Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    स्वार्पणाद्वारें दर्शविलेल्या प्रेमाकडून देव देणग्याची किंमत करतो.

    निवास मंडपाच्या बाबतीत गरीबाच्या देणग्या ख्स्तिावरील प्रेमाने दिल्यांमुळे किती दिल्या यावर त्याचा हिशेब केलेला नाही. पण स्वार्थत्याग किती केला आहे यावर केलेला आहे. जसा श्रीमंत मनुष्य आपल्या विपुलतेतून विपुल देऊन आशीर्वादित होतो तसा गरीब मनुष्य आपल्या थोडक्यांतून थोडे देऊन आशीर्वादित होतो. कारण तें मनोभावे देतात. गरीब मनुष्य आपल्या जवळ असलेल्या थोड्या गोष्टींचा स्वार्थत्याग करतो व तो मनापासून देतो. तो खर्‍या रीतीने स्वत:च्या सोयीसाठी लागणाच्या वस्तूंचा त्याग करतो. पण धनवान् आपल्या भरपाईतून देतो व त्याला गरज भासत नाहीं. तो पाहिजे असलेल्या कोणत्याही वस्तूंचा त्याग करीत नाहीं. म्हणून गरीब मनुष्याच्या अर्पणांत पवित्रपणा आहे व तो श्रीमंत मनुष्याच्या देणगींत दिसून येत नाहीं. कारण श्रीमंत आपल्या भरपाईतून देतात. देवाच्या योजनेत मनुष्याच्या फायद्यासाठी पद्धतशीर औदार्याची शिस्त आहे. त्याची दया कधीही थांबत नाहीं. जर देवाचे सेवक त्याच्या दयेचे अनुकरण करतील तर सर्व कार्यकर्ते कामकरी बनतील. 153T 398, 399;CChMara 77.3

    लहान मुलांचे अर्पण देवाला पसंत पडून स्वीकारले जाते. देणगी देण्याच्या वृत्तीप्रमाणे अर्पणाची किंमती होतें. प्रेषितांच्या नियमाचे अनुकरण करून गरीब लोकांनी प्रत्येक आठवड्याला थोडे थोडे पैसे बाजूला ठेवन खजिना भरून काढण्यास मदत केली तर त्यांच्या देणग्या पूर्णपणे देवाला मान्य होतील, कारण त्यांनी त्यांच्या श्रीमंत भावापेक्षा मोठा स्वार्थत्याग केलेला आहे. पद्धतशीर औदार्याची योजना, बिनगरजेच्या वस्तूसाठी पैसा खर्च करण्याचा मोह टाळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला संरक्षण मिळवून देईल व वाजवीपेक्षा फाजील खर्चण्यापासून श्रीमंताना विशेषेकरून आशीर्वाद लाभेल. 163T 412; CChMara 77.4

    पूर्ण मनापासूनच्या औदार्याचे फळ पवित्र आत्म्याच्या सहवासात आपले मन व अंत:करण आणणे होय. 176T 390; CChMara 78.1

    देवाच्या कार्यासाठी देण्याच्या बाबतींत पौलाने एक नियम घालून दिला आहे व देवाच्या आणि आपल्या बाबतीत काय परिणाम होईल हेही तो सांगतो. “प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात ठरविल्यांप्रमाणे द्यावे; भाग पडते म्हणून किंवा गरज आहे म्हणून नव्हें; कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो.” “हें ध्यानात आणा कीं, जो हात राखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील.” “सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी कीं तुम्हांस सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चागल्या कामासासाठी तुम्हांजवळ सर्व कांही विपुल व्हावे. त्यानें चौफेर दिले आहे. गरीबास दानधर्म केला आहे; त्याची धार्मिकता युगानुयुग राहते असें शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणार्‍यला बीं पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो तो तुम्हांस बी पुरवील व तें पुष्कळ करील आणि तुमच्या धार्मिकत्तेचे फळ वाढवील. तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी धनसंपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होतें.” २ करिथ. ९:६-११. 185T 735; CChMara 78.2