योजना येशू ख्रिस्ताने स्वत: केली आहे. 86T 384;CChMara 74.3

    ह्या काळाचें सत्य पृथ्वीच्या अंधाच्या कोपर्‍यांत नेले पाहिजे व हें कार्य घरात सुरू झाले पाहिजे. ख्रिस्ताच्या अनुयायांनी स्वार्थी जीणे जगू नये; पण ख्रिस्ताच्या आत्म्याने पूर्ण होऊन त्यांनी त्यांच्याबरोबर कार्य करावें. 93T 381; CChMara 74.4

    जें कार्य करण्यास तो आला तें महान् कार्य पृथ्वीवरील त्याच्या अनुयायांना देण्यांत आलें. त्यानें आपल्या लोकांना पैसे मिळविण्याची एक योजना घालून दिली आहे. त्याकडून त्यांनी स्वत:चा निर्वाह करावयाचा आहे दशांशाच्या पद्धतींतील देवाची योजना साध्या व समानतेच्या दृष्टीने सुंदर आहे. सर्वांनी ती विश्वासाने व धैर्याने स्वीकारावी. कारण ती सुरुवातीपासून दैवी आहे. तिच्यांत साधेपणा व उपयुक्तता जोडलेली आहे व ती समजण्यास व अंमलात आणण्यास भारी ज्ञान लागत नाही. सर्वांना वाटावें कीं, तारणांचे मौल्यवान् कार्य पुढे नेण्यास त्यांनी भाग घेतला पाहिजे. प्रत्येक पुरुष, स्त्री व तरुण यांनी देवाकरिता खजिनदार व्हावे. खजिन्याची मागणी पुरी करणारे हस्तक बनावें. प्रेषित म्हणतो, “ज्याला देवाने जशी बरकत दिली आहे त्याप्रमाणे त्यानें बाजूला राखून ठेवावे. १ करिथ. १६:२. CChMara 74.5

    ह्या पद्धतीने मोठा हेतु सिद्धीस जातो. जर सवांना ती अमलांत आणली तर प्रत्येक जण विश्वासू व सावध असा देवाकरिता खजिनदार बनेल आणि जगाला शेवटल्या संदेशाचा इशारा देण्यांकरिता पैशाची कमतरता पडणार नाहीं. ही पद्धत जर सर्वांनी स्वीकारली तर खजिना भरून जाईल व देणारे गरीब होणार नाहींत. प्रत्येक देणगीद्वारे तें हल्लींच्या सत्याशी जोडले जातील. “तें येणार्‍या कांळासाठीं स्वत:करतां चांगला पाया घालून ठेवतील. अशासाठीं कीं त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावें.” १ तिमथी. ६:१९,CChMara 74.6

    चिकाटीने व पद्धतशीरपणे काम करणार्‍य कामगारांना त्यांच्या परोपकारी कार्याद्वारे देवावरील व सोबत्यावरील प्रेम वाढलेले दिसून येईल, आणि त्यांच्या वैयक्तिक कार्याद्वारे त्यांची उपयुक्तता वाढत जाईल तेव्हां त्यांना असें समजून येईल कीं, ख्रिस्ताबरोबर कामकरी होण्यात मोठा आशीर्वाद आहे जगांत माजलेल्या अंधाराशी लढाई करण्यास मदत व्हावी म्हणून बहुधा ख्रिस्ती मंडळी देवाच्या मागण्या रद्द करीत आहे. ख्रिस्ताचे अनुयायी उत्साही कामगार झाल्याशिवाय देवाचे काम पुढे जाऊ शकणार नाहीं. 103T 388, 389;CChMara 75.1