Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents
कलीसिया के लिए परामर्श - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    “अहो, सगळे या, परमेश्वराची भक्त करुं या”

    ख्रिस्ताने म्हटले आहे कीं, “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नामाने एकत्र जमले आहेत तेथें त्यांच्यामध्ये मी आहे.” मत्तय १८:२०. जेथे कोठे दोघे किंवा तिघे विश्वासणारे असतील तेथें त्यांनी प्रभूच्या आश्वासनाची मागणी करण्यासाठी शब्बाथ दिवशीं एकत्र जमावे.CChMara 48.4

    देवाची भक्ति करण्यासाठी जमलेल्या लहान जमावाला देवाचा मोठा आशीर्वाद मागण्यास हक्क आहे. त्यांनी असा विश्वास धरावा कीं, प्रभू येशू हा त्यांचा मानाचा पाहुणा त्यांच्यामध्ये आहे. प्रत्येक खरा उपासक देवाचा पवित्र शब्बाथ पाळतो, त्यानें पुढील आश्वासनाची मागणी करावी.” यावरून कळावे कीं, तुम्हांस पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.” निर्गम ३१:१३76T 360, 361;CChMara 48.5

    शब्बाथ मनुष्यासाठी झाला. रोजच्या कामातून आपले मन काढून देवाचा चांगुलपणा व गौरव याविषयी विचार करायला मिळाल्यामुळे तो आशीर्वाद झाला. देवाविषयी बोलण्यास त्याच्या लोकांनी एकत्र होणे अगत्याचे आहे. त्याच्या वचनात असलेल्या सत्याविषयी आपले विचार व योजना सांगण्यास व योग्य प्रार्थनेत वेळ खर्च करण्यास एकत्र जमावं. पण ह्या सभा जरी शब्बाथ दिवशीं भरवायच्या असल्या तरी त्या कटाळवाण्या नसाव्या. 827 583, CChMara 48.6

    जेव्हां मंडळीला पाळक नसतो तेव्हां कोणीतरी सभेचा पुढारी नेमावा; पण त्यानें मोठा उपदेश करण्याची किंवा उपासनेच्या मोठ्या भागाचा वापर करणे आवश्यक नाहीं. संक्षिप्त पवित्रशास्त्राचा अभ्यास दिल्यास उपदेशापेक्षा मोठ्या फायद्याचे ठरेल. त्यानंतर प्रार्थना व साक्षीची सभा व्हावी.CChMara 49.1

    प्रत्येकाला वाटले पाहिजे कीं, शब्बाथ दिवसाची सभा मनोरंजक करण्यांत आपल्याला भाग मिळाला आहे. एक रीत म्हणून आपण एकत्र व्हायचे नाही, पण आपल्या विचारांची अदलाबदल करण्यास आपल्या रोजच्या अनुभवाचा संबंध दर्शविण्यास, उपकारस्तुति करण्यास, देवाला जाणण्यास व येशू ख्रिस्ताला आणण्यास आपण एकत्र व्हावे. खिस्तासाठी एकत्र होण्याने जीवितांत येणारी सकटे व अडचणी यांना तोंड देण्यास आत्म्याला बळकटी येते. स्वत:ला स्वत:साठी मागें ओढून आपण ख्रिस्ती होऊ असें समजू नका. प्रत्येकजण मानवी जाळ्यातील एक भाग आहे, आणि प्रत्येकाचा जो अनुभव आहे तो त्याच्या सोबत्याच्या अनुभवावरून अजमाविला जाईल. 96T 361, 362;CChMara 49.2

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents